कंट्रोल उदय कंट्रोल
ही वेळ आली का? असो..
काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी असले नखरे सहन करत नाही.
आमच्या सोसायटीचा एक व्हॉट्सऍप ग्रुप आहे. तिथे बऱ्याच गोष्टी जसे पाणी, सुरक्षा, साफसफाई, डागडुजी असले विषय असतात. ७0 टक्के पब्लिक मराठीच असेल. उरलेलं हिंदीभाषिक आणि बाकीचे. त्यामुळे एक सौजन्य म्हणून बहुतांश संवाद इंग्रजी आणि थोडे हिंदी आणि त्याहून कमी मराठी असतात.
या ग्रुपमध्ये बरेच जण इंग्रजी व्याकरणाची लक्तरे निघाली तरी हिंदी किंवा मराठी संदेश टाळतात. त्यात काही जण तर इंग्रजीच्या भीतीने "काही सांगायचे आहे पण बोलणार नाही" या न्यायाने कधीच संदेश पाठवत नाहीत.
तर झाले असे, की आमच्या सोसायटीच्या अध्यक्षाने पाण्याविषयी एक पोस्ट टाकला. महापालिकेकडून आलेल्या मराठी नोटिशी त्यांनी बऱ्याचदा जशाच्या तशा टाकल्या होत्या.त्यावर ग्रुप मधल्या एक दाक्षिणात्य महिलेने लागलीच "इथे मराठी चालणार नाही" अशा आशयाचा इंग्रजी संदेश टाकला. आणि योगायोगाने तो होता मराठी दिवस. माझी अवस्था "कंट्रोल उदय कंट्रोल" अशी झाली होती.
तरीपण मी सुनावले की ज्यांना पाहिजे त्यांनी महापालिकेत इंग्रजी सूचना देण्याचा अर्ज पाठवावा. पुण्यामध्ये एखादया ग्रुपवर सौजन्य म्हणून लोक हिंदी इंग्रजी वापरत आहेत पण आमच्यावर सक्ती करू नये म्हणून. त्या महिलेने थयथयाट केला.
गंमत अशी की ही महिला स्वत: तामिळ आहे. त्यामुळे तिकडे अशा गोष्टी किती खपवून घेतल्या जातात याची चांगलीच समज असावी. शेवटी थोडा राग शांत झाल्यावर मीच ग्रुपवर सांगितले की कुणाला कुठल्या मराठी संदेशाचा अर्थ समजला नसेल तर नम्रपणे सांगावे मी स्वतः भाषांतर करून देईन. आणि त्याप्रमाणे मी बऱ्याचदा भाषांतर केले देखील.
आता तुमच्या मुद्द्याकडे वळू. तुम्हाला तुमचा वरिष्ठ असे म्हणाला असेल तर सौजन्याने त्यांना ही चूक लक्षात आणून द्यावी. सहकारी म्हणाला असेल आधी स्वतः थोडे सौजन्याने थोडे विनोदाने सांगून व नंतर एचआर मार्फत असल्या मुजोरपणाला वेळीच आळा घालावा. कोणी गांभीर्याने घेत नसेल तर अगतिकपणे तिथे नोकरी करण्याची काही गरज नाही. अर्थात हे पाऊल उचलण्यापूर्वी आपली योग्यता तेवढी हवी. आणि म्हणूनच सर्वात महत्वाचा मुद्दा - आपली योग्यता इतकी वाढवा की कुणी आपल्या भाषेचा अपमान आपल्यासमोर करण्याचे धारिष्ट्य परत करणार नाही.
आत्मसन्मानाच्या व्याख्येत काय काय सामील करायचे हे ज्याने त्याने ठरवायचे असते. व्यवहारापायी, परिस्थितीपायी चतुराईने कधी तडजोड करावी लागते. पण कुठेतरी लक्ष्मणरेषा असायालाच हवी. कामाच्या ठिकाणी गरज नसताना एखाद्याच्या भावना दुखावणे हे चांगल्या व्यक्तीमत्त्वाचे लक्षण नाही आणि याबाबत तुम्ही नियमाप्रमाणे वेळीच निषेध व्यक्त करायला हवा.
प्रश्न बऱ्याचदा कोण कोणती भाषा वापरतो याचा नसतो. या भाषा वापराने किंवा त्याच्या विरोधाने कुणी दुखावला तर जात नाही याचा असतो. बऱ्याचदा सौजण्याची भाषा बाकीच्या कोणत्याही भाषेपेक्षा मोलाची असते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अभिप्रायासाठी अनेक आभार!