पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एका तेलियाने

इमेज
मी मागच्याच आठवड्यात "एका तेलियाने" हे गिरीश कुबेरांचे पुस्तक वाचले. सौदी अरेबिया, व्हेनेझुएला, लिबिया, कुवेत, इराण इत्यादी तेलउत्पादक देशांचा २० व्या शतकातला संक्षिप्त इतिहास वाचायला आवडणार असेल तर तुमच्यासाठी हे चांगले पुस्तक आहे. पश्चिम आशियातल्या मागास टोळीवाल्या देशांमध्ये विसाव्या शतकातच्या सुरुवातीला खनिज तेल मिळाल्यानंतर तिथले झालेले बदल; अमेरिका, ब्रिटन, फ्रांस, सोविएट रशिया या तात्कालीन बड्या राष्ट्रांमध्ये या नवीन संपत्तीवर वर्चस्व मिळवण्यासाठी चालू असलेली रस्सीखेच; इस्राएल, पॅलेस्टिन, इजिप्त, लिबिया, सीरिया यांचा या खेळामध्ये केला गेलेला वापर, युद्ध, तह, हेरगिरी; ते तेल विकून मिळालेल्या अमर्याद संपत्तीचा उपभोग घेणारे शेख यांच्या अजब कहाण्या या पुस्तकात आहेत. पुस्तकाचा आवाका मोठा असला तरी त्यात क्लिष्टता नाही वाटली. आणि या पुस्तकाची सर्वात आवडलेली बाब म्हणजे या सर्व घटनांना एक हिरो देखील आहे. सौदी अरेबियाचा तेलमंत्री म्हणून कारकीर्द गाजवलेले झाकी यामानी हे या पुस्तकाचे नायक. अरब तेलावर पोसलेल्या पाश्चात्य विकसित देशांच्या तेल कंपन्यांना त्यांच्याच पद्धतीने वठणीव...

साधू संत येति घरा..

इमेज
पूर्वी जसे समर्थ महाराज, साईबाबा आणि असे बरेच संत महात्मे होऊन गेले, तसे लोक आता का दिसत नाहीत? इतके सामर्थ्यवान सध्या कोणी आहेत का? चांगला विचार करायला लावणारा प्रश्न आहे. मला याची पुढील कारणे दिसतात : १. साधुसंत ज्या काळात झाले त्या काळात त्यांच्या हयातीत आसपासच्या लोकांना सोडून किती जणांना हा माणूस सिध्दपुरुष आहे, संत आहे किंवा साधू आहे हे समजले असेल? या सिद्धपुरुषांनी आपले अवतारकार्य संपवल्यावरच त्यांच्या बऱ्याचशा महिमा त्यांच्या अनुयायांकडून इतर समाजाला समजल्या असतील, वास्तविकतेला कल्पनेची, गद्याला पद्याची जोड मिळून त्यांची कीर्ती सर्वदूर पोहोचली असेल. कस्तुरी मृगाला जसे स्वतःच सुगंधाचा स्रोत आहोत हे समजत नाही, तसेच वर्तमानात देखील आजूबाजूला असे सिध्दपुरुष असतीलही पण आपल्याला ते कळणार नाही किंवा उशिरा समजेल. इतिहासात बरेचदा हेच पाहायला मिळते कि महापुरुषांना खांद्यावर घेऊन नाचणाऱ्यांपेक्षा त्यांच्या मार्गात धोंडे घालणारेच जास्त असतात. किंबहुना अशा धोंडे घालणाऱ्या परिस्थितींवर ते मात करतात म्हणूनच भविष्यकाळात त्यांना महापुरुष म्हणून ओळखले जाते. वर्तमानात असे 'In Progress' मह...