सुपरमॅन ला नोलन टच : मॅन ऑफ स्टील
३० जून २०१३ सुपरमॅन च्या मला सगळ्या लीला आवडायच्या. स्वत: तर तो फिसिक्स चे सगळे नियम मोडायचाच पण त्याने मर्त्य मानवांबरोबर पण असे प्रकार केले की माझी चीडचीड व्हायची. उ. दा. लॉईस लेन ला त्याने कितीतरी वेळेला वादळी वेगाने येउन हवेतल्या हवेत उचलले होते. अशा वेगाने येवून एखाद्याला उचलून नेले तर विमानाला पक्षी धडकल्यावर पक्षाची जी अवस्था होते तशी लॉईस होणार नाही का?[१] एखादी गाडी उचलण्यापासून आक्क्खेचे आख्खे बेट उचलतानापण सुपरमॅन च्या चेहऱ्यावर सारख्याच वेदना आणि बाहुंमध्ये तेवढाच ताण. हा असेल पोलादी शरीराचा, पण याचे कपडे आग, वर्षा, चिखल, स्फोट अशा कुठल्याही आपत्तीनंतरही परीटघडीचे. हे सर्व पण ठीक. सर्वांवर कळस म्हणजे याने फक्त चष्मा लावला की लॉईस लेन सारखी पुलित्झर जिंकलेली पत्रकार माठ व्हायची आणि हाच तो आपल्याला वाचवणारा महापुरुष हे ओळखू शकत नव्हती. कैच्या कै. सुपरमॅन च्या या जगात त्याचे नियम मान्य करण्यावाचून पर्यायपण नसायचा. पण सुपरमॅन समोर हार मानेल तो नोलन कसला. त्याची निर्मिती, कथा असलेला आणि झॅक स्नायडर दिग्दर्शित मॅन ऑफ स्टील पाहिला. मूळ कॉमिक्स ला धक्का न लावता त्यांनी सुपरमॅन च्...