पोस्ट्स

Science लेबलसह पोस्ट दाखवत आहे

धटुकले मोदीजी

इमेज
"आजच्या चांद्रयान 3 मोहिमेतील लँडर उतरविण्याचा जो शेवटचा टप्पा पार पडला त्यात टिव्ही स्क्रीनवर इस्रोचे वैज्ञानिक कमी आणि प्रचार मंत्री मोदीच जास्त का दाखवले जात होते? की ही एक 2014 च्या प्रचाराचा भाग आहे?" कोरा. कॉम वर कोणीतरी हा प्रश्न विचारला आहे. त्या प्रश्नाला माझे उत्तर- या प्रश्नातली खोचकता एक वेळ बाजूला ठेवू. मला देखील एकवेळ वाटले कि अगदी साऊथ आफ्रिकेत महत्वाच्या BRICS परिषदेतून वेळ काढून शेवटच्या मिनिटाला मोदींनी ISRO च्या कंट्रोल सेंटर ची अर्धी स्क्रीन व्यापायची काय गरज होती? ते तिथे असले नसले तरी त्या विक्रम लॅण्डर काही एक फरक पडला नसता. विरोधक म्हणतात तसे "स्वतःचा फोटो काढण्याची" उत्सुकता दुसरे काय? हो ना? पण एक गोष्ट लक्षात घ्या. २०१९ मध्ये मोदी स्वतः चांद्रयान २ च्या वेळी देखील इसरो च्या कन्ट्रोल रूम मध्ये प्रत्यक्ष होते. आणि लॅण्डर फेल गेल्यावर भारतद्वेष्ट्या गँग कडून प्रचंड ट्रोलिंग झाले होते. चांद्रयान ३ च्या वेळी देखील विक्रम लॅण्डर फेल होण्याची भरपूर शक्यता होती. अवकाश आहे ते. भले भले गडी अगदी नासा आणि स्पेसेक्स पासून चीनची CNSA च्या मिशन नियमितपणे...

अवकाश मोहिमांवर अवाढव्य खर्च करणे योग्य आहे का

इमेज
भारतासारख्या विकसनशील देशाने अवकाश मोहिमांवर अवाढव्य खर्च करणे योग्य आहे का? आणि का? आपल्या देशाच्या आकारमानाने हा खर्च अवाढव्य नक्कीच नाही. अवाढव्य खर्च हे विशेषण संरक्षण खर्चाच्या बाबतीत योग्य शोभेल. भारताला स्वतःचा अवकाश कार्यक्रम का हिताचा आहे, हे आता सर्वश्रुत आहेच. मी तुम्हाला एक आणखी बाजू सांगतो. कोणत्याही देशाला त्याची ओळख बनवावी लागते. बनवली नाही तरी ती आपसूक बनते. काहीवेळा चांगली असते काहीवेळा देशांतर्गत दुर्जनांमुळे किंवा देशाबाहेरच्या हितशत्रूंमुळे वाईटही ओळख बनते. सरकार वेळोवेळी इनक्रेडिबल इंडिया सारख्या जाहिरात मोहीमा करून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा उंचावण्याचे काम करत असते. पण अशा जाहिराती एका ठराविक मर्यादेपर्यन्तच काम करू शकतात. तरीही अशा आंतरराष्ट्रीय जाहिरातींना काही कमी खर्च येत नाही.[१] मग त्यापण करू नयेत का? आता तुम्ही म्हणाल इथे अवकाश मोहिमांचा काय संबंध? आहे. भारताच्या अवकाश मोहीमा हा त्याच्या ओळखीचा, ब्रॅण्डिंग चा भागही आहेत. वैज्ञानिक प्रगती, स्वनिर्मित तंत्रज्ञान, परकीय चलन, भविष्यामधील आव्हानांची तयारी, प्रगत देशांच्या मध्ये मान आणि शत्रुदेशांना धाक या पल...

विरळ आणि संस्मरणीय

इमेज
तुम्ही अशी कोणती नैसर्गिक घटना अनुभवली जी इतकी विरळ आहे की परत ती बघणे होणार नाही असे तुम्हाला वाटते? 1. सिंहेचा उल्कावर्षाव हा उल्कावर्षाव दरवर्षी 17 नोव्हेंबर च्या पहाटे दिसतो. टेम्पल टटल हा धूमकेतू दर काही दशकांनी सुर्याजवळ येतो. या धूमकेतूने मागे ठेवलेल्या कणांमधून पृथ्वी जाते तेव्हा हे कण आणि कधीकधी मोठे दगड पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात. हा उल्कावर्षाव दरवर्षी जरी घडत असला तरी काही दशकांमध्ये याचा जोर जास्त असतो. धूमकेतू जर अलीकडेच सुर्याजवळ येऊन गेला असेल तर आकाशात आतषबाजी सारख्या उल्का दिसू शकतात. साल 1998 का 99 ला नक्की आठवत नाही. जगभरात या वर्षी leonids shower जबरदस्त होणार म्हणून उत्साह होता. मी माझ्या एका मित्राला तयार केले आणि 17 नोव्हेंबर च्या रात्री 3 वाजताच्या दरम्यान आम्ही अंधाऱ्या परेड ग्राउंडवर पोचलो. सुरवातीला मान वर करून पाहत होतो पण थोड्या वेळातच ओणवे व्हायची वेळ आली. पावसा सारख्या नाही पण मिनिटाला 4–5 उल्का पाहिल्याचे आठवते. आम्ही काही तास तो सोहळा पाहिला. त्या रात्रीनंतर मी कधीही एवढ्या मोठया प्रमाणात उल्का पहिल्या नाहीत. Leonids - Wikipedia 2. ' तोतापुर...

नास्तिक आणि अज्ञेयवादी

इमेज
नास्तिक आणि अज्ञेयवादी यांच्यामध्ये काय फरक आहे? व्वा.. अज्ञेयवाद. नवीन मराठी शब्द समजला आज. Atheist - नास्तिक म्हणजे जे देवाचे अस्तित्वच मान्य करत नाही असे लोक. त्यांच्या मते विश्वाचा पसारा, ही सृष्टी, उत्क्रांतीची सुरुवात हे केवळ एका वैश्विक योगायोगचा (cosmic coincidence) परिणाम आहे. इथे एक ठराविक कार्यकारण भाव आहे आणि दैव किंवा देव अशी कोणतीही गोष्ट सृष्टीत अस्तित्वात नाही असे यांचे ठाम मत असते. Agnostic - अज्ञेय म्हणजे असे लोक की जे मान्य करतात की काही गोष्टी अगम्य आहेत. कार्यकारणाचे नियम तिथे लागू होत नाहीत आणि अशा गोष्टींना फक्त वैश्विक योगायोग मानणे त्यांना चुकीचे वाटते. अशा लोकांच्या मते काहीतरी अगम्य शक्ती या सृष्टीमागे कार्यरत आहे पण ती परंपरेनुसार चालत आलेल्या देवाच्या कल्पनेसारखी नसून वेगळी असू शकते. मी स्वतःला अज्ञेय मानतो. देवाच्या अस्तित्वाचा शास्त्रीयदृष्ट्या पुरावा देता येत नसला तरी तो नसल्याचा ठोक पुरावाही देता येत नाही. पण त्यामुळे मला देव मानायलाच पाहिजे असेही नाही. अज्ञेय असल्यामुळे मी देवळात पण जातो आणि अनाठायी कर्मकांड करायला नाही पण म्हणू शकतो. हे निर्णय घ्याय...

चंद्र आहे साक्षीला

इमेज
जर चंद्र पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे तिच्या भोवती फिरतो तर चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये परिभ्रमण करणाऱ्या अवकाशयानामध्ये गुरुत्वाकर्षण का जाणवत नाही? प्रश्न मनोरंजक आणि तितकाच वैध आहे. मलाही हा प्रश्न पडायचा. सर्वप्रथम हा प्रश्न मला कसा समजतोय ते मी सांगतो. आपण बरयाचदा टीव्ही, युट्युब वर ISS (आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक) मध्ये असलेल्या अंतराळवीरांचे विडिओ बघतो. ते तरंगत असतात. याचा अर्थ ISS मधल्या वस्तू आणि व्यक्तींवर जवळ जवळ गुरुत्वाकर्षण शून्य असते. ISS पुर्थ्वीपासून साधारण ४०० किमी वरून घिरट्या घालत आहे. चंद्र जवळपास पावणेचार लाख किमी वर आहे. मग चंद्राला खेचणारे हे बल ४०० किमी वरच्या स्थानकात गायब होते का? आता याचे उत्तर पाहू. जे गुरुत्व बल चंद्र आणि पृथ्वी ला एकमेकाबरोबर बांधून ठेवते तेच बल ISS आणि इतर अवकाशस्थ उपग्रहांना देखील पृथ्वीभोवती बांधून ठेवते. अवकाशात गुरुत्व नसते ही खूप चुकीची कल्पना आहे. एखाद्या वस्तूचे गुरुत्व त्यापासून जितके लांब जाल तितक्या अंतराच्या प्रमाणात क्षीण होत जाते. पण कधीही शून्य होत नाही. सैद्धांतिक दृष्ट्या तरी नाही. मग अंतराळात गोष्टी तर...

टाईम डायलेशन

इमेज
"जर आपण कृष्णविवराच्या जवळच्या ग्रहावर राहायला असलो तर वेळ विस्तारामुळे (टाइम डायलेशन) माणसाच्या जन्माची प्रक्रिया विलंबित होईल काय?" खालील लेख Quora.com वरच्या या प्रश्नाचे उत्तरादाखल लिहिला होता. उत्तर थोडे असंबद्ध वाटू शकते पण धीर धरा. विषय कठीण आहे आणि मला उदाहरणातूनच समजला आहे. त्यामागचे गणित वगैरे माझ्या बुद्धीच्या बाहेरचे काम आहे. करोना वायरसच्या परिणामामुळे घरातच आहे. त्यामुळे "द फॉल्ट इज इन अवर स्टार्स" हा तद्दन रोमँटिक रडवेला पिच्चर पाहण्यात आला. मला रडू वगैरे आलं नाही. कारण चित्रपटातल्या प्रेमी युगलाला कँसर असला तरी एक सुखवस्तू कुटुंबात त्यांचा हा प्रेमाचा प्रवास दाखवलाय. वेदना असली तरी दुःख अगदी पराकोटीचे नव्हते. नॉर्वे, स्वीडन किंवा अमेरिकेतल्या तरुणीला कदाचित हुंदके आवरणार नाहीत. पण मला? छे. म्हणजे आपल्यासारख्या देशात जिथे कँसर बरोबर गरिबी असलेली कुटुंबे जेव्हा आपण पाहतो तेव्हा या स्टोरीमधल्या प्रेमी जोडप्याचे बरे चालले आहे अशीच भावना होते. आता दुःख ते दुःख तुमचे काय आणि माझे काय श्रीमंतांचे काय आणि गरिबांचे काय, हा तर्क योग्य वाटत नाही, ना...