पोस्ट्स

ऑगस्ट, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

धटुकले मोदीजी

इमेज
"आजच्या चांद्रयान 3 मोहिमेतील लँडर उतरविण्याचा जो शेवटचा टप्पा पार पडला त्यात टिव्ही स्क्रीनवर इस्रोचे वैज्ञानिक कमी आणि प्रचार मंत्री मोदीच जास्त का दाखवले जात होते? की ही एक 2014 च्या प्रचाराचा भाग आहे?" कोरा. कॉम वर कोणीतरी हा प्रश्न विचारला आहे. त्या प्रश्नाला माझे उत्तर- या प्रश्नातली खोचकता एक वेळ बाजूला ठेवू. मला देखील एकवेळ वाटले कि अगदी साऊथ आफ्रिकेत महत्वाच्या BRICS परिषदेतून वेळ काढून शेवटच्या मिनिटाला मोदींनी ISRO च्या कंट्रोल सेंटर ची अर्धी स्क्रीन व्यापायची काय गरज होती? ते तिथे असले नसले तरी त्या विक्रम लॅण्डर काही एक फरक पडला नसता. विरोधक म्हणतात तसे "स्वतःचा फोटो काढण्याची" उत्सुकता दुसरे काय? हो ना? पण एक गोष्ट लक्षात घ्या. २०१९ मध्ये मोदी स्वतः चांद्रयान २ च्या वेळी देखील इसरो च्या कन्ट्रोल रूम मध्ये प्रत्यक्ष होते. आणि लॅण्डर फेल गेल्यावर भारतद्वेष्ट्या गँग कडून प्रचंड ट्रोलिंग झाले होते. चांद्रयान ३ च्या वेळी देखील विक्रम लॅण्डर फेल होण्याची भरपूर शक्यता होती. अवकाश आहे ते. भले भले गडी अगदी नासा आणि स्पेसेक्स पासून चीनची CNSA च्या मिशन नियमितपणे