पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बूम बूम रोबो दा.. रोबो दा.. Robot

इमेज
१. एक रोबॉट मानवाला इजा करत नाही , अथवा निष्क्रीय राहून मानवाला इजा होऊ देत नाही. २. एक रोबॉट मानवाच्या सगळ्या आज्ञांचे पालन करतो, जोवर या आज्ञांमुळे पहिल्या नियमाचे उल्लंघन होत नाही. ३. एक रोबॉट स्वतःच्या अस्तित्वाचे रक्षण करतो, जोवर ते करताना पहिल्या किंवा दुसऱ्या नियमाचे उल्लंघन होत नाही. डॉ. वसीकरण म्हणजे आपला सुपरस्टार रजनीकांत, चा रोबॉट (इंधिरण), चिट्टी.. या नियमांना अनुसरून बनवण्यात आलेला नाही. कारण त्याला भारतीय लष्करासाठी, शत्रूला संपवण्यासाठी बनवण्यात आलेला आहे. आयझक असिमोव्ह ने उधृत केलेल्या रोबोटिक्स च्या वरील नियमांना बगल दिली तर तर काय होऊ शकते, हा विषय नवीन नाहीये. विल स्मिथच्या I Robot मध्ये आपण ते पाहिलेही आहे. I Robot मध्ये, भावना असलेला रोबॉट (Sonny) पण होता आणि तद्दन तर्कसंगत विचार करून या नियमांना झुगारून देणारी WIKI पण होती.. होता.. जे असेल ते.. पण मानवाला मुळात एका यंत्रात भावना देण्याची गरजच का पडावी..? हा प्रश्न माझ्या माहितीत तरी हॉलीवूड ने हि हाताळला नाही. शंकर चा हा सिनेमा, माझ्यासाठी इथेच वेगळी पातळी गाठतो. एका प्रसंगामधून अगदी नेमकेपणाने या प्रश्नाच