पुण्याला शाप-PMPML
पुणे शहराची वाट लागली आहे हे सांगण्यासाठी आता अगदी मकेंझी लावण्याची गरज नाही. जमिनीच्या किमती अवाच्या सवा वाढायला लागल्यावर पुणे मागे पडायला सुरुवात झाली. मागे यासाठी की ज्या पद्धतीने पुण्याचा विस्तार होतोय आणि पायाभूत सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष झालंय ते पाहता पुणे आता आपली गमावलेली पत मिळवणार नाही. मला हा साक्षात्कार एकदम का झाला असा प्रश्न पडू शकतो. नाही, मी सिंगापूर, शांघाय किंवा कुठल्याही पाश्चात्य देशात जावून आलो नाही. मी जवळ जवळ गेले वर्षभर बँगलोर ला होतो. असे म्हणतात की बँगलोर बरेच पुण्यासारखे आहे. मलापण हे साम्य जाणवले. त्याच शासकीय संस्था, कॅन्टोनमेंट चे प्रभाग, मोठ्या शिक्षण संस्था, नवी जन्मलेली आयटी पिढी. पण बँगलोर वाढले. नुसतेच वाढले नाहीये, तर सजग पणे वाढले. तिथे आजिबात ट्राफिक जाम नाही? आहे. पण लवकरच ते सुरळीत होईल. तिथे मोठाले शंभर फुटी रोड आहेत. जागोजागी फ्लायओवर बांधले जातायेत. मेट्रो पूर्णपणे कार्यान्वित होईल तेव्हा बंगलोरची वाहतूक ही भारतातल्या इतर शहरांना आदर्श ठरणार यात मला मुळीच शंका नाही. कुठल्याही शहराची वाहतूक व्यवस्था हा त्या शहराचा कणा असतो. मा...