पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

The ruthless shrink we all need

इमेज
Which supporting character stole the scene every time they appeared? Jane Lynch. There are very few TV series fans who haven’t watched Two and a Half Men. The series was a brilliant comedy until Charlie Sheen had his act together. I believe the series started to deteriorate well before his meltdown, somewhere around season 3. However, I must admit that immersing myself in the humor, memorable quips, and performances of the unforgettable actors was one of life's joys. However, had it not been for the sheer brilliance of Jane Lynch, I would have rated the series 50% lower. This realization came to me in retrospect because whenever I feel like rewatching anything related to Two and a Half Men, I instinctively search for those scenes on YouTube, specifically "when Charlie goes to the shrink." Jane Lynch portrayed the character to perfection, breathing life into the therapist. Her hippie wardrobe became an integral part of the character, and the dialogues were a treat. The sar

लग्न पहा 'बे' करून

इमेज
  सध्या लग्न जुळवणे कठीण का होत चालले आहे? मी लग्नाच्या वयाचा झालो असताना, म्हणजे साधारण सव्वीसाव्या वर्षी यावर गहन विचार केला होता. गहन विचार करणे हा स्थायीभाव असल्याने, लग्न जुळण्याच्या काठिण्यपातळीत वाढच झाली होती. तर हे त्या वेळेचे विचार मी माझ्या ब्लॉग पोस्ट मध्येसविस्तर पणे मांडले आहेत [1] . इथे  ते आणि आणखी काही मुद्दे सांगतो - १.  माणसाचे वाढलेले आयुष्यमान  आणि त्यात आलेले सातत्य हे लग्नाला होणाऱ्या वाढत्या विरोधाचे कारण असावे. पूर्वी आयुष्य म्हणजे कधी काय होईल याचा भरवसा नाही, आज याला डायनोसॉरस ने खाल्ले उद्या त्याला म्यामथ ने तुडवले अशा पद्धतीचे. शिकार करा आणि खा. आज शिकार मिळाली तर दिवस कारणी, आज जंगलातून येवून जगलो वाचलो तर उद्याचे पाहू अशी जीवनशैली. त्यामुळे जोडीदार कसा मिळावा याच्या अपेक्षा जेमतेमच. कारण उद्या ती आहे की मी नाही कुणाला माहिती? आज म्हणजे लग्न केलं की पुढची ५०-६० वर्षे या व्यक्तीबरोबर काढायची म्हंटल्यावर तथाकथित वाढलेली बौद्धिकपातळी 'तिसरा म्याट्रीक्स' पाहताना जशी कावरीबावरी होते तशी होते. त्यामुळे जोडीदार मिळवणं (लग्नासाठी) हा अवघड आणि नावडता प्रकार

स्टॅचू ऑफ युनिटी - फसलेला प्रकल्प का फायद्याची गुंतवणूक?

इमेज
Did the Statue of Unity in India fail? मी २०१९ च्या फेब्रुवारी महिन्यात स्टॅचू ऑफ युनिटी ला भेट दिली. स्टॅचू ऑफ युनिटी बडोद्यापासून साधारण ८० किमी वर असलेल्या केवडीया या छोट्या गावाजवळ आहे. मी तिथे बडोद्यावरून साधारण ५ वाजता पोचलो. तिथे दोन प्रकारचे तिकीट मिळतात. पहिल्या प्रकारचे १२० रुपयांचे तिकीट घेऊन तुम्ही पुतळ्याच्या पायाजवळ जाऊ शकता. दुसऱ्या प्रकारचे तिकीट घेऊन तुम्हाला सरदार पुतळ्याच्या छातीपर्यंत असलेल्या निरीक्षण दालनापर्यंत जाता येते. हे तिकीट ३५० रुपयांना मिळते. मला खरेतर उंचीवर असेलेल्या या निरीक्षण दालनापर्यंत (Observation Deck) जायचे होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही महाग तिकिटे संपली होती. तिकीट खिडकीवरच्या क्लर्क ने सांगितले की ही तिकिटे मर्यादित असतात आणि दिवसाला "फक्त" ७००० तिकिटेच दिली जातात. मी सप्ताहांतात आलो नव्हतो. तो शुक्रवार होता तरीही ही महाग तिकिटे चक्क संपली होती. थोडा हिरमोड झाला, पण माझ्याबरॊबर बरेच लोक होते ज्यांना ही तिकिटे मिळाली नव्हती. नाईलाजाने नॉर्मल तिकीट घेतले. ७००० तिकिटे दर दिवसाला आणि नॉर्मल तिकिटे कितीही. आता तुम्हीच अंदाज लावा. स्

परोपकार की स्वउपकार?

इमेज
तुम्ही अशी कोणती गोष्ट परोपकार म्हणून केली पण त्याचा तुम्हालाच प्रत्यक्ष फायदा झाला? साधारण २००८ च्या दरम्यान मी एकदा वृत्तपत्रात एक लेख वाचला. त्यात लेखकाने त्यांचा अनुभव कथन केला होता. सामसूम रस्त्यात त्यांचे पेट्रोल संपले आणि एका अज्ञात मोटारसायकलस्वाराने स्वतःच्या दुचाकीतील पेट्रोल देऊन लेखकाला मदत केली. जेव्हा लेखक त्या स्वाराला पैसे देऊ लागला तेव्हा त्याने पैसे स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला. ते म्हणाले की मोबदला द्यायचाच असेल तर लेखकाने देखील आपल्याबरोबर पाईपचा तुकडा ठेवावा आणि इतर बाईकस्वारांना अडीनडीला मदत करावी. मला ही कल्पना चांगलीच आवडली. मी माझ्या शहरात असे बाइक ढकलणारे लोक बरयाचदा पाहिले होते. माझ्या ऑफिस व घरामधील रस्त्यात 5-6 किलोमीटरच्या परिसरात पेट्रोल पंपच नव्हता. त्या मार्गावर,अशी दृश्ये जवळपास प्रत्येक आठवड्यात दिसायची. मी स्वतःला या अडचणीत एकदा दोनदा सापडलो होतो.चला, एक चांगले पुण्याचे काम करूया या भावनेने मी माझ्या ऑफिस बॅगमध्ये एक सायफन नळी आणि एक छोटी प्लास्टिकची बाटली ठेवण्यास सुरुवात केली. गाडी ढकलून बेजार झालेले, थकलेले, स्वतःला दोष देत चाललेल्या दुचाकी स्वा