गुणांचे बलाबल की दैवाची सूत्र : DNA
आज रविवार 1 डिसेंबर 2019 या दिवशी मी ऍमेझॉन प्राईम वर दुपारी "DNA" हा मराठी चित्रपट पाहिला. तळटीपांमध्ये ट्रेलर आणि प्राईम ची लिंक दिली आहे. पुढील उत्तरात स्पॉयलर नाहीत पण थोडा कथाभाग सांगितला आहे. त्यामुळे ज्यांना सिनेमा अगदी "सरप्राईज, सरप्राईज" पद्धतीने पाहायचा असेल त्यांनी सिनेमा उत्तर वाचण्याआधी बघा. चित्रपटाची कथा सुरू होते यतीन आणि कांचन या दाम्पत्याच्या घरी. दोघेही हार्वर्ड मधून उच्चविद्याविभूषित. दोघांचेही घराणे असेच विद्वत्तेच्या बाबतीत तोलामोलाचे असे त्यांच्या संवादातून आणि काही सूचक प्रसंगातून समजते. हे या दोघांचे असे असामान्य असणे हा चित्रपटाचा एक धागा आहे. अमेरिकेत मोठ्या घरात सुखवस्तू जीवन जगताना त्यांना अनिल आणि मेधा या जोडप्याची मित्र म्हणून साथ आहे. या "दृष्ट लागण्या जोगे सारे" संसाराला दुःखाची किनार येतेच. कांचनच्या दुसऱ्या गर्भपातानंतर डॉक्टरांना समजते की काही जनुकीय आजारामुळे तिला आई होता येणे कठीण आहे. या घटनेमुळे कांचन पुरती हबकली आहे. आजपर्यंत प्रयत्नांती काहीही मिळवू शकेन या तिच्या दुर्दम्य महत्त्वाकांक्षेला या एका गोष्टीने पार प...