अनुभव
पुतीनच्या वाट्याची सफरचंदे
दुपारी होस्टेल वर आल्याआल्या समोर सफरचंदाची पेटी दिसली. कदाचित कुणीतरी ठेवली असतील घेवून जायला. पण एवढी पेटीभर सफरचंदे कोण ठेवेल उगाच असे वाटून मी घेतली नाहीत. वर आल्यावर रेक्टर काकूंनी विचारले.. ल्युबिश याब्लक? उम्म.. ताक. दोन सेकंद तर्क लावला..चल्ला फुकटची सफरचंदे.
देअर गोज माय फॉर्चूनर
युरेका! युरेका!
माझा देश ऑलिम्पिक मध्ये पदकं का मिळवत नाही, गेल्या शतकभरात आपल्याला हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच नोबेल का मिळाले? याचे उत्तर मला समजले. म्हणजे माहीत होते, पण आता अनुभवामुळे समजले.
आज एकदम पिच्चर सोडून हा विषय का? का? मी काय फक्त ताडोबा, दांडेली, हम्पी अशा उनाडक्याच करत हिंडतो का? म्हणजे घरात काही लक्षच नाही माझे?
संस्मरणीय जून - २
माथेरान
अगदी अवचीत जूनच्या दुसऱ्या आठवड्यात गेलो इथे शनिवारी. सोबत ३ उझबेक, एक इरिट्रिया (पूर्व आफ्रिका, इथिओपिया च्या जवळ) ची मुलगी, आणि प्रवीण.
आम्हाला वासरात लंगडी गाय रशियन माहित असल्याने त्यांच्या सोबत एका कार्यक्रमाचे आमंत्रण होते तिथल्या एका शाळेत. यांचे अनुभव ऐकणे, हास्यविनोद, घोड्यावरची रपेट, माथेरानचा धो धो पाउस यात हा प्रवास मस्त झाला.
संस्मरणीय जून - १
ताडोबा
महिन्याची सुरुवातच धडाक्यात झाली.
जूनच्या १ तारखेला सकाळी आमची रेल्वे वर्धा स्टेशन ला लागली. ज्या जंगलाचा उल्लेख अगदी पहिली दुसरीपासून ऐकतोय, तिथे आम्ही आता ३ दिवस घालवणार याची जाम उत्सुकता होती. वाघ बघायचा हे तर मनात होतेच. पण कुठेतरी अपेक्षाभंगाची भीती होती. म्हणून मनाची तयारी केली की वाघ बघण्यासाठी नाही तर एक परिकथेतले वृक्षराजींनी भरलेले जंगल बघायला चाललोय.
काच फुटताना..
पोस्टचं टायटल बघून पब्लिकचा काहीतरी सेंटीमेंटी, ऍबस्ट्रॅक्ट वगैरे टाकणार असा समज होऊ शकतो. यार पण ऍबस्ट्रॅक्ट विचार करून करून डोकं बधीर झालं आता, त्यामुळे कधीकधी साधं सरळ सोपं लिहिलं तर फाउल थोडी होणारे?
खरच काच फुटताना पाहिली मी. तसे प्रत्येकाच्या आयुष्यात कधीना कधी तरी हा प्रसंग येतोच. पण बऱ्याचदा ग्लास, आरसा, कपाटाचे प्यानल, घड्याळ, मोबाईल ची स्क्रीन, फ्रीज चा रॅक असे फुटकळ फुटण्याचे प्रकार पहिले असतील लोकांनी.
दिलमे मत रख यार, बोल डाल!
ऍक्टीवा किंवा स्कूटी वाल्या पोरींना हे वाढपी गंडवतात हे माहितीये.
एकीकडे ती अवजड गाडी कोवळ्या हातांनी सांभाळायची दुसऱ्या हाताने सीट उघडून टाकीचे झाकण काढायचे. अशात समोर मीटर पहायचा. आणि वाढपी पट्टीचे असतील आणि ऍडीटीव घ्या म्हणून मागे लागेले वगैरे तर नको म्हणत कसेबसे देतील तेवढे पेट्रोल पदरात पाडायचे. असे दृश्य पहिले की "स्त्रीजन्मा तुझी कहाणी" वगैरे वगैरे डोळ्यासमोर येते.
एकदा दोनदा मला स्वताला असा अनुभव आला तेव्हा मला मीटर वरून डोळे न हलवण्याची सवय लागली. बहिणीला आणि मैत्रिणींना तर लय वेळा सांगितले कि, पेट्रोल भरताना गाडी स्टँड वर लावून निवांत होवून मीटर कडे पाहिल्याशिवाय भरू देवू नका. मागच्या लोकांनी हॉर्न मारला तर 'हाड' म्हणून स्थितप्रज्ञ राहा.
आली एकदाची..
काल बँगलोर च्या मेट्रो ने प्रवास केला. प्रवास केला म्हणजे, एका स्टेशन वरून चढलो, दोन स्टेशन सोडून उतरलो, आणि परत विरुद्ध बाजूने चढून प्रारंभीच्या स्टेशन वर आलो. थोडक्यात गाडी गाडी खेळलो. गेली पाच वर्षे जिची बंगळूरकर आतुरतेने वाट पाहत होते तिचा पहिला टप्पा सुरु झाला या आठवड्यात; आणि लोकांनी आपली लाडकी मेट्रो बघायला रजनीकांतच्या सिनेमाला होते तशी गर्दी केली.
विसा, मुंबई आणि आय ट्वेन्टी
मुंबईतली रम्य सकाळ, काही अत्यानंदाने फुललले चेहरे आणि काही निराश. मागील दीड तासांपासून हाच खेळ पाहतोय. मनात शंकाचे मोहोळ उठलेले. तसा मी एकटाच नाहीये, माझ्यासारखी बरीच मंडळी तरुण, म्हातारी त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभी काही तशीच फुटपाथ वर बसलेली. कचरा उचलणाऱ्या गाडीचा खेळ पाहून झाला, जॉगिंग करणारे पब्लिक पाहून झालं, समोरची उंचच उंच इमारत पाहून झाली, आणि कॉन्सुलेट च्या लायनितली पाखरं पण टिपून झाली. पण ममी पपांचा तपास नाही.
एका पॅच ची गोष्ट..
P E C F D आता हे वाचा E D F C Z P, प्रत्येक क्लिक गणिक छोट्या होणाऱ्या त्या अक्षरांच्या रांगांना कसून प्रयत्न करत वाचतोय. तिथल्या बहुधा इंटर्न असलेल्या डॉक्टरने फोन उचलला. माझ्याएवढाच, किंवा माझ्यापेक्षाही लहान असलेला इंटर्न. "Ma'am, new patient, shuttlecock injury. I checked his eye pressure, it's normal. Sight 6/6. I suspect internal hemorrhage", फोन ठेवून परत माझ्याजवळ येतो, "हम्म, ठेवा हनुवटी इथे, फोरहेड टेकवा समोर. सरळ बघा." त्या प्रकाश पुंजक्याकडे बघतोय. सकाळी कोर्ट वर टंच पोरगी बघून सुखावणारा माझा डोळा, आता अस्तित्वाची परीक्षा देतोय..