डार्क नाईट राईजेस
मागच्या शानिवारी 'डार्क नाईट राईजेस' बघितला. नोलन च्या सिनेमांकडून जी अपेक्षा असते ती खचितच पूर्ण झाली. आपलासिनेमास्कोप वर याचे गणेश मतकरींचे सुंदर परीक्षण आहे. त्यावर ही माझी प्रतिक्रिया इथे परत टाकतोय.. ---- सही परीक्षण. >>"सुपरहिरोपट हे पहिल्या चित्रपटात हिरोच्या ओरिजिन विषयी सांगतात पण त्यानंतरचा भाग केवळ एकामागून एक येणा-या साहसांना दिलेला असतो." उलट मला वाटते की पहिला भाग रोचक करणे दुसऱ्या व तिसऱ्या भागाच्या मानाने सोपे असते. हिरोचे इवोल्युषण दाखवण्याचे ठराविक पॅटर्न दिसतात. या पॅटर्नशी प्रामाणिक राहिले तर हमखास यश. दुसरा, तिसरा भाग म्हणजे खूप विचार करून बनवलेली कथा असते. दुसरा भाग सरस असतो याच्याशी पूर्ण सहमत. नोलन चा बॅटमॅन पण त्यातलाच. त्याला वेगळे करतात ते त्याचे विलन आणि त्याचे मर्त्य असणे, त्याच्या मानवी चुका आणि त्यातून घडत जाणे. सुपरहिरोंचे सिनेमे पाहून 'मलाही अशा पॉवर्स असत्या तर' हा फील नोलन चा बॅटमॅनला पाहून कधी येत नाही. आणि या सिनेमात तर चक्क अंगावर काटा येण्याइतपत मारलंय हिरोला. नोलन चे आणखी एका बाबतीत कौतुक वाट...