पोस्ट्स

जुलै, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विसा, मुंबई आणि आय ट्वेन्टी

इमेज
मुंबईतली रम्य सकाळ, काही अत्यानंदाने फुललले चेहरे आणि काही निराश. मागील दीड तासांपासून हाच खेळ पाहतोय. मनात शंकाचे मोहोळ उठलेले. तसा मी एकटाच नाहीये, माझ्यासारखी बरीच मंडळी तरुण, म्हातारी त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभी काही तशीच फुटपाथ वर बसलेली. कचरा उचलणाऱ्या गाडीचा खेळ पाहून झाला, जॉगिंग करणारे पब्लिक पाहून झालं, समोरची उंचच उंच इमारत पाहून झाली, आणि कॉन्सुलेट च्या लायनितली पाखरं पण टिपून झाली. पण ममी पपांचा तपास नाही. आता मी आणि आमच्या शेटे कुटुंबातली तमाम भावंडं -अमित, अर्चना, अभिजीत, अमृता आणि अनुपम आपापल्या आई बाबांना ममी पपा म्हणतात यात आमची काही चूक नाहीये. मला याचे काही एक वाटत पण नाही. पण असावा भावे स्कूल चा परिणाम की लिहिताना चुकल्या चुकल्यासारखे वाटते. तर रम्य अशासाठी की मुंबईतली म्हणजे एकदम कोअर मुंबई गावात जाण्याची माझी पहिलीच वेळ होती, आणि तसा मी कट्टर पुणेकर वं मुंबई द्वेष्टा असलो तरी मला त्या दिवशी मुंबई वेगळीच भासली. विसा - कोणाचा? मी मुंबईत कसा- त्याचे झाले असे की मोठ्या प्रयत्नानंतर माझ्या आई वडिलांना पासपोर्ट मिळाला एकदाचा. (या पासपोर्ट ची कहाणी लै मोठी