Tuesday, June 15, 2010

Rajneeti Review

राजनीति बघितला..
मोठ्ठा कॅनवास, बांधीव पटकथा, उत्तम अभिनय.
महाभारताचे आधुनिक रूप दाखवणे हे किती अवघड आहे, पण जमलय. प्रकाश झांचे सिनेमे भारीच असतात, इथे त्यांनी फुल जीव ओतलाय. निर्मितीमूल्य उच्च म्हणजे नावं ठेवायला जागा नाही इतकी उच्च आहेत. मला सर्वात जास्त काय आवडले असेल तर sound mixing.. लैच भारी आहे. तीन तास बसणे थोडे जीवावर येते. पुढाऱ्यांपेक्षा कोणीच मोठे नाही आणि पोलीस आणि न्यायव्यवस्था त्यांच्या हातचे खेळणे आहेत, हे मात्र बोचते..(ही उणीव काढण्यासाठी गंगाजल बघा, अशी साईडनोट टाकायला हवी, नाहीतर लै डिप्रेसिंग वाटू शकते). मला बऱ्याच जणांकडून निगेटीव कॉमेंट्स आल्या होत्या या पिक्चर बद्दल, पण हा सिनेमा नक्कीच वाईट नाहीये. तीन तास असतील घालवायला, आणि सिरीअस विषय कठीण नसतील पचवायला (यमक जुळवले :D) , तर जा बिंधास्त बघा..

No comments:

Post a Comment

अभिप्रायासाठी अनेक आभार!