पोस्ट्स

2023 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आजोबांनी गिरवले सत्तरीत संगणकाचे धडे आणि बनले सॉफ्टवेयर डेव्हलपर

इमेज
 सुहास पाटील हे नाव जागतिक विव्दान आणि उद्योजकांमध्ये आदराने घेतले जात असले तरी सर्वसामान्य मराठी घरांमध्ये क्वचितच माहित असेल.  सुहास पाटील यांचा जन्म एका मराठी कुटुंबात जमशेदपूर येथे १९४४ मध्ये झाला. वडील श्रीकृष्ण पाटील हे टिस्को (टाटा स्टील) मधील अभियंते. छोट्या सुहास ला वडिलांच्या प्रतिभेचा वारसा होता. सुहासने स्वतंत्र भारतात नव्याने स्थापन झालेल्या भारतीय प्राद्योगिकी संस्थान म्हणजे आयआयटी मधून पदवी मिळवून अमेरिकेच्या प्रथितयश एमआयटी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. १९७० साली पीएचडी मिळवळी. त्यांनी १९८१ साली अमेरिकेच्या सॉल्ट लेक सिटी या शहरात पाटील सिस्टिम्स नावाची संगणकाचे सुटे भाग बनवणारी कंपनी काढली. आज ही कंपनी सिरस लॉजिक (Cirrus Logic) या नावाने ओळखली जाते. पावणेचार हजारापेक्षा जास्त पेटंट्स मिळवलेली हि कंपनी सिलिकॉन व्हॅलीतील प्रमुख कंपन्यांपैकी एक आहे. अशा या कर्तबगार सुहास चे वडील - श्रीकृष्ण पाटील हे आपल्या मुलासोबत राहण्यासाठी सत्तरच्या दशकात अमेरिकेत गेले. स्वतःच्या रेडिओ दुरुस्त करण्याच्या छंदाला आणखी पुढे नेत आपल्या लेकाच्या या घरी संगणक पहिल्यांदा शिकले. ज्या देश...

धटुकले मोदीजी

इमेज
"आजच्या चांद्रयान 3 मोहिमेतील लँडर उतरविण्याचा जो शेवटचा टप्पा पार पडला त्यात टिव्ही स्क्रीनवर इस्रोचे वैज्ञानिक कमी आणि प्रचार मंत्री मोदीच जास्त का दाखवले जात होते? की ही एक 2014 च्या प्रचाराचा भाग आहे?" कोरा. कॉम वर कोणीतरी हा प्रश्न विचारला आहे. त्या प्रश्नाला माझे उत्तर- या प्रश्नातली खोचकता एक वेळ बाजूला ठेवू. मला देखील एकवेळ वाटले कि अगदी साऊथ आफ्रिकेत महत्वाच्या BRICS परिषदेतून वेळ काढून शेवटच्या मिनिटाला मोदींनी ISRO च्या कंट्रोल सेंटर ची अर्धी स्क्रीन व्यापायची काय गरज होती? ते तिथे असले नसले तरी त्या विक्रम लॅण्डर काही एक फरक पडला नसता. विरोधक म्हणतात तसे "स्वतःचा फोटो काढण्याची" उत्सुकता दुसरे काय? हो ना? पण एक गोष्ट लक्षात घ्या. २०१९ मध्ये मोदी स्वतः चांद्रयान २ च्या वेळी देखील इसरो च्या कन्ट्रोल रूम मध्ये प्रत्यक्ष होते. आणि लॅण्डर फेल गेल्यावर भारतद्वेष्ट्या गँग कडून प्रचंड ट्रोलिंग झाले होते. चांद्रयान ३ च्या वेळी देखील विक्रम लॅण्डर फेल होण्याची भरपूर शक्यता होती. अवकाश आहे ते. भले भले गडी अगदी नासा आणि स्पेसेक्स पासून चीनची CNSA च्या मिशन नियमितपणे...

चिमणी उडाली भुर्रर्र

इमेज
प्रश्न :  संस्कृतवर केवळ ब्राह्मणांचाच अधिकार का राखून ठेवला गेला? ब्राह्मणांव्यतिरिक्त इतर समाजाच्या लोकांनी संस्कृत भाषेचा कधीच वापर केला नाही का? भूतकाळातले सोडा या लोकांनी नवीन भाषेवर अधिकार स्थापन केलाय. ---- मी ब्राह्मण समाजातला नाही. ---- मला वाटते "संस्कृतवर केवळ ब्राह्मणांचाच अधिकार होता" हे ना एक ब्लँकेट स्टेटमेंट आहे. म्हणजे एखाद्याला हवा तोच निष्कर्ष काढण्यासाठी केलेले सरसकट विधान. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत बहुजनांमध्ये "शिकून कोणाचं भलं झालंय" हे वाक्य फार प्रचलित होते. म्हणजे एकंदरीत शिक्षणाबद्दल उदासीनताच होती. आणि संस्कृत शिकून कोणी फार मोठा विद्वान वा धनी झाला अशीही परिस्थिती नव्हती. येऊनजाऊन भिक्षुकीची विद्या. एखादी तात्काळ पोटापाण्याची व्यवस्था करू शकणार नाही अशी कला शिकून त्यात पारंगत होणे याला समर्पण वृत्ती लागते. ती ज्यांनी दाखवली त्यात त्यांना कौशल्य प्राप्त होते हे साधे गणित आहे. जिथे बहुसंख्य समाज रोजीरोटीचा मागे लागला होता अशात यात कोण कशाला संस्कृतवर अधिकार वगैरे राखून ठेवणार डोम्बल्याचे. ---- आता गम्मत सांगतो. ५० वर्षांनी हा प्रश्न ज्...

लोक उदरनिर्वाहासाठी व्हिडिओ गेम खेळून पैसे कसे कमवतात?

इमेज
लोक उदरनिर्वाहासाठी व्हिडिओ गेम खेळून पैसे कसे कमवतात? प्रत्येक क्षेत्रामध्ये गुणवत्तेची, कौशल्याची आणि त्यातून होणाऱ्या अर्थार्जनाची उतरंड असते. ज्यांचे कौशल्य जास्त, संधी जास्त, नशीब बलवत्तर असे लोक या पिरॅमिड च्या वरच्या भागात असतात आणि ज्यांच्याकडे या गोष्टी कमी प्रमाणात असतात तसे तसे हे लोक या पिरॅमिड च्या खालच्या भागात असतात जिथे कौशल्य, संधी, नशीबाची साथ यापैकी काहीतरी कमतरता असते आणि त्यामुळे पैसे देखील कमी असतात. क्रिकेटचे उदाहरण घेतले तर काही शे आयपीएल लेवल चे क्रिकेटर सोडले तर क्रिकेट खेळून उदरनिर्वाह चालवतोय असे आपल्या आजूबाजूला कमीच लोक दिसतील. तसेच गेमिंग चे देखील आहे. आधुनिक युगात व्यावसायिक गेमर बनून पैसे कमावणे अगदीच अशक्य नाही. तरी ते एक करियर ऑप्शन होऊ शकते का याबाबत मलातरी शंकाच आहेत. मला वाटते अगदी कुमार वयात करियर निवडताना आवडी बरॊबरच आपण त्या क्षेत्रातील हजारावी, दहा हजारावी, एक लाखावी, दहा लाखावी कुशल व्यक्ती जर झालो तर आपल्याला त्यातून किती अर्थार्जन करता येईल याचा विचार व्हावा. उदाहरणार्थ कुणी अभिनय हा करियर पर्याय म्हणून विचार करत असेल तर पहिल्या दहा अभिनेत...

आधुनिक काळातील शिक्षण आणि रोजगार

इमेज
Quora.com प्रश्न -  आपण शिक्षण का घेतो, शिक्षणावर एवढा पैसा खर्च करून काही उपयोग आहे का? उत्तर -  माझ्या मते पालकांनी आपापल्या ऐपतीप्रमाणे जास्त ओढाताण न करता मुलांचे पदवीपर्यंत शिक्षण करावे. पदवी मिळवण्यासाठी कर्ज करून शिक्षणसम्राटांच्या मढ्यावर पैसे घालू नयेत. शिक्षणाचा उपयोग आहे. पण शिक्षण आणि पदवीचे ढेंडोळे यात फरक आहे. आताच्या काळामध्ये नोकऱ्या मिळवण्यासाठी कौशल्य जास्त महत्त्वाचे आहे. IIT, NIT, IIM सारख्या संस्थेमध्ये पदवी असेल तरच त्या कॉलेज च्या नावाचा काहीतरी उपयोग आहे. आणि या कॉलेजेस मध्ये, बुद्धिमत्तेच्या बळावर ऍडमिशन मिळत असेल तर तो विद्यार्थी पालकांनी थोडा ताण घेऊन शिक्षण पूर्ण करण्याच्या लायकीचा आहे हा एक सरधोपट नियम समजा. या कॉलेजेस व्यतिरिक्त कुठेही फार जास्त पैसे करून शिक्षणाच्या मागे लागू नये. मग काय शिक्षण सोडून द्यायचे? नाही. पदवीपर्यंत शिक्षण वाजवी दरात उपलब्ध आहे अशा संस्थेमधून करावे. वाचलेले पैसे वापरून, पदवी करता करता कोणताही व्यावसायिक कोर्स करावा. प्लम्बर, मेकॅनिक, फर्निचर काम, इलेक्ट्रिशियन, कॉम्प्युटर हार्डवेयर, सिस्टिम ऍडमिनिस्ट्रेटर असे कोर्स करून...

माणूस मोठा मानावा की पैसा?

इमेज
माणूस मोठा मानावा की पैसा मोठा म्हणावा? पैसा वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी केलेली एक योजना, एक अवजार, एक साधन आहे. माणूस मोठा कि हातोडा मोठा? हा प्रश्न का नाही विचारला जात बरे? जिथे खिळे ठोकण्याचे काम आहे तिथे हातोडा मोठा. तिथे माणूस कितीही चांगला असला तरी काय उपयोग?

सध्याचा लॅपटॉप

इमेज
तुम्ही सध्या कोणता लॅपटॉप वापरत आहात? मी सध्या डेल चा G15 5511 गेमिंग लॅपटॉप वापरत आहे. लॅपटॉप गेमिंग चा असला तरी याच्यावर अजून तरी कुठलीच गेम खेळलो नाही. मला ग्राफिक्स साठी बरा असा लॅपटॉप पाहिजे होता. याचे स्पेसिफिकेशन्स चांगले आहेत. जून २०२२ मध्ये घेतला तेव्हा ७२ हजाराच्या आसपास किंमत होती. Intel I5-11260H 16Gb, 512Gb, Nvidia RTX 3050 (4Gb GDDR6) Dell G15 5511 Gaming Laptop Intel I5-11260H 16Gb, 512Gb, Nvidia RTX 3050 (4Gb GDDR6) Windows 11+MSO'21, 15.6"(39.62Cms) FHD WVA AG 250 Nits 120Hz, Orange Backlit Kb, (D560824WIN9B, 2.65Kg) i5-11260H | 16GB DDR4 | 512GB SSD | Win 11 + Office H&S 2021 | NVIDIA GEFORCE RTX 3050 (4GB GDDR6) | 15.6" FHD WVA AG 250 nits 120Hz Narrow Border | Backlit Keyboard Orange | 1 Year Onsite Hardware Service | Dark Shadow Grey https://amzn.to/3KYe35N Canva, Blender 3D, Movavi Video editor असे सॉफ्टवेयर बऱ्यापैकी वापरतो. आणि या लॅपटॉपवर ते चांगले चालतात. Blender अक्षतच्या डिझाइन्स साठी वापरले आहे. Canva आणि Movavi देखील ऍड कॅम्पेन साठी वापर...

एका तेलियाने

इमेज
मी मागच्याच आठवड्यात "एका तेलियाने" हे गिरीश कुबेरांचे पुस्तक वाचले. सौदी अरेबिया, व्हेनेझुएला, लिबिया, कुवेत, इराण इत्यादी तेलउत्पादक देशांचा २० व्या शतकातला संक्षिप्त इतिहास वाचायला आवडणार असेल तर तुमच्यासाठी हे चांगले पुस्तक आहे. पश्चिम आशियातल्या मागास टोळीवाल्या देशांमध्ये विसाव्या शतकातच्या सुरुवातीला खनिज तेल मिळाल्यानंतर तिथले झालेले बदल; अमेरिका, ब्रिटन, फ्रांस, सोविएट रशिया या तात्कालीन बड्या राष्ट्रांमध्ये या नवीन संपत्तीवर वर्चस्व मिळवण्यासाठी चालू असलेली रस्सीखेच; इस्राएल, पॅलेस्टिन, इजिप्त, लिबिया, सीरिया यांचा या खेळामध्ये केला गेलेला वापर, युद्ध, तह, हेरगिरी; ते तेल विकून मिळालेल्या अमर्याद संपत्तीचा उपभोग घेणारे शेख यांच्या अजब कहाण्या या पुस्तकात आहेत. पुस्तकाचा आवाका मोठा असला तरी त्यात क्लिष्टता नाही वाटली. आणि या पुस्तकाची सर्वात आवडलेली बाब म्हणजे या सर्व घटनांना एक हिरो देखील आहे. सौदी अरेबियाचा तेलमंत्री म्हणून कारकीर्द गाजवलेले झाकी यामानी हे या पुस्तकाचे नायक. अरब तेलावर पोसलेल्या पाश्चात्य विकसित देशांच्या तेल कंपन्यांना त्यांच्याच पद्धतीने वठणीव...

साधू संत येति घरा..

इमेज
पूर्वी जसे समर्थ महाराज, साईबाबा आणि असे बरेच संत महात्मे होऊन गेले, तसे लोक आता का दिसत नाहीत? इतके सामर्थ्यवान सध्या कोणी आहेत का? चांगला विचार करायला लावणारा प्रश्न आहे. मला याची पुढील कारणे दिसतात : १. साधुसंत ज्या काळात झाले त्या काळात त्यांच्या हयातीत आसपासच्या लोकांना सोडून किती जणांना हा माणूस सिध्दपुरुष आहे, संत आहे किंवा साधू आहे हे समजले असेल? या सिद्धपुरुषांनी आपले अवतारकार्य संपवल्यावरच त्यांच्या बऱ्याचशा महिमा त्यांच्या अनुयायांकडून इतर समाजाला समजल्या असतील, वास्तविकतेला कल्पनेची, गद्याला पद्याची जोड मिळून त्यांची कीर्ती सर्वदूर पोहोचली असेल. कस्तुरी मृगाला जसे स्वतःच सुगंधाचा स्रोत आहोत हे समजत नाही, तसेच वर्तमानात देखील आजूबाजूला असे सिध्दपुरुष असतीलही पण आपल्याला ते कळणार नाही किंवा उशिरा समजेल. इतिहासात बरेचदा हेच पाहायला मिळते कि महापुरुषांना खांद्यावर घेऊन नाचणाऱ्यांपेक्षा त्यांच्या मार्गात धोंडे घालणारेच जास्त असतात. किंबहुना अशा धोंडे घालणाऱ्या परिस्थितींवर ते मात करतात म्हणूनच भविष्यकाळात त्यांना महापुरुष म्हणून ओळखले जाते. वर्तमानात असे 'In Progress' मह...

कर्म आणि दैव

इमेज
मला पूजा करत बसणे, देव देव करत बसणे जास्त आवडत नाही "कर्म चांगले तर सर्व चांगले" असं माझं मत आहे. खरा देव काय हे या पूजा करणाऱ्यांना कळत नाही पण हे सांगायला गेलं की लोक मला वेड्यात काढतात. मी काय केले पाहिजे सर्व नमुने लोक भरलेत माझ्या अवती भोवती? 🙄 https://qr.ae/prGZjm एका व्याख्यानात[1] खालील कथा ऐकली होती. या विषयाला अनुसरून आहे म्हणून सांगतो. एकदा एक प्रख्यात डॉक्टर एका वेड्यांच्या हॉस्पिटल मध्ये जातात. हॉस्पिटल मधले सर्वात 'शहाणे' वेडे म्हणून तीन वेड्यांना त्यांच्यासमोर उभे केले जाते. या तिघांना डॉक्टर साहेब सांगतात "माझ्या प्रश्नाचे तुमच्यापैकी जो कोणी बरोबर उत्तर देईल त्याला हा आता बरा झाला आहे या सर्टिफिकेट सहित या हॉस्पिटल मधून आम्ही घरी सोडू". तिघेही वेडे कान टवकारतात. डॉक्टर प्रश्न विचारतात - ३ गुणिले ३ किती? पहिला वेडा - सोप्पंये ३ गुणिले ३ डाळिंब. या तिघांना 'शहाणे' म्हणून डॉक्टरांसमोर आणणाऱ्या जुनियर डॉक्टर कडे मोठे डॉक्टर रागाने बघतात. दुसरा वेडा - ३ गुणिले ३ बरोबर मंगळवार. आता मात्र तिथले जुनियर डॉक्टर आणि वॉर्डबॉय दोघांच्या कपाळावर ...

झी झर चे खुळ

इमेज
आजकाल महिला आणि पुरुष सोशलमीडियावर आपल्या नावा समोर '(he/him/his)' किंवा '(she/her)' लावतात, हे काय प्रकरण आहे? छोटे उत्तर - मागच्या काही वर्षात हे "प्रेफर्ड प्रोनाउन्स" (Preferred Pronouns) ची टूम पाश्चात्य राष्ट्रांमध्ये काही गटांमधून निघाली. तर या गटांचे म्हणणे असे आहे की एखादा पुरुषाला तो स्त्री आहे असे वाटू शकते. तसेच एखाद्या स्त्रीला तो पुरुष आहे असे वाटू शकते. एखाद्याने लिंगबदल करून घेतले असेल, आणि एखाद्याला पुरुष किंवा स्त्री दोन्हीही संबोधने नकोशी वाटतील. तर अशा लोकांना समाजाने समजून घ्यावे आणि त्यांनी स्वतः सांगिलेल्या संबोधनाने ओळखावे. त्यातून She, Her, He, Him या सामान्यपणे वापरलेल्या संबोधनाबरोबर काही लोक they, them, it वापरातायेत आणि काहींनी चक्क zer, ze अशी मनमानी संबोधने शोधली. आणि सध्या परिस्थिती अशी आहे कि अशी स्वघोषित ७० संबोधने आहेत. ज्यांची भावना "आईंग?" अशी झाली असेल त्यांच्यासाठी मोठे उत्तर - मी हे प्रकरण गेल्या ४-५ वर्षांपासून फॉलो करत आहे त्यामुळे याची बऱ्यापैकी कल्पना आहे. आपल्या इथे हे आत्ता आत्ता पोचले आहे. पण पाश्चात्य वि...