धटुकले मोदीजी

"आजच्या चांद्रयान 3 मोहिमेतील लँडर उतरविण्याचा जो शेवटचा टप्पा पार पडला त्यात टिव्ही स्क्रीनवर इस्रोचे वैज्ञानिक कमी आणि प्रचार मंत्री मोदीच जास्त का दाखवले जात होते? की ही एक 2014 च्या प्रचाराचा भाग आहे?"
कोरा. कॉम वर कोणीतरी हा प्रश्न विचारला आहे. त्या प्रश्नाला माझे उत्तर-

या प्रश्नातली खोचकता एक वेळ बाजूला ठेवू.

मला देखील एकवेळ वाटले कि अगदी साऊथ आफ्रिकेत महत्वाच्या BRICS परिषदेतून वेळ काढून शेवटच्या मिनिटाला मोदींनी ISRO च्या कंट्रोल सेंटर ची अर्धी स्क्रीन व्यापायची काय गरज होती? ते तिथे असले नसले तरी त्या विक्रम लॅण्डर काही एक फरक पडला नसता. विरोधक म्हणतात तसे "स्वतःचा फोटो काढण्याची" उत्सुकता दुसरे काय? हो ना?

पण एक गोष्ट लक्षात घ्या. २०१९ मध्ये मोदी स्वतः चांद्रयान २ च्या वेळी देखील इसरो च्या कन्ट्रोल रूम मध्ये प्रत्यक्ष होते. आणि लॅण्डर फेल गेल्यावर भारतद्वेष्ट्या गँग कडून प्रचंड ट्रोलिंग झाले होते.

चांद्रयान ३ च्या वेळी देखील विक्रम लॅण्डर फेल होण्याची भरपूर शक्यता होती. अवकाश आहे ते. भले भले गडी अगदी नासा आणि स्पेसेक्स पासून चीनची CNSA च्या मिशन नियमितपणे फेल होतात. रशियाचे LUNA लॅण्डर तर आपल्या दोन दिवस आधीच फेल गेले होते आणि रशियाला जगभरातून वाकुल्या दाखवण्यात आल्या होत्या.

या वेळी चांद्रयान उतरले नसते तर भारतातूनच नाही जगभरातून अगदी भारताच्या मित्र राष्ट्रांकडून देखील टीका झाली असती कि भारताने असले नसते धाडस करण्याच्या ऐवजी टॉयलेट बांधण्यावर भर द्यावा. ब्रिटिश मीडिया तर आताही हेच म्हणत आहेत.

प्रकाश राज सारखे मोदींना ट्रोल करणारे तर केव्हाच टपून बसले होते. अशा वेळी मोदीजी BRICS परिषदेचे निमित्त करून काढता पाय घेऊ शकले असते आणि मस्त लँडिंग यशस्वी झाल्यावर मग वैज्ञानिकांचे श्रेय लाटायला आरामात आले असते. पण त्यांनी तसे केले नाही.

ते स्क्रीनवर आलेच त्या नाजूक मिनिटांमध्ये जिथे चांद्रयान २ अपयशी झाले होते. भीती तर त्यांनाही वाटली असेल,नर्वस तर तेही दिसत होते. पण अपयश आले तर एका निडर नेत्यासारखे आपल्या शिरावर घ्यायला ते तिथे होते. आणि यश मिळाले तर त्यांनी सर्व शास्त्रज्ञांचे मनापासून कौतुक करत देशाला नव्हे तर मानवजातीला अर्पण केले.



तरीही, त्यांना पाहिजे तो इफेक्ट मिळालाच. सर्व भारत पुन्हा मोदीमय झाला. आणि जगभर न्यूज मध्ये अपरिहार्यपणे यानाच्या टचडाऊन च्या क्षणांमध्ये मोदी झळकले. त्यांनी रिस्क घेतली होती. ती फळाला आली. याला म्हणतात "putting your neck on the line". नजर हटी, दुर्घटना घटी.

त्याच मिनिटात शास्त्रज्ञांचे उस्फूर्तपणे अभिनंदन करताना मोदींनी इसरो च्या पुढील मिशन्स चा देखील उल्लेख केला. एखाद्या विषयाबद्दल विशेष आस्था असल्याखेरीज असे होत नाही.

आम्हाला तर मोदींची हि धिटाई लै आवडली.

एवढे असूनही मनाच्या एका कोपऱ्यात वाटते आहे कि इसरो ने अर्धा तास आधीच लँडिंग केले असावे आणि नंतर प्रक्षेपण झाले असावे. अणुस्फोटासारखी गोष्ट मनात आणले तर लपवू शकण्याची क्षमता राखणाऱ्यांना असे करणे अगदीच अशक्य नाही.


-----------------------------------


मोदींमुळे बद्धकोष्ठ होते तर तुम्हाला ठग बंधनांच्या नेत्या ममता दीदी लाखलाभों. भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा ऐवजी राकेश रोशन असे चुकून म्हणाल्या. म्हणाल्या तर म्हणाल्या, वर तो चंद्रावरून इंदिरा गांधींशी बोलला वगैरे अकलेचे तारे देखील तोडले. राष्ट्रीय नेते आहात, पंतप्रधानपदाची स्वप्ने बघता, तर अगदी त्यांच्याच पक्षाच्या डेरेक ओब्रायन सारखे सामान्यज्ञान नसेना का, तुम्हाला अंतराळात लो अर्थ ऑर्बिट मध्ये जाणे आणि चंद्रावर उतरणे या गोष्टींमधला फरक समजत नाही? अशा नेत्यांच्या ठग बंधनाला तुम्ही गोड मानणारे पण धन्य.






टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

अभिप्रायासाठी अनेक आभार!

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

सर्वात आनंदी देश : फिनलंड.. पण खरचका?

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक