पुतीनच्या वाट्याची सफरचंदे
दुपारी होस्टेल वर आल्याआल्या समोर सफरचंदाची पेटी दिसली. कदाचित कुणीतरी ठेवली असतील घेवून जायला. पण एवढी पेटीभर सफरचंदे कोण ठेवेल उगाच असे वाटून मी घेतली नाहीत. वर आल्यावर रेक्टर काकूंनी विचारले.. ल्युबिश याब्लक? उम्म.. ताक. दोन सेकंद तर्क लावला..चल्ला फुकटची सफरचंदे. रूम वर आल्यावर पिओतेक ला विचारले. काकूंचा वाढदिवस वगैरे आहेका फुकटची सफरचंदे वाटायला? त्याने मोठ्या प्रयासाने शब्दाला शब्द जोडून सांगितले - रशिया ने युक्रेन वर २०१४ मध्ये हल्ला करून क्रीमिया विलीन करून घेतले. त्याचा निषेध म्हणून पाश्चात्य जगाने, म्हणजे अमेरिका व नेटो देशांनी रशियावर व्यापारी बंधने लादली. आता असल्या बंधनांना मानेल तो पुतीन कसला. रशियाने पण आपली चाल म्हणून युरोप कडून आयात होणार्या बहुसंख्य अन्न पदार्थावर बंदी घातली. त्यात पोलंड च्या सफरचंदांची लागली. रशिया पोलंडच्या ५० टक्क्याहून जास्त सफरचंदांची आयात करतो. पोलंड ला या व्यापारातून ५०० मिलियन युरो मिळतात. आता जर रशिया घेत नाही, तर एवढ्या सफरचंदांचं करायचे काय? म्हणून पोलंड च्या उत्पादकांनी ही जास्तीची सफरचंदे सरळ सरळ फुकट वाटायला चालू केलीयेत. गावागावा...