Thursday, September 1, 2011

सावळा गोंधळ!!


मी लहान असताना.. म्हंजे आता काही फार मोठा झालोय अशी गोष्ट नाहीये, पण शरीराने लहान असताना..
रविवारी
संध्याकाळी मराठी सिनेमा लागायचा दूरदर्शन वर. जर जुना कृष्णधवल पिक्चर असला तर थोडे बोर व्हायचे, कारण आम्हा सगळ्या पिल्लावळीला लक्ष्याचे 'इनोदी' सिनेमे लय आवडायचे. तरीपण फॉर चेंज, हे सिनेमे पण बघायचो. त्यात जर कथेला गावरान बाज असेल तर एक पात्र नेमकं असणारच. ते म्हणजे, तिरकस डोक्याचा सरपंच नाहीतर सावकार. संपतराव हे नाव माझ्या डोक्यात दुष्ट मनुष्य चे समानार्थी बनले आहे हे त्यामुळेच. हा संपतराव साकारावा तो राजशेखर या गुणी अभिनेत्यानेच. त्यांची बेरकी नजर आणि कारस्थानी हावभाव.. डोक्यात तिडीकच जायची, अस्सा राग यायचा म्हणून सांगू.. सदमा चा शेवट बघून रडण्याचे दिवस ते, पुढे जशी समज यायला लागली तशी या संपतरावला एन्जॉय करायची पण सवय लागली. त्याचे टिपिकल डायलॉग - "गावात नवीन पाखरू आलं वाटतं", "लय मस्ती भरली अंगात".. मजा यायची. मग जसे कॉलेज चे दिवस सुरु झाले, मग हे डायलॉग मित्रांमध्ये कॉमन झाले.
अतुल हा माझ्या खास मित्रांपैकी एक. हा पोरगा बरोबर असला तर कुणाला बोर होवू शकत नाही. त्याचे किस्से ऐकतच राहावे. अचाट शब्द वापरायचा. त्याचे ते पेटंटेड शब्द ऐकूनच मजा वाटायची. किस्से म्हंजे असे.. "त्या दिवाळीला बाप्पूस (वडील) बरोबर गावाला गेलो होतो, तर आमच्या शेजारच्या शेतात पोलिसांची धाड पडली. धाड का, तर त्या बेन्यांनी शेतात गांजा लावला होता.. जशी त्यांना कुणकुण लागली, दिला सगळा पेटवून.. सगळ्या शिवारात धूर.. तुला सांगतो अशी झिंग आली सगळ्यांना."
त्याच्या या शब्दखजिन्यातून एके दिवशी हा मोती बाहेर पडला.. "सावळा गोंधळ !". "पाखरू, माल, सामान, छावी, गन्डेल" हे तर बऱ्याचदा ऐकले असतील, पण हे काय नवीन, अशी आमची प्रतिक्रिया. भाऊंनी खास कॅटेगरी साठी काढला होता.. सुंदर सावळी मुलगी.
एखाद्या भलत्याच अर्थाच्या वाक्प्रचाराचा समर्पक अनर्थ केला, म्हणून बरेच दिवस अतुल आमच्या ग्रुप चा 'आंख का तारा' की काय ते होता.

हॉलीवूड च्या पिक्चर ला प्रमाण मानले तर अमेरिकेतल्या 'चिक' आणि 'बिच' पेक्षा कमी अवमानकारक आणि तितकेच मजेदार शब्द आहेत हे.

याची आठवण झाली यासाठी की मला इकडे बँगलोर मध्ये शर्माजी नावाच्या उत्तर प्रदेशीय मित्राने माझ्या "सावळा गोंधळ !" या उस्फुर्त प्रतिक्रियेवर म्हंजे काय म्हणून विचारले. तसे बँगलोर मध्ये मी पण उत्तर प्रदेशीयच, कनसे नाहीये, त्यामुळे, उत्तर प्रदेशीय तर उत्तर प्रदेशीय. तर.. शर्माजींना म्हणालो लिटरली "Dark Chaos".
काल ऑफिस मध्ये नवीन एच आर दिसली.. फुल्ल सावळा गोंधळ!!

राजशेखर - http://www.facebook.com/RajshekharJi?sk=info
त्यांच्याविषयीची साईट पण आहे या पेज मध्येच.
सदमा चा शेवट
-http://www.youtube.com/watch?v=dqW_rGlPlko

नंदिता दास, सोनाली कुलकर्णी, स्मिता पाटील, काजोल, रेखा
शिल्पा शेट्टी, चित्रांगदा सिंग, इवा मेंडेझ, नेहा धुपिया, बिपाशा बसू.