आईस एज : मैत्र जीवांचे - १
माझ्या पिढीच्या अनेकांसारखा कार्टून्स शी माझा परिचय मोगली, टॉम अॅन्ड जेरी, अलादिन या दूरदर्शन वर प्रसारित होणाऱ्या मालीकांपसूनच झाला. नंतर जशी २००० च्या आसपास घरी केबल आली तसे मग कार्टून नेटवर्क वरच्या मालिकांचा मी भक्त झालो. मला तद्दन लहान मुलांचे डेक्स्टर्स लबोरेटरी, पॉवर पफ गर्ल्स, स्कूबी डू, करेज द कॉवर्डी डॉग, ट्वीटी अॅन्ड सिल्वेस्टर मिस्टरीस, रोड रनर-कायोटी, द फ्लिनस्टोन्स हे शोस आवडायचे पण टीनटीन, जस्टीस लीग, जॉनी क्वेस्ट, स्वाट कॅट्स, जी आय जो हे माझे प्रेरणास्थान होते. आताचे आणि तेव्हाचे कार्टून नेटवर्क मध्ये जमीन अस्मानाचा फरक पडलाय. कार्टूनच्या दुनियेला त्या जपानी अॅनिमे, पोकिमॉन वाल्यांनी पूर्ण कीड लावली. आजकाल जिकडे तिकडे ही कार्टून्स बघून एखाद्या सैगलच्या चाहत्याला कुमार सानुची गाणी ऐकून केवढे दु:ख झाले असेल ते कळते.
या कार्टून शोस च्या दुनियेपलीकडेही अॅनिमेशन पट माझ्या मनावर राज्य करतात. बरेच जण अॅनिमेशन पट म्हणजे लहान मुलांचे पिक्चर अशा समजुतीचे असतात. तुम्ही जर त्यातलेच असाल तर जीवनातल्या एका महान कलाकृतींना मुकताय हे लक्षात घ्या.
डिस्ने-पिक्सार, ड्रीमवर्क्स, ब्लू स्काय स्टुडीओस् या निर्मात्यांचे पिक्चर हे आशयघन असतातच, पण तंत्रज्ञान, कला यांचा सुंदर संगम आहेत. हॉलीवूड च्या तुफान चालणाऱ्या सिनेमांमध्ये कितीतरी अॅनिमेशनपटांचा नंबर वरच्या स्थानावर लागतो. अब्जावधींचा व्यवसाय करणारे सिनेमे बनवणे हा नक्कीच 'पोर'खेळ नाही. वर उल्लेख केलेले स्टुडीओ आणि आणखी बरेच या मोठ्या कंपन्या आहेत. ३ डी मोडेलिंग आणि फोटोरिअलीस्टिक रेंडरींग[१] साठीचे सॉफ्टवेयर, ग्राफिक्स प्रोसेसर्स अधिकाधिक उन्नत करण्यासाठी बहुतेकांकडे स्वतःची तंत्रज्ञांची फौज असते.
अशा या जगाची ओळख मला "आईस एज" या सिनेमापासून झाली. २००२ साली आलेला हा सिनेमा नितांत सुंदर आहे. त्यातली ह्रिदयस्पर्शी कथा, गमतीदार संवाद, पार्श्वसंगीत यामुळे हा माझा सर्वात आवडता अॅनिमेशनपट आहे यात शंका नाही.
_*_
बास बास पाटील हे सगळा विकी वरून का :-)
उत्तर द्याहटवा" संगणकावर त्रिमिती आकृत्या तयार केल्यानंतर त्यांना रंग आणि विभासी प्रकाशयोजना देवून त्याच्या फ्रेम्स तयार करतात. ही चित्रे किती जिवंत वाटणार हे वापरलेल्या अल्गोरिदम्स वर असते. ..."
हेमचंद्र,
उत्तर द्याहटवागेली ५ वर्षे ग्राफिक्स-कॅड मध्ये खपल्यानंतर, मला रेंडरिंग च्या अगदी मूलभूत संकल्पनेसाठी उत्कृष्ठ विकी मारता येते ही पावती मिळणे म्हणजे फारच आनंदाची गोष्ट. आभारी आहे. :)
Mast lihilaay blog! Perfect use of words like 'पोर'खेळ :)
उत्तर द्याहटवातुम्ही जर त्यातलेच असाल तर जीवनातल्या एका महान कलाकृतींना मुकताय हे लक्षात घ्या.Totally agreed!
It was such a visual treat watching WALL-E,Disney's Tangled,Up,Hotel Transylvania,legends of the guardians : light,beautiful and refreshing!:)