ऑनलाईन शॉपिंग
माझ्या दैनंदिन वापरातील या वस्तू मला अतिशय उपयुक्त वाटल्या.
१. मच्छरांना हाकलण्यासाठी केमिकल वेपरायझजर इतकी वर्ष वापरत आलो. मला नेहमी वाटायचे की ही रसायने जी मच्छरांना नको असतात ती आपल्या शरीराला काही प्रमाणात का होईना हानिकारक असतील. पण त्याला पर्याय देखील नव्हता. मच्छरदाणी एकतर फार किचकट प्रकार. वर लावली की फॅन ची हवा देखील लागत नाही. मच्छरांना मारण्यासाठी रॅकेट देखील आहेच, पण ते घेऊन मच्छरांच्या मागे टेनिस खेळावे लागते. त्यामुळे नाईलाजाने का होईना, गुडनाईट, ऑल आऊट सारखे वेपरायझर्स महिन्यातून दोन वेळा आणून लावणे हाच पर्याय होता.
घरात बाळ आल्यापासून गुडनाईट वेपरायझर वापरणे आणखी धोकादायक वाटू लागले होते. असे काही असेल का जेणेकरून या व्हेपरायझर पासून सुटका होईल, हे शोधताना मला खालील लॅम्प सापडला. याचे कार्य इलेक्ट्रिक रॅकेट सारखेच आहे पण निळ्या प्रकाशाकडे मच्छर स्वतःहून आकर्षित होऊन मरतात. मला तर घेण्यापूर्वी विश्वासच नव्हता. पण एक दोन दिवसातच याची उपयुक्तता कळली.
आज दोन महिने झाले आम्ही घरात गुडनाईट किंवा ऑलआऊट आणले नाही. हा लॅम्प एका ठिकाणी लावून झोपले कि मच्छरांचा काहीही त्रास होत नाही. हा उपाय चालण्यासाठी झोपण्याच्या खोलीमध्ये पूर्ण अंधार असावा लागतो. मच्छर एकतर येत नाहीत आणि आलेच तर स्वतःच लॅम्पपाशी जाऊन मरतात. मोबाईच्या अडॅप्टर ला जोडले असल्याने इथे शॉक लागायची वगैरे देखील भीती नाही. रात्री अपरात्री मच्छर मारताना स्पार्क होऊन टर्र-चर्र असा आवाज होतो. त्याचीही सवय होऊन जाते. लाईट नसेल तर पॉवर बँक ला लावून देखील चालते. सकाळी एकदा उजाडल्यावर मात्र मच्छर गॅंग चान्स मारू शकते.
या दिव्याने केमिकलयुक्त वेपरायझर घरातून हद्दपार केला आहे. रिफील वगैरे लागतच नसल्याने किंमत दोन महिन्यात वसूल होते. ऍमेझॉन वर ५००-६५० च्या रेंज मध्ये सध्या आहे. एका रात्री ६-७ मच्छर या लॅम्प ने मारल्याचे पाहून समाधानाने हा व्हिडीओ काढून ठेवला होता. :)
या वापरायला सुरुवात केल्यापासून आत्तापर्यंत हा उपाय का नाही वापरला असे वाटायला लागले. रात्री जेवणांनंतर ब्रश करणे तर आताही चालूच आहे, पण आधीपेक्षा खूप चांगल्या प्रकारे स्वच्छता होते. सध्या ऍमेझॉन वर २० काड्यांचा पॅक २०० रुपयांच्या आत आहे. आणि एक काडी बरेच दिवस वापरता येते.
३. वाय फाय बल्ब
घरातील इंटरनेट वायफाय वापरून नियंत्रित करता येणारा हा दिवा खरेतर बिनकामाचा वाटत होता. जसे आमचे नवजात कन्यारत्न हॉस्पिटल मधून घरी आले, तिच्या अमेरिकन टाइम झोन चा प्रत्यय आला. रात्री ती उशिरा झोपते आणि मधून मधून उठत असते. मग तिची आई तिला दूध पाजते आणि मला पाळणा हलवून बाळाला झोपवायचे काम असते. अशा वेळी उठून लाईट लावायची, परत बंद करायची अशी कामे जीवावर येतात. एकतर झोप डोळ्यावर असते आणि त्यात एकदम लक्ख उजेड झाला तर बाळ तर खडखडीत जागे होतेच, आपल्याला पण त्या प्रकाशाचा त्रास होतो. यावर उपाय म्हणून शेवटी हो नाही करता करता हा ७०० रुपयांचा इंटरनेट बल्ब आणला. आणि याची इतकी सवय झाली आहे कि हे आधी कां नाही सुचले असे वाटत आहे.
हा बल्ब मोबाइल ऍप वापरून चालू बंद करता तर येतोच, प्रकाशाची तीव्रता, रंग हे अगदी मनाजोगते ऍडजस्ट करता येतात. त्याच्यात आपल्याला पाहिजे ते कॉम्बिनेशन आधीच सेव्ह केलेले असते किंवा आपल्याला नवीन प्रकाश योजना देखील सेट करता येते. त्यात "Working", "Reading", "Sleeping" असे मोड आहेत त्यामुळे एक बटन दाबून काम होते. यासाठी घरात वाय फाय मात्र हवे.
४. स्विस सूरी
स्वित्झर्लंड च्या सुऱ्यांबद्दल ऐकून होतो. त्यामुळे आई जेव्हा तिच्या पहिल्या वाहिल्या युरोप टूर ला गेली तेव्हा तिला सोरोवस्की डायमंड वगैरे बिनकामाच्या वस्तू आणण्यापेक्षा सूरी आण म्हंटले. तिने आणली. आणि या सूरी चा उपयोग आम्ही अगदी नारळ कापण्यासाठी पण केला.
स्वित्झर्लंड च्या सुऱ्यांबद्दल ऐकून होतो. त्यामुळे आई जेव्हा तिच्या पहिल्या वाहिल्या युरोप टूर ला गेली तेव्हा तिला सोरोवस्की डायमंड वगैरे बिनकामाच्या वस्तू आणण्यापेक्षा सूरी आण म्हंटले. तिने आणली. आणि या सूरी चा उपयोग आम्ही अगदी नारळ कापण्यासाठी पण केला.
गेल्या ३ वर्षात अगदी कसाही उपयोग केला तरी याची धार गेली नाही. स्विस चाकू आणि सुऱ्या इतक्या का लोकप्रिय आहेत हे समजले. किंमत थोडी जास्त आहे पण रोजच्या स्वैपाकाची एक उपयुक्त वस्तू म्हणून ही एक चांगली गुंतवणूक आहे. विशेष म्हणजे हि ऍमेझॉन वर भारतात उपलब्ध आहे हे नंतर समजले.
काही डिस्क्लेमर
लिंक्स अमेझॉन अफिलिएटेड आहेत. म्हणजे जर हि लिंक कुणी वापरून ते विकत घेतले तर अमॅझॉनकडून माझ्या अकॉउंट मध्ये पॉईंट्स येतील. अफिलिएटेड लिंक का टाकली? कारण ती कशी टाकायची असते ते मला माहीत आहे म्हणून. :)
लिंक्स अमेझॉन अफिलिएटेड आहेत. म्हणजे जर हि लिंक कुणी वापरून ते विकत घेतले तर अमॅझॉनकडून माझ्या अकॉउंट मध्ये पॉईंट्स येतील. अफिलिएटेड लिंक का टाकली? कारण ती कशी टाकायची असते ते मला माहीत आहे म्हणून. :)
ऑनलाईन शॉपिंग - Useful information in Marathi
उत्तर द्याहटवा