धरलं तर चावतंय
चित्रपट डाऊनलोड करून पाहू नये, चित्रपटगृहातच बघावा असा विचार करणाऱ्या लोकांबद्दल तुम्ही काय म्हणाल? उत्तर देण्याआधी प्रश्नकर्त्याला नक्की काय अभिप्रेत आहे ते पाहावे लागेल. हा प्रश्न नक्कीच पांढरा-काळा प्रकारातला नाही. परिस्थितीनुरूप उत्तर बदलू शकते. प्रयत्न करतो. इथे डाउनलोड करून पाहणे म्हणजे "पायरेटेड प्रत बघणे" असा अर्थ असेल तर मी त्याच्या 80% विरोधात आहे. बाकीचे 20 टक्के कुठे गेले समजण्यासाठी पूर्ण उत्तर वाचावे लागेल. जर स्ट्रीमिंग सेवा जसे नेटफ्लिक्स, हॉटस्टार, ऍमेझॉन प्राईम, झी5 वर चित्रपट पाहायचा असेल तर काहीच हरकत नसावी. गूगल प्ले वर देखील अतिशय रास्त दरात भाड्याने सिनेमा उपलब्ध करून देते. अशावेळी आपण या स्ट्रीमिंग माध्यमांनी सिनेमा बघितला तर त्याचा योग्य मोबदला निर्मात्यां ना मिळत असतो. ललित प्रभाकर, सोनाली कुलकर्णी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्राजक्ता माळी चा हम्पी हा सुंदर सिनेमा बघण्यासाठी मी झी5 चे वर्षभराचा रतीब घेतला. संभाजी आणि चला हवा येऊ द्या ब्रेक फ्री बघता येते आणि याच्या नवऱ्याची त्याची काय ते आईला मोबाईल वर लावून देऊन पैसे वसूल करतो. बाहुबली, पानिपत किंवा...