पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ते देवाचं असतं !

इमेज
बोल्हाईचे मटण काय असते? पुण्याजवळ वाघोलीच्या पुढे वाडेबोल्हाई हे गाव आहे. तेथील बोल्हाई देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. पुण्याजवळच्या गावांतील काही कुटुंबांना या देवीचे काही नियम लागू होतात. याला देवी आहे असे म्हणतात. उदाहरण म्हणजे माझ्या कुटुंबाला बोल्हाई आहे. या देवीला शेळी (बेकरीचे) बळी चालत नाही. मेंढी चालते. साहजिकच ज्या कुटुंबाना ही देवी आहे त्यांना बेकरीचे मटन वर्ज्य असते. म्हणजे आमच्या कुटुंबात कधीच शेळीचे मटण खात नाहीत. तसे पाहिले तर मटणच फार कमी वेळा होते पण खाल्लेच तर मेंढीचेच. माझी आजी तर असे म्हणायची की या बोल्हाई असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना शेळीच्या मटणाचे खरकटे पाणी देखील ओलांडायचे नसते. जर शेळीचे मटण खाण्यात आले तर शरीरावर काहीतरी पुरळ, खाज या स्वरूपात प्रतिक्रिया उठतात. नंतर बोल्हाईला जाऊन काहीतरी विधी करावे लागतात. हे असे असल्यामुळे या व्यक्ती शेळीच्या मटणाच्या खानावळी हॉटेल्स टाळतात. त्यामुळे जसे काही हॉटेल्स वर जसे "शुद्ध शाकाहारी" लिहिलेले असते तसे काही ठिकाणी "फक्त बोल्हाई चे मटण" अशी पाटी असते. उद्देश हाच की हे शुद्ध बोल्हाई वाल्या लोकांच

मला (न) समजलेले बाबा

इमेज
तुम्ही अलीकडे कोणते पुस्तक वाचले आणि त्याबद्दल तुमचा काय अभिप्राय आहे? मी २०१९ च्या मार्च महिन्यात डॉ प्रकाश आमटे जिथे कार्यरत आहेत अशा हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाला भेट दिली. बाबा आमटे, त्यांची समाजासाठी आयुष्य अर्पण केलेली डॉ विकास आणि प्रकाश आमटे ही मुले, डॉ भारतीताई आणि मंदाकिनी या कर्तृत्ववान सुना, सेवापरायण परिवार आणि निष्ठावंत, सेवाखोर कार्यकर्ते याबद्दल माहिती नसणारी व्यक्ती विरळाच. (सेवाखोर हा बाबा आमटेंच्या एका कवितेत आलेला शब्द आहे. The one who cannot help but help) चंद्रपूर जवळचे आनंदवन आणि गडचिरोली च्या निबिड अरण्यातले हेमलकसा याबद्दल खूप काही सांगण्यासारखे आहे. ते कधीतरी दुसऱ्या पोस्ट मध्ये. डॉ प्रकाश आमटे यांच्या प्रकाशवाटा ही आत्मकथा मी तिथे जाण्याअगोदरच वाचली होती. तिथे गेल्यावर मी आणखी काही पुस्तके घेतली. त्यात डॉ प्रकाश आमटेंचे हेमलकसा येथील सहकारी आणि बाबा आमटेंसोबत बराच काळ व्यतीत केलेले विलास मनोहर यांची दोन पुस्तके होती. त्यातले नेगल हे पुस्तक मी लागोलाग वाचून काढले. नव्वद च्या दशकात शाळेत असताना हे पुस्तक आमच्या शाळेच्या ग्रंथालयात खूपच विद्यार्थीप्रिय होते. तेव

कंट्रोल उदय कंट्रोल

इमेज
मी ऑफिसमध्ये मराठी सहकाऱ्यांशी मराठीत बोलत असतो तेव्हा हिंदी भाषिक लोक जे त्या संवादाचा भागही नसतात ते चिडतात आणि 'हिंदी में बात करो यार, यह देहाती भाषा मत बोलो' असं म्हणतात. मी काय करावे? ही वेळ आली का? असो.. काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी असले नखरे सहन करत नाही. आमच्या सोसायटीचा एक व्हॉट्सऍप ग्रुप आहे. तिथे बऱ्याच गोष्टी जसे पाणी, सुरक्षा, साफसफाई, डागडुजी असले विषय असतात. ७0 टक्के पब्लिक मराठीच असेल. उरलेलं हिंदीभाषिक आणि बाकीचे. त्यामुळे एक सौजन्य म्हणून बहुतांश संवाद इंग्रजी आणि थोडे हिंदी आणि त्याहून कमी मराठी असतात. या ग्रुपमध्ये बरेच जण इंग्रजी व्याकरणाची लक्तरे निघाली तरी हिंदी किंवा मराठी संदेश टाळतात. त्यात काही जण तर इंग्रजीच्या भीतीने "काही सांगायचे आहे पण बोलणार नाही" या न्यायाने कधीच संदेश पाठवत नाहीत. तर झाले असे, की आमच्या सोसायटीच्या अध्यक्षाने पाण्याविषयी एक पोस्ट टाकला. महापालिकेकडून आलेल्या मराठी नोटिशी त्यांनी बऱ्याचदा जशाच्या तशा टाकल्या होत्या.त्यावर ग्रुप मधल्या एक दाक्षिणात्य महिलेने लागलीच "इथे मराठी चालणार नाही&quo

नास्तिक आणि अज्ञेयवादी

इमेज
नास्तिक आणि अज्ञेयवादी यांच्यामध्ये काय फरक आहे? व्वा.. अज्ञेयवाद. नवीन मराठी शब्द समजला आज. Atheist - नास्तिक म्हणजे जे देवाचे अस्तित्वच मान्य करत नाही असे लोक. त्यांच्या मते विश्वाचा पसारा, ही सृष्टी, उत्क्रांतीची सुरुवात हे केवळ एका वैश्विक योगायोगचा (cosmic coincidence) परिणाम आहे. इथे एक ठराविक कार्यकारण भाव आहे आणि दैव किंवा देव अशी कोणतीही गोष्ट सृष्टीत अस्तित्वात नाही असे यांचे ठाम मत असते. Agnostic - अज्ञेय म्हणजे असे लोक की जे मान्य करतात की काही गोष्टी अगम्य आहेत. कार्यकारणाचे नियम तिथे लागू होत नाहीत आणि अशा गोष्टींना फक्त वैश्विक योगायोग मानणे त्यांना चुकीचे वाटते. अशा लोकांच्या मते काहीतरी अगम्य शक्ती या सृष्टीमागे कार्यरत आहे पण ती परंपरेनुसार चालत आलेल्या देवाच्या कल्पनेसारखी नसून वेगळी असू शकते. मी स्वतःला अज्ञेय मानतो. देवाच्या अस्तित्वाचा शास्त्रीयदृष्ट्या पुरावा देता येत नसला तरी तो नसल्याचा ठोक पुरावाही देता येत नाही. पण त्यामुळे मला देव मानायलाच पाहिजे असेही नाही. अज्ञेय असल्यामुळे मी देवळात पण जातो आणि अनाठायी कर्मकांड करायला नाही पण म्हणू शकतो. हे निर्णय घ्याय