पोस्ट्स

डिसेंबर, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

टू ऍण्ड अ हाफ मेन-१

इमेज
इथे मला थोडं रडायचं आहे, त्यामुळे जर एखाद्याला डायरेक्ट टू अॅन्ड अ हाफ मेन वर उडी मारायची असेल तर भाग २ पाहावा. विषयाला सोडून लिहिले म्हणून कोणी टांगणार आहे का? गेले एक महिना मला या विषयावर लिहायचे होते. लिही लिही असा आग्रह कितीदा झाला. म्हणजे आग्रह स्वतःचा स्वतःच केला, कारण आमचा ब्लॉग हा काही फार जणांच्या कौतुकाचा विषय नाही, त्यामुळे "लिही की, का न लिहिण्याएवढे तुझे आयुष्य तृप्त झालंय"[१] असहि कोणी विचारत नाही, कि "तुझ्या पुढल्या पोस्ट ची आतुरतेने वाट पाहतोय" अशी लडिवाळ कॉमेंट येत नाही. उलट "बरय बेणं गप् पडलय" असाच सूर जास्त. बंगलोर ला महिन्यातून माझे ५ पिक्चर होत होते. काढली अॅक्टीवा कि निघालो पिक्चरला असे एकंदरीत चालले होते. या आठवड्यात एकही पिक्चर रिलीज नाही झाला म्हणून नुसतेच बर्गर खावून मॉल मधील माल [२] पाहून परत येण्याचे कठीण पण प्रसंग आले. सजितने आपण या मॉल चा मासिक पास काढू अशी आयडियाही दिली होती. रात्री पिच्चर बघून येणे आणि दिवसा सोयीप्रमाणे ऑफिस ला जाणे. पण जसे बंगलोर सोडून पुण्यात आलो, मेरे तो दिन हि बदल गये. भल्यापहाटे ७.३५ वाजता उठावे