ते देवाचं असतं !
बोल्हाईचे मटण काय असते? पुण्याजवळ वाघोलीच्या पुढे वाडेबोल्हाई हे गाव आहे. तेथील बोल्हाई देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. पुण्याजवळच्या गावांतील काही कुटुंबांना या देवीचे काही नियम लागू होतात. याला देवी आहे असे म्हणतात. उदाहरण म्हणजे माझ्या कुटुंबाला बोल्हाई आहे. या देवीला शेळी (बेकरीचे) बळी चालत नाही. मेंढी चालते. साहजिकच ज्या कुटुंबाना ही देवी आहे त्यांना बेकरीचे मटन वर्ज्य असते. म्हणजे आमच्या कुटुंबात कधीच शेळीचे मटण खात नाहीत. तसे पाहिले तर मटणच फार कमी वेळा होते पण खाल्लेच तर मेंढीचेच. माझी आजी तर असे म्हणायची की या बोल्हाई असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना शेळीच्या मटणाचे खरकटे पाणी देखील ओलांडायचे नसते. जर शेळीचे मटण खाण्यात आले तर शरीरावर काहीतरी पुरळ, खाज या स्वरूपात प्रतिक्रिया उठतात. नंतर बोल्हाईला जाऊन काहीतरी विधी करावे लागतात. हे असे असल्यामुळे या व्यक्ती शेळीच्या मटणाच्या खानावळी हॉटेल्स टाळतात. त्यामुळे जसे काही हॉटेल्स वर जसे "शुद्ध शाकाहारी" लिहिलेले असते तसे काही ठिकाणी "फक्त बोल्हाई चे मटण" अशी पाटी असते. उद्देश हाच की हे शुद्ध बोल्हाई वाल्या लोकांच...