पोस्ट्स

जानेवारी, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बेल्जियम ची आठवण

इमेज
January 2016 बेल्जियम ला जायचेच असे काही ठरवले नव्हते. SAP परीक्षेची डेट तिसर्यांदा पुढे ढकलली तेव्हा ३ ऑप्शन होते. पोलंड, फ्रांस आणि बेल्जियम. ऑस्ट्रिया मध्ये परीक्षेचे केंद्र असूनही तिथे वेळ घेता येत नव्हती कारण जो कोर्स मी डूइसबुर्ग विद्यापीठातून केला होता त्यांचे काही नियम होते. पोलंड ला जायला बरीच कटकट होती. रायनएयर चे पर्याय शोधताना लक्षात आले की स्लोवाकिया मधल्या ब्रातीस्लावा  (Bratislava) शहरातून ब्रसेल्स ला जायला स्वस्त फ्लाईट आहेत. ब्रसेल्स ला दोन विमानतळ आहेत. एक मुख्य ब्रसेल्स आणि दुसरा शार्लरोय (Charleroi). ४१ युरो मध्ये रिटर्न फ्लाईट मिळाल्यामुळे लागलीच बुक केले. नंतर ८ जानेवारी ची परीक्षेची डेट घेतली. हे साधारण १०-११ डिसेंबर च्या दरम्यान केले. रिटर्न डेट १० जानेवारी होती. ब्रसेल्स पण पाहून होईल हा उद्देश. नंतर डीटेल मध्ये प्ल्यान करताना लक्षात आले की शार्लरोय ब्रसेल्स पासून ६० किलोमीटर आहे आणि तिथून ब्रसेल्स ला जाण्यासाठी शटल्स असतात. त्याचे भाडे १४ युरो. एक आठवडा आधी केले असते तर ५ युरो पडले असते. ऑस्ट्रिया मध्ये OEBB ट्रेन सर्विस आहे. त्यांचे वि...