पोस्ट्स

जून, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

काच फुटताना..

इमेज
पोस्टचं टायटल बघून पब्लिकचा काहीतरी सेंटीमेंटी, अॅबस्ट्रॅक्ट वगैरे टाकणार असा समज होऊ शकतो. यार पण अॅबस्ट्रॅक्ट विचार करून करून डोकं बधीर झालं आता, त्यामुळे कधीकधी साधं सरळ सोपं लिहिलं तर फाउल थोडी होणारे? खरच काच फुटताना पाहिली मी. तसे प्रत्येकाच्या आयुष्यात कधीना कधी तरी हा प्रसंग येतोच. पण बऱ्याचदा ग्लास, आरसा, कपाटाचे प्यानल, घड्याळ, मोबाईल ची स्क्रीन, फ्रीज चा रॅक असे फुटकळ फुटण्याचे प्रकार पहिले असतील लोकांनी. लहानपणी एकदा जिंकून आणलेल्या गोट्या अशाच थंडीच्या दिवसात चुलीत तापवून पाण्यात टाकायच्या आणि तडकवयाच्या असले उद्योग पण केले त्या मोहापायी. कधी ती पिक्चर स्टाईल[१] ने फुटलेली काच बघितलीये? क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी, भयाण अशी? मागे एकदा सांगितले होते न, की विकेंडला ऑफिस ला जाऊन बसतो मी. मला कामापेक्षा त्या एकांताचं अप्रूप जास्त. पूर्ण मजला रिकामा. फक्त माझ्या क्युबिकल वर उजेड. खोल खोल शांतता. आमचे ऑफिस आहे तिथे मागच्या बाजूला डोंगर रांग आहे. तिथून खूप वेगाने वारा वाहतो. त्या वाऱ्याचा आवाज बाथरूमच्या प्यानेल्स मधून घोंगावतो मधून मधून. अशा वातावरणात दुपार होऊन किर्...