चिमणी उडाली भुर्रर्र
प्रश्न : संस्कृतवर केवळ ब्राह्मणांचाच अधिकार का राखून ठेवला गेला? ब्राह्मणांव्यतिरिक्त इतर समाजाच्या लोकांनी संस्कृत भाषेचा कधीच वापर केला नाही का? भूतकाळातले सोडा या लोकांनी नवीन भाषेवर अधिकार स्थापन केलाय. ---- मी ब्राह्मण समाजातला नाही. ---- मला वाटते "संस्कृतवर केवळ ब्राह्मणांचाच अधिकार होता" हे ना एक ब्लँकेट स्टेटमेंट आहे. म्हणजे एखाद्याला हवा तोच निष्कर्ष काढण्यासाठी केलेले सरसकट विधान. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत बहुजनांमध्ये "शिकून कोणाचं भलं झालंय" हे वाक्य फार प्रचलित होते. म्हणजे एकंदरीत शिक्षणाबद्दल उदासीनताच होती. आणि संस्कृत शिकून कोणी फार मोठा विद्वान वा धनी झाला अशीही परिस्थिती नव्हती. येऊनजाऊन भिक्षुकीची विद्या. एखादी तात्काळ पोटापाण्याची व्यवस्था करू शकणार नाही अशी कला शिकून त्यात पारंगत होणे याला समर्पण वृत्ती लागते. ती ज्यांनी दाखवली त्यात त्यांना कौशल्य प्राप्त होते हे साधे गणित आहे. जिथे बहुसंख्य समाज रोजीरोटीचा मागे लागला होता अशात यात कोण कशाला संस्कृतवर अधिकार वगैरे राखून ठेवणार डोम्बल्याचे. ---- आता गम्मत सांगतो. ५० वर्षांनी हा प्रश्न ज्...