पोस्ट्स

काच फुटताना..

इमेज
पोस्टचं टायटल बघून पब्लिकचा काहीतरी सेंटीमेंटी, अॅबस्ट्रॅक्ट वगैरे टाकणार असा समज होऊ शकतो. यार पण अॅबस्ट्रॅक्ट विचार करून करून डोकं बधीर झालं आता, त्यामुळे कधीकधी साधं सरळ सोपं लिहिलं तर फाउल थोडी होणारे? खरच काच फुटताना पाहिली मी. तसे प्रत्येकाच्या आयुष्यात कधीना कधी तरी हा प्रसंग येतोच. पण बऱ्याचदा ग्लास, आरसा, कपाटाचे प्यानल, घड्याळ, मोबाईल ची स्क्रीन, फ्रीज चा रॅक असे फुटकळ फुटण्याचे प्रकार पहिले असतील लोकांनी. लहानपणी एकदा जिंकून आणलेल्या गोट्या अशाच थंडीच्या दिवसात चुलीत तापवून पाण्यात टाकायच्या आणि तडकवयाच्या असले उद्योग पण केले त्या मोहापायी. कधी ती पिक्चर स्टाईल[१] ने फुटलेली काच बघितलीये? क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी, भयाण अशी? मागे एकदा सांगितले होते न, की विकेंडला ऑफिस ला जाऊन बसतो मी. मला कामापेक्षा त्या एकांताचं अप्रूप जास्त. पूर्ण मजला रिकामा. फक्त माझ्या क्युबिकल वर उजेड. खोल खोल शांतता. आमचे ऑफिस आहे तिथे मागच्या बाजूला डोंगर रांग आहे. तिथून खूप वेगाने वारा वाहतो. त्या वाऱ्याचा आवाज बाथरूमच्या प्यानेल्स मधून घोंगावतो मधून मधून. अशा वातावरणात दुपार होऊन किर्...

दिलमे मत रख यार, बोल डाल!

इमेज
या विषयाला गंभीर करू की इनोदी करू हे सुचत नाहीये. त्यामुळे दोन्ही प्रकार एकमेकात घुसळून हा पोस्ट स्ट्रॉबेरी फ्लेवरच्या आईसक्रीमवर लिंबाच्या लोणच्याचा खार टाकला तर जी चव येईल तसा झाला तर क्षमा. परवा पेट्रोल चे भाव पुन्हा चढवले या हरामखोरांनी. मला कार घेतल्यावर जेवढा आनंद झाला नाही तेवढा आनंद लोकांना मला "तुझी कार किती मायलेज देते?" हा प्रश्न विचारून होतोय. त्यांच्या चेहऱ्यावरचे छद्मी हास्य सहन करणे असह्य होते. कधीकधी बोलून जातो कि "बरे झाले दीड वर्षापूर्वी घेतली, नाहीतर आता घेण्याची हिम्मत आहे का कुणाची?" मग त्यांच्या आनंदात थोडे विरजण पडले कि कसे गार गार वाटते. काल शनिवारी रात्री उशिरा ऑफिस वरून घरी निघालो. (ही शनिवार, ऑफिस, आणि उशीर ही वेगळी कहाणी.. फुटेज खाईल.. तेच ते). रविवारी सकाळीच आजीला घेवून गावाला जायचे होते म्हणून म्हटले लगेहात पेट्रोल भरून घेवू. आमच्या कंपनीजवळच्या पेट्रोल पम्पावर घेतली आणि २००० चे टाकायला सांगितले. सवयीप्रमाणे की लोक करतात म्हणून, बाहेर येवून टँक पाशी उभा राहिलो. "झीरो बघा" इति पंप कामगार.( त्याला पेट्रोल वाढप...

इंटेलिजंट स्पर्म!

इमेज
April 2012 बॉस, काहीतरी भयानक जादू झालीये. हा एप्रिल चालुये आणि आतापर्यंत या वर्षात मी तीन हिंदी सिनेमे पाहिले. ते तीनही प्रस्थापित हिंदी सिनेमाच्या समजुतींच्या पार गेले आणि एक नवीनच शाळा (school of thought) भरवलीये. पानसिंग तोमर, कहाणी आणि विकी डोनर हे नितांत सुंदर पिच्चर पाहिले. हिंदी पिच्चर बेचव आणि बिनडोक अशा समजुती घेवून वर तोंड करून हिंडणाऱ्या लोकांना (म्हणजे आम्हालाच) भयानक धक्का होता हा. नशीब आमचे की हाउसफुल सारखे सिनेमे मधेमधे येवून तो समज अगदीच खोटा नाहीये अशी सांत्वना देतात. वर नमूद केलेल्या तीनही सिनेमांचे वैशिष्ठ्य म्हणजे त्यांच्यात कोणीही 'तुर्रम'खान नव्हता. तरीही पानसिंग आणि कहाणी तुफान चालले. आणि विकी डोनर मला एवढा आवडलाय की ज्या अर्थाने हे दोन चालले तो पण बॉक्स ऑफिस गाजवणार यात शंका वाटत नाही. पानसिंग ला काही मोठे बजेट नव्हते पण तरीही ४०-५० वर्षांचा काळ २-२.३० तासात दाखवण्यात लैच कमाल केली. कोलकात्याला ज्या प्रकारे दाखवलय त्याला तोड नाही. हे सिनेमे कुणी लिहिले, कुणी दिग्दर्शित केले हे इथे कशाला लिहू? विकी आहेच. पण या लोकांचे कौतुक करावे तेवढे थोडे. विकी ड...

भांडवलवादाच्या आयचा घो? -१

इमेज
इंजिनियरिंग च्या दुसऱ्या वर्षाला असताना मी यु./एम.पी.एस.सी. च्या साप्ताहिक क्लासला जायचो. अगदीच ठरवून नव्हता लावलेला क्लास. आमच्या एस.आर्.पी.एफ. चे तत्कालीन सहृदय आणि कर्तव्यदक्ष समादेशक व्ही. लक्ष्मीनारायण [१] यांनी राबवलेल्या अनेक समाजोपयोगी योजनांपैकी हा एक उपक्रम होता. इतिहास, समाजशास्त्र, भूगोल असल्या कुचकामी[२] विषयांची आवड भागवून घेत होतो. लक्ष्मीनारायण सरांनी कॅप्टन कोल्हटकर (यांची पुण्यात अकॅडमी आहे) त्यांची मनधरणी करून त्यांची आणि त्यांच्या शिष्यांची दर सप्ताहांताला येण्याजाण्याची व्यवस्था केली होती. ते आम्हाला स्पर्धा परीक्षांबद्दल मार्गदर्शन करायचे, अभ्यास घ्यायचे, मॉक टेस्ट असायच्या. वेळ अगदी मजेत जात असे. आमचा ७-८ जणांचा नियमित उपस्थिती असलेला ग्रुप होता. बऱ्याचदा कोल्हटकर सरांचे शिष्यच यायचे शिकवायला. पण स्वत: कोल्हटकर सर् आले की आणखी मजा. सत्तरीतले सर त्यांच्या तरूणपणाच्या गोष्टी उत्साहाने सांगायचे. शाळेत ते अभ्यासात मागे होते आणि वडलांनी अपमानित केल्यावर कसे पेटले आणि कुत्र्यासारखा अभ्यास करून एम.ए. झाले आणि आर्मीत जॉईन झाले, वगैरे वगैरे. (कुत्र्यासारखा अभ्यास कसा करत...

तुझे सब है पता..

इमेज
नियती आपल्यापुढे कुठले ताट मांडून ठेवेन सांगता येत नाही. आज ऊन उद्या पाउस (पुणे वेधशाळेच्या हवाल्याने), आज राम-'अवतार' उद्या रा-वण (SRK च्या कृपेने).. चालायचेच. असे कितीतरी चढउतार पहिले असतील.. बऱ्याच जणांनी. आमच्या आयुष्यात मात्र असले काही नाट्य होत नाही. आमचे जगणे गेले ४-५ वर्षे कीबोर्डचा (कॉम्प्युटरच्या) नाद करण्यात चालले आणि सॅम काकांच्या कृपेने आणखी किती वर्षे जाणार ते त्यांनाच माहिती. उजव्या हाताचा अंगठा पंजाला जिथे मिळतो तिथे दुखायला लागलंय. म्हंजे हाताला विकार येईपर्यंत कुणी कीबोर्ड बडवू शकते का? या माझ्या बालपणीच्या शंकेला प्रात्यक्षिक देवून उत्तर देण्यात आलय. मागच्या आठवड्यात kudos [१] मिळाले. हे kudos म्हंजे आमच्या कंपनीमधले दर्जा कामासाठी देण्यात येणारे सर्वात कनिष्ठ दर्जाचे पारितोषिक आहे. कंपनीतल्या जवळ जवळ ८० टक्के लोकांना मिळते. हे अवार्ड मिळाले सांगितले, तर हसतात.. आणि नाही सांगितले तर "च्यायला, kudos तर मिळालाय पण अकड जशी चम्पुची" हे पण ऐकवतात. ('चॅम्प' हे आणखी एक अवार्ड. kudos "भोकरवाडीची आशा" पुरस्कार असेल तर 'च...