इंटेलिजंट स्पर्म!

April 2012

बॉस, काहीतरी भयानक जादू झालीये. हा एप्रिल चालुये आणि आतापर्यंत या वर्षात मी तीन हिंदी सिनेमे पाहिले. ते तीनही प्रस्थापित हिंदी सिनेमाच्या समजुतींच्या पार गेले आणि एक नवीनच शाळा (school of thought) भरवलीये. पानसिंग तोमर, कहाणी आणि विकी डोनर हे नितांत सुंदर पिच्चर पाहिले. हिंदी पिच्चर बेचव आणि बिनडोक अशा समजुती घेवून वर तोंड करून हिंडणाऱ्या लोकांना (म्हणजे आम्हालाच) भयानक धक्का होता हा. नशीब आमचे की हाउसफुल सारखे सिनेमे मधेमधे येवून तो समज अगदीच खोटा नाहीये अशी सांत्वना देतात.

वर नमूद केलेल्या तीनही सिनेमांचे वैशिष्ठ्य म्हणजे त्यांच्यात कोणीही 'तुर्रम'खान नव्हता. तरीही पानसिंग आणि कहाणी तुफान चालले. आणि विकी डोनर मला एवढा आवडलाय की ज्या अर्थाने हे दोन चालले तो पण बॉक्स ऑफिस गाजवणार यात शंका वाटत नाही. पानसिंग ला काही मोठे बजेट नव्हते पण तरीही ४०-५० वर्षांचा काळ २-२.३० तासात दाखवण्यात लैच कमाल केली. कोलकात्याला ज्या प्रकारे दाखवलय त्याला तोड नाही. हे सिनेमे कुणी लिहिले, कुणी दिग्दर्शित केले हे इथे कशाला लिहू? विकी आहेच. पण या लोकांचे कौतुक करावे तेवढे थोडे.

विकी डोनर मी मागल्या रविवारी पाहिला. खरेतर 'मिरर मिरर' पाहायला जाणार होतो. पण सिनेमाला येणारं पब्लिक चेंज झालं आणि त्यांना हे परीकथांचं ज़ॉनरं कितपत आवडेल या शंकेमुळे मी दुसरा कुठला पाहायचा या शोधाला लागलो. जेम्स क्यामेरून त्याचे पिक्चर परत बळच रीलीस करून पैसे कमावतो, त्यामुळे टायटनिक ३डी चा गल्ला भरायचा नव्हता. हाउसफुल२ हा टूकार सिनेमा मी कुणी मला पैसे दिले तरी पाहणार नाही असे बरेच आधी ठरवले होते. त्यामुळे राहिला विकी डोनर. रेडीफ वर सुकन्या वर्मा[१] चा रिव्यू वाचला आणि चला म्हटले. बुक माय शो वाले साला २० रुपये जास्त घेतात तिकिटामागे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ई-स्क्वेयर ला लवकर जावून तिथेच बुक केली तिकिटे. आणि कधी कुठे यायचे हे पार्टीला एसएमसएस करून रानडेला गेलो. तिथे ६-७ रशियन चे विद्यार्थी आले होते. वयोगट २२ ते ५५. पेशा- आर्टिस्ट, डेवेलपर्डे, डॉक्टर ते शास्त्रज्ञ. आमच्यात एक समान दुवा आहे. सगळे ड्रॉपआउट्स. कुणी सर्टीफिकेटचा, कुणी डिप्लोमाची, अडवान्स डिप्लोमाचा असे. आपली ही परिस्थिती सुधारण्यासाठी काय करायला हवे हे सोडून सगळ्या विषयांवर चर्चा झाली. जशी माझी वेळ झाली तसा ई-स्क्वेयर ला पोहोचलो. पार्टी आधीच हजर होती.

हा पिच्चर का पाहावा -
१. यातला एकही जोक ओढूनताधून आणलेला नाही.
२. वन्ध्यत्व आणि शुक्राणू दान[२] हे विषय सिनेमाभर असूनही एकदाही पातळी सोडलेला विनोद नाही. आता तोल जाईल मग जाईल असे करता करता सिनेमा संपतो आणि उरतं फक्त कौतुक.
३. आयुष्मान - याचा पहिला पिच्चर आहे हा. प्रस्थापितांनी क्लास लावा याच्याकडे.
४. अन्नू कपूर - एक सुपीक आणि कसदार जीन मिळवण्यासाठी अगतिक झालेला डॉक्टर यांनी इतका अप्रतिम साकारलाय. याच्या डॉक्टर चढ्ढा आणि त्यांच्या तथास्तु ला पैकीच्या पैकी.
५. पिच्चर मधल्या विकीच्या आई आणि आजी. हा निव्वळ धिंगाणा प्रकार आहे.
६. दोन पोरी आहेत खतरनाक दिसणाऱ्या. (आता उड्या पडतील :) )

२०१२ हे बहुदा हिंदी सिमेमाला नवीन अर्थ देणारं वर्ष ठरावं. पुढील सिनेमांसाठी शुभेच्छा!
-*-

[१] - सुकन्या वर्मा आणि राजा सेन हे रेडीफ चे दोन समीक्षक. यांच्या सामिक्षांचा एक खास वाचक वर्ग आहे. लेख वाचायचा आणि खाली कमेंट्स मध्ये यांचा उद्धार करायचा हा बऱ्याच लोकांचा टाईमपास आहे.
यांचे रिव्यू म्हणजे वोकॅब्लरी चे दुकान असते. वाक्य भयानक शब्द वापरून किती दुर्बोध करता येतील याची स्पर्धा असते दोघांमध्ये. आपले इंग्लिश लय भारी हा माज ज्याला उतरवयाचा असेल तर त्याने यांचा लेख वाचावा. आणि काम फत्ते झाले कि खाली त्यांना शिव्या घालाव्यात.
त्यांच्या लेखाचा हा नमुना.. खालच्या टिपिकल कमेंट पहा.

[२] - माय मराठीची सेवा..:) infertility & sperm donation असे वाचावे.

टिप्पण्या

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

सर्वात आनंदी देश : फिनलंड.. पण खरचका?

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक