गाभार्यातला देव आणि वाट पाहणारा कोहली.




आपला देश हा विविधतेनेने नटलेला आहे वगैरे वगैरे.. सर्व जातीधर्माचे, विचारसरणीचे , बहुभाषिक लोक गुण्यागोविंदाने राहतात वगैरे वगैरे.. हे असली वाक्य शाळेच्या पुस्तकांमध्ये आणि भाषणांमध्ये कितीदा ऐकली असतील?
थोडीफार अक्कल आल्यापासून आपल्या शहरातून (म्हणजे बेडकाच्या विहिरीतून म्हणा हवेतर) बाहेर फिरताना लक्षात आले की भारत देश हे खतरनाक वेगळे रसायन आहे. खरच आपल्या प्रांतामध्ये कमालीचे वेगळेपण आहे.
लोक बोलतात वेगळे, चालीरीती वेगळ्या, भाषा चित्र-विचित्र.. तरी हा देश एकत्र राहिला किंवा ठेवला कसा?

युरोप मध्ये गेल्यावर पहिल्यांदा त्या "वाह काय शिस्त आहे, काय स्वच्छता आहे.." टिपिकल मुक्तपीठ शॉक मधून बाहेर पडल्यावर तिथल्या शहरांची आणि लोकांचा एक ठराविक साचा लक्षात आला.
मला असे म्हणायचे नाही की युरोप विविध नाही. अतिशय सुंदर आणि निरनिराळ्या रंगांनी रंगलेला आहे. भाषा आणि चालीरीती खूप वेगवेगळ्या आहेत. पण म्हणूनच तो तितक्याच प्रकारच्या स्वतंत्र देशांनी बनलेला आहे.
पण या देशांचा धर्म एकसारखा, मूळ स्वभाव वैशिष्ट्य सारखीच. उदा. जर्मनी ऑस्ट्रिया मध्ये अभिवादन करताना "गुटेन मोर्गेन, गुटेन टाग, सेर्वुस" म्हणणार "डांकं" म्हणल्यावर "बिटं" म्हणणार.. तर पोलंड मध्ये अभिवादनाला "जीन दोब्रं, दोब्री जेन्या, चयेष",
आभाराला "जिंकूया, जिंकी" आणि त्यानंतर विनम्रतेने "प्रोषे" म्हणायची पद्धत. याच प्रकारची पद्धत संपूर्ण युरोपमध्ये आढळेल. शब्द बदलले की काम झाले. अगदी लहान मुलांपासून तर आजिबाइन्पर्यन्त एकसमान लोक असेच वागतात.
 युरोपियनांना या सवयी अंगवळणी पडल्या असल्या तरी भारतीय म्हणून प्रत्येक वेळा इतकं विनम्र राहणं एकदम कृत्रिम वाटायचं, वाटतं.

 हा.. तर.. सांगायचा मुद्दा असा की युरोप तसा भारताच्या तुलनेत बर्यापैकी एकसंध आहे. तरीपण युरोपियन युनियन मध्ये राहणे सुद्धा या लोकांच्या जीवावर येते. आर्थिक आणि राजकीय कारणांमुळे इयु कसेबसे तग धरून आहे.
आपला देश मारे जरी "जगातील सर्वात मोठी लोकशाही" म्हणून मिरवत असला तरी "युनियन ऑफ इंडिया" मध्ये राहायचे की नाही हा प्रश्न विचारणे पण गुन्हा आहे. कारण- हीच आर्थिक आणि राजकीय कारणे. खरेतर मी थोडा सेपरेतेरीयन विचारसरणीचाच होतो तरुणपणी.
म्हणजे तरुण आहे अजूनही.. पण त्यातल्या त्यात कोवळ्या वयात. माझ्यावर युरोपियन मॉडेल चा जास्तच प्रभाव होता. पण जशी जशी अक्कल आली तसे कळतंय की भारताने एक राहणे आपल्या अस्तित्वासाठी (अस्मितेसाठी नव्हे) गरजेचे आहे.
इयु, NATO सारखे मॉडेल वगैरे ठीक आहे हो.. पण तेवढे प्रगल्भ न आपले प्रांत आहेत न त्यांचे नेतृत्व.

भारताचे शत्रू पण बरेच आहेत. आपले शेजारी पण शत्रूच. श्रीलंका, इंडोनेशिया, चीन ने ७१ च्या युद्धामध्ये पाकिस्तान ची मदत केली. पाकिस्तान ७१ च्या युद्धाच्या बदल्याच्या आगीत एक दिवस जळून जाईन. चीन आपले वर्चस्व राखण्याच्या नादामध्ये कुठल्याही थराला जाऊ शकतो.
अशामध्ये त्यांना या भारताच्या विविधतेचा आणि बळाने म्हणा, स्वेच्छेने म्हणा वा नाईलाजाने म्हणा असलेल्या एकीचा तिरस्कार वाटणे स्वाभाविक आहे. त्याच वेळी या गोष्टीला ते संधी म्हणून बघतात हे पण ओघाने आलेच. त्यामुळेच या "संधीचा" वापर करण्याची संधी ते वेळोवेळी शोधत असतात.

मी पाकिस्तानी मुलांबरोबर राहिलोय. विश्वास ठेवा.. ते आपल्या सारखेच आहेत. पण पराभवाचे विष पचवणे सोपे नसते. त्यातला चांगल्यात चांगल्या लोकांनाही भारताचे वाईट झाले तर आनंदच होईल. [१ तारिक फतेह]

तर मग कोहली देवळासमोर काय करतोय?

हे चक्क विसरलोय. हा लेख कदाचित १-२ वर्षापूर्वी असाच सोडून दिला होता लिहिता लिहिता. थोडाफार अंदाज आहे कशावर नक्की लिहित होतो ते. लक्षात आल्यावर परत लिहीन.

टिप्पण्या

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

सर्वात आनंदी देश : फिनलंड.. पण खरचका?

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक