पोस्ट्स

2010 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Half Day Leave, Alaka and Skyline

इमेज
Skyline? Is that even a movie? When did they release it? Don't try to stress your brain. This was not on my list too. It's one of those uncalled-for half-day leaves which led me to watch this movie. Sure I don't need any particular reason to take a half day leave as such, but that day there was a genuine reason. I took half day leave for some work in collector's office. I got the required documents from there and submitted them in the Hyundai showroom. (the collector's office part wasn't as easy as to conclude in one sentence, just out of the scope of this post, some other time maybe) . The day was 15th Nov. 2010 as per my theater visits log, (yeah, I still keep that) about 12 noon and I had got 2 extra hours. What are the odds that the showroom is near Alaka. So the choice was obvious. Anyway, I didn't have any better option, did I? I decided to peek into Alaka to see if I would get lucky. I saw Skyline's poster, "Huh, alien movie.. Is there a

बूम बूम रोबो दा.. रोबो दा.. Robot

इमेज
१. एक रोबॉट मानवाला इजा करत नाही , अथवा निष्क्रीय राहून मानवाला इजा होऊ देत नाही. २. एक रोबॉट मानवाच्या सगळ्या आज्ञांचे पालन करतो, जोवर या आज्ञांमुळे पहिल्या नियमाचे उल्लंघन होत नाही. ३. एक रोबॉट स्वतःच्या अस्तित्वाचे रक्षण करतो, जोवर ते करताना पहिल्या किंवा दुसऱ्या नियमाचे उल्लंघन होत नाही. डॉ. वसीकरण म्हणजे आपला सुपरस्टार रजनीकांत, चा रोबॉट (इंधिरण), चिट्टी.. या नियमांना अनुसरून बनवण्यात आलेला नाही. कारण त्याला भारतीय लष्करासाठी, शत्रूला संपवण्यासाठी बनवण्यात आलेला आहे. आयझक असिमोव्ह ने उधृत केलेल्या रोबोटिक्स च्या वरील नियमांना बगल दिली तर तर काय होऊ शकते, हा विषय नवीन नाहीये. विल स्मिथच्या I Robot मध्ये आपण ते पाहिलेही आहे. I Robot मध्ये, भावना असलेला रोबॉट (Sonny) पण होता आणि तद्दन तर्कसंगत विचार करून या नियमांना झुगारून देणारी WIKI पण होती.. होता.. जे असेल ते.. पण मानवाला मुळात एका यंत्रात भावना देण्याची गरजच का पडावी..? हा प्रश्न माझ्या माहितीत तरी हॉलीवूड ने हि हाताळला नाही. शंकर चा हा सिनेमा, माझ्यासाठी इथेच वेगळी पातळी गाठतो. एका प्रसंगामधून अगदी नेमकेपणाने या प्रश्नाच

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव..

इमेज
लहानपणी, म्हणजे साधारण सातवी आठवीत असताना रविवार सकाळी हि धून ऐकून जाग यायची. जुन्या लोकांसाठी बी आर चोप्रांचे "महाभारत" आणि रामानंद सागर यांचे "श्रीकृष्ण" याच्यात कोण भारी याच्यावर चर्चा, आणि माझ्यासारख्या पिटुकल्यांना स्पेशल इफेक्ट युक्त छान छान गोष्टी. हे श्रीकृष्ण तसे चांगलेच होते, पण मध्ये मध्ये रामानंद सागर येवून नुसतेच बोलायचे, कधी कधी अर्धा तास बोलायचे, लय बोर व्हायचे मग. याची आठवण का यावी मधेच.. तर झाले असे कि मागे काही दिवसांपूर्वी कुठल्यातरी वाहिनीवर परत हि धून ऐकली आणि म्हटले पाहू तरी आता कसे वाटते श्रीकृष्ण बघून. अवतार आणि मेट्रिक्स सारखे सिनेमे बघायची सवय झालेल्या डोळ्यांना त्या लो बजेट स्पेशल इफेक्ट ची मजा काय कळणार आता? तरीही कुठल्या तरी गोष्टीनी खिळवून ठेवले. अर्धा तास अगदी ब्रेक सकट तो भाग पाहिला. तो भाग होता कालयवन वधाचा. अगदी वरवर गोष्टच सांगायची म्हटली तर.. जरासंध कृष्णाच्या हात धुवून मागे लागलेला. तशात तो कालयवन नावाच्या दुष्ट राजाची मदत घेतो. हा कालयवन महापराक्रमी, साक्षात कृष्णाला पण सळो कि पळो करून सोडतो. कृष्ण पण हुशार माणूस, तो त्याला

एका पॅच ची गोष्ट..

इमेज
P E C F D आता हे वाचा E D F C Z P, प्रत्येक क्लिक गणिक छोट्या होणाऱ्या त्या अक्षरांच्या रांगांना कसून प्रयत्न करत वाचतोय. तिथल्या बहुधा इंटर्न असलेल्या डॉक्टरने फोन उचलला. माझ्याएवढाच, किंवा माझ्यापेक्षाही लहान असलेला इंटर्न. "Ma'am, new patient, shuttlecock injury. I checked his eye pressure, it's normal. Sight 6/6. I suspect internal hemorrhage", फोन ठेवून परत माझ्याजवळ येतो, "हम्म, ठेवा हनुवटी इथे, फोरहेड टेकवा समोर. सरळ बघा." त्या प्रकाश पुंजक्याकडे बघतोय. सकाळी कोर्ट वर टंच पोरगी बघून सुखावणारा माझा डोळा, आता अस्तित्वाची परीक्षा देतोय.. च्यामारी, ऐतिहासिक नाटकाचा अंक लिहिल्यासारखं वाटतय. जाउदे, कसेही लिहिले तरी पब्लिक वस्तारे घेउनच बसलीये. थोड्या वेळाने मोठ्या डॉक्टर आल्या. एक्सामीनेशन चेयर वर बसून, डोळे किलकिले करत वर पाहिले. करारी व्यक्तीमत्व.. आल्याआल्या कोणीतरी जाहीर केले, डॉक्टरांनी "shuttlecock injuries" या विषयावर रिसर्च पेपर पब्लिश केला होता. त्या दुखऱ्या अर्धवट बंद डोळ्यालाही विस्फारायाचा मोह झाला. चायला, लोकं असल्या दुर्मिळ विषयाव

Inception Stills

इमेज

Tere Bin Laden

इमेज
अप्रतिम लादेन! माझ्या बहिणीच्या वाढदिवसाचे.. म्हणजे ९/११ चे अफगाणिस्तान आणि इराकवरच नव्हे तर तुमच्या माझ्यावरही परिणाम झाले. गोऱ्यांच्या उडालेल्या घाबरगुंडीमुळे काही जणांना विसा मिळवण्यात अडचण आली तर काहींना मिळालाच नाही.. (बेंडाळे, टाके उसवतील दमाने घ्या..). म्हणूनच विसा मिळवण्यासाठी हिरोने केलेल्या या सर्व खटाटोपांचे कौतुक वाटते. लादेन सारख्या दिसणाऱ्या नूरा कोंबडीवाल्याचे हाल पाहून हसता हसता पुरेवाट होते. कमी बजेट मधेही "technically correct" राहिले तर बाकी काम डिस्कवरी च्या फ्रेम्स वापरून पण होते हे लैच भारी.. बाकी अटकेपार झेंडे लावल्यानंतर पहिल्यांदाच पाकिस्तान मध्ये मराठी accent गेली असेल.. hehe.. हा सिनेमा बघून "Burn After Reading" ची आठवण झाली, फुल्ल वेड्यांचा बाजार.. मजा आली पण.. पिक्चर संपल्यावर या विसा प्रकरणावरून मलापण उगाच आपला डायलॉग मारावा वाटला.. "माय नेम इज 'आशिष शेटे', अॅन्ड आय अॅम नॉट अ टेररिस्ट".. कुणाल, सुहास.. बेंडाळे तिकडे लोळत असतील तर त्यांना उठवा.. :D :D

Inception

इमेज
On a rainy day with no hope of reaching the office in time, the first thing that came to my mind was a few pending errands, but as I approached E-Square couldn't help and got the ticket of Inception 11.45 at about 11.55AM. Sure I lost the first 10 minutes, nevertheless the big task is complete now. With memories of Vanilla Sky which has the same concepts, I was hoping that this movie would spare me from further brain damage. Till the interval, it was more like explaining the background of what I was going to see in the latter half. Expectations were high and in those 5 minutes I got in the interval I wikied about what I had seen up to that point. I am not going to spoil the fun of this movie, but here is the description of what happened to me after I left the cinema hall. My bladder was fully stressed, don't know whether because of the 5-minute wiki in the interval or the tense action-packed second half. I pulled 1st door while coming down from the backstairs, it was locked

Mumbai Pune Mumbai Review

इमेज
आज मुंबई पुणे मुंबई पाहिला. दशकांपासून पुणे मुंबईचे तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना अस्सं काही नातं आहे. या पिक्चर मध्ये पुण्याचा 'स्वाभिमान' आहे आणि मुंबई चा 'तिखटपणा' आहे, पण कुठेही उपदेश देण्याचा प्रयत्न नाही, फ़क़्त या नात्याच्या आनंदाची उधळण आहे. त्यामुळे अवघा ९० मिनिटांचा हा सिनेमा भाव खाऊन जातो. स्वप्नील जोशी तुफान.. मुक्त बर्वे खरच "भारी" दिसते.. खूप हसलो..कर्कश्श पार्श्वसंगीत सोडून सगळे गोड गोड. विषयात जाम पोटेन्शिअल आहे अजून, दुसरा पार्ट आला तर मजा येईल.. :D नक्की बघा.. Alka - 2.30PM, Nilayam - 3.30PM, Mangala - 2.30PM and in other multiplexes.

Rajneeti Review

इमेज
राजनीति बघितला.. मोठ्ठा कॅनवास, बांधीव पटकथा, उत्तम अभिनय. महाभारताचे आधुनिक रूप दाखवणे हे किती अवघड आहे, पण जमलय. प्रकाश झांचे सिनेमे भारीच असतात, इथे त्यांनी फुल जीव ओतलाय. निर्मितीमूल्य उच्च म्हणजे नावं ठेवायला जागा नाही इतकी उच्च आहेत. मला सर्वात जास्त काय आवडले असेल तर sound mixing.. लैच भारी आहे. तीन तास बसणे थोडे जीवावर येते. पुढाऱ्यांपेक्षा कोणीच मोठे नाही आणि पोलीस आणि न्यायव्यवस्था त्यांच्या हातचे खेळणे आहेत, हे मात्र बोचते..(ही उणीव काढण्यासाठी गंगाजल बघा, अशी साईडनोट टाकायला हवी, नाहीतर लै डिप्रेसिंग वाटू शकते). मला बऱ्याच जणांकडून निगेटीव कॉमेंट्स आल्या होत्या या पिक्चर बद्दल, पण हा सिनेमा नक्कीच वाईट नाहीये. तीन तास असतील घालवायला, आणि सिरीअस विषय कठीण नसतील पचवायला (यमक जुळवले :D) , तर जा बिंधास्त बघा..