जलते है जिसके लिये



आज सकाळी परोठे, दही आणि लोणी घेवून यज्ञकर्म चालू होते. सजित पेपर वाचता वाचता म्हणाला की की हा ब्रेस्ट कॅन्सर वरचा लेख पहिला का? तसा पेपर वाचनाची माझी आणि त्याची वेळ वेगवेगळी. दोघेही अगदी नित्यकर्म मानून पेपर वाचत नाही. पण रोज सकाळी तो टाईम्स ऑफ इंडिया चा पाटीभर जाहिरात कम बातमीपत्र वाला गठ्ठा दारासमोरून उचलून आणतो जरूर. त्या गठ्ठ्याचा उपयोग किचन मध्ये, जेवताना खाली अंथरायला आणि क्वचित कधीतरी वाचायला म्हणून होतो.

मी बऱ्याचदा बँगलोर टाईम्सच वाचतो, न जाणो कुठून मी हि सवय लावून घेतली. टॉयलेट मध्ये उगीच जड विषय नको पेलायला म्हणून कदाचित मला या वाचनाची आवड लागली. पहिले पान कुठलीतरी नवीन इनमीन ३ सिनेमे केलेली बया सांगत असते की "माझं सर्व लक्ष फ़क़्त करीयर आहे आणि अमका तमका माझा फ़क़्त चांगला मित्र आहे". कुणी बॉलीवूड चा नट-नटी आयुष्यात पहिल्यांदाच बँगलोर ला आले असले तरी "ह्या शहराशी माझे कित्ती-कित्ती गहिरे नाते आहे" वगैरे भंपक टाकत असतो. कन्नड सिनेमांच्या नटांना उगीच कुठेतरी कोपर्यात परमनन्ट आरक्षण असते, न जाणो उद्या कनसे निघाली तर?

पान दोन पूर्ण जाहिरात, पान तीन कुठल्या तरी पार्टीचे फोटो आणि त्याच्या खाली विन्ग्रजीतले वापरून वापरून बोथट झालेले वाक्प्रचार, काय म्हणतात त्याला.. क्लिशे, ब्रोमाईड की काय ते. तथाकथित सोशलाईटस्. मला या लोकांचे फोटो काढून छापणाऱ्या आणि त्यावर निर्वाह चालवणाऱ्या वार्ताहराची आणि सिग्नल वरच्या पोराची सारख्याच प्रमाणात कीव येते. ह्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे साला.. अरे आज लवकर सुटला सिग्नल, की पळा, उद्या परत ते सिग्नल वर आणि हे नवीन फोटो घेवून हजर.
चौथे पान नवीन रिलीज होणाऱ्या पिच्चर्स चे. हे कामाचे असते, विकेंड जाळायचा प्ल्यान बनून जातो बसल्या बसल्या. पाचव्या पानावर हॉलीवूड चा माल, सहाव्यावर केविन अॅन्ड हॉब्स आणि इतर मंडळी. शेवटचे पान परत..अमका हिला सोडून तिच्याबरोबर पार्टीला गेला, अॅष्टन कुचर डेमी मूरला वैतागला, येडी गागानं आज हे घातलं किंवा ते काढलं, कर्दीशीयान काकू अरबस्थानात आणि तिथल्या लोकांनी कशी नाकं मुरडली, ब्र्याड दादा आणि अंजेलिना ताईंनी त्यांच्या इम्पोर्टेड पिल्लावळी सहित दर्शन दिलं, असल्या चविष्ट गोष्टी.

वाचता-करता वेळ कसा निघून जातो कळत नाही.

अरे कुठं गेलं ते.. हा ब्रेस्ट कॅन्सर.. मला वाटते की मला सुटसुटीत आणि मुद्देसूद नाही लिहिता येत, उगाच आपले कुठल्यातरी पॉईंटला भरकटायला सुरुवात होते आणि लिखाणाचे तारू दुसरीकडेच जाते. जाउदे म्हणा, तसे लिहिण्याची कुवत असती तर प्रकाशक[१] नसतो झालो का बाप्पा?

परत, आता लंगरच टाकतो साला.. ब्रेस्ट कॅन्सर.
तर सजित म्हणे की जर स्त्रीकडून स्तनपान नाही झाले तर हे होण्याची शक्यता वाढते.
लगेच, शेंडा न बुडखा माहीत पण माझ्यातला तत्ववेत्ता नंगी तलवार घेवून चालू. कसं ना कसं काही लोकं असतात अष्टपैलू किंवा अष्टफेकू म्हणा हवतर. त्याला म्हटले हे बरंये यार, म्हणजे एखादीला लग्न करायचं नसेल किंवा पोरगं नको असेल तर तिनं काय करावं. तर तो म्हणे 'आता काय करणार निसर्गानच असं बनवलय तर?'; सजीत कधीकधी सेन्सिबल बोलतो तसा. पण म्हणजे तिने त्यासाठी लग्न केलेच पाहिजे, किंवा मग स्पर्म बँक मधून आणून, किंवा येन केन प्रकारेण आई बनायलाच हवे. अवघड आहे. बरं आई बनायचं कधी..? तर वेळेत. आता हि वेळ ठरवायची कशी?

आपली पिढी साला वाया गेली. करीयरच्या दृष्टीने आपण पाळतो अमेरिकेच्या प्रथा. २२-२३ वर्षापर्यंत शिका, नंतर सेटल व्हा, जोडीदार शोध त्यात मुलांचे आणि मुलींचे अपेक्षा, नखरे, आणि तथाकथित बौद्धिक पातळी वाढलेली, आणि याच्यातून निभावलोच तर लग्न करा. तोपर्यंत आपल्या महान भारतीय संस्कृतीखातर (इथे अमेरिकन नाही हं) उपाशी रहा. मला तर वाटते सरळ एक त एक संकृती अनुसरली पाहिजे. हि सरमिसळ कुणाच्याच हिताची नाही. जुन्या काळी लहान वयातच लग्न लावून द्यायचे त्यामुळे हाफ इंडिअन अर्धे अमेरिकन असा जो घोळ होतोय आता तो तरी नव्हता. कदाचित पुढची पीढी सुधारेल, म्हणजे एकतर इतके दिवस उपाशी तरी राहणार नाही किंवा बालविवाह प्रथा परत सुरु होईल. उद्या समजा असे कुणी ऑनलाईन पोर्टल काढलं book-my-son-inlaw.com किंवा book-my-daughter-inlaw.com नावाचे तर नवल नाही वाटणार.

ही लग्नाची प्रथा पण मजेदार आहे. शिक्षण झाले, चांगले कमवायला लागले, पिक्चर बघून बोर झाले की काही नाही म्हणून चला लग्न करू. सद्यस्थितीत (मी याला "मानसिक टाईमस्टँप" ही संज्ञा काढली आहे, बारीक फॉन्ट मधला TM बघावा) मला तरी यात राम वाटत नाही. सद्यस्थितीत हं, निरीक्षकांनी उद्या परत टाईमस्टँप बदलला म्हणून जोडे मारू नयेत. विचार करता करता वाटले की माणसाचे वाढलेले आयुष्यमान आणि त्यात आलेले सातत्य[2] हे लग्नाला होणाऱ्या वाढत्या विरोधाचे कारण असावे. पूर्वी आयुष्य म्हणजे कधी काय होईल याचा भरवसा नाही, आज याला डायनोसॉरस ने खाल्ले उद्या त्याला म्यामथ ने तुडवले अशा पद्धतीचे. शिकार करा आणि खा. आज शिकार मिळाली तर दिवस कारणी, आज जंगलातून येवून जगलो वाचलो तर उद्याचे पाहू अशी जीवनशैली. त्यामुळे जोडीदार कसा मिळावा याच्या अपेक्षा जेमतेमच. कारण उद्या ती आहे की मी नाही कुणाला माहिती? आज म्हणजे लग्न केलं की पुढची ५० ६० वर्षे या व्यक्तीबरोबर काढायची म्हंटल्यावर तथाकथित वाढलेली बौद्धिकपातळी 'तिसरा म्याट्रीक्स' पाहताना जशी कावरीबावरी होते तशी होते. त्यामुळे जोडीदार मिळवणं (लग्नासाठी) हा अवघड आणि नावडता प्रकार आहे याबद्दल कुणाचे दुमत नसावे.

आता टायटल ना व्याव द्यावा म्हणून.. जलते है जिसके लिये.. खरच किस लिये?

माझे लिखाणाचे तारू लंगराला पण जुमानत नाही राव.

[१]- जे.के.रॉलिंग काकू नवीन पुस्तक लिहीतायेत म्हणे आणि स्वतःच प्रकाशक बनून इतर प्रकाशकांच्या पेकाटात लाथ मारली आहे असे ऐकून आहे.

[२]- अगदी अश्मयुगात जाण्याची गरज नाही, सर अर्नेस्ट शॅकलटन यांच्या अंटार्क्टिका मोहिमेवेळी त्यांनी हि जाहिरात दिली होती म्हणे.


"MEN WANTED FOR HAZARDOUS JOURNEY.
SMALL WAGES. BITTER COLD.
LONG MONTHS OF COMPLETE DARKNESS. CONSTANT DANGER.
SAFE RETURN DOUBTFUL.
HONOUR AND RECOGNITION IN CASE OF SUCCESS."

आता त्यांनी खरेच हि जाहिरात दिली होती का हा वादाचा विषय आहे, पण त्यांच्या मोहीमेची कथा या जाहिरातितल्या वर्णनाला खुजी करील अशी आहे. अशा मोहिमा आज होतात?
त्यांच्या या मोहिमेविषयी.

टिप्पण्या

  1. मी गेल्या वर्षभर कोणताही पेपर घेणे बंद केले आहे. जर महत्वाची बातमी असेल तर इंटरनेट आहेच. सध्याचे कोणतेही वर्तमानपत्र अंदाजे तीन मिनिटात चाळून रद्दीत टाकता येते.
    मोहीम भारी. :)

    उत्तर द्याहटवा
  2. ह्या दिवाळीच्या दिवसात तर वात आणलाय TOI ने. बातमी हुडकून काढावी लागते जाहिरातीतल्या जंजाळातून. काल परवा बँगलोर टाईम्स मध्ये केविनला ५ मिनिटे शोधून सापडला नाही. रोज एक एक किलोचा गठ्ठा दारात टाकून जातात. मीडिया एवढी 'वजनदार' असूनही कळीच्या प्रश्नाला 'तहलका' माजवायला कुणीच का नसते..

    उत्तर द्याहटवा
  3. Hmm..Owing to My command over Irani marathi, I can not say for sure that I have understood the crux of ur post. I think this post is for awareness of Breast Cancer,..Right?...
    I think following observation wud not be out of place..
    Well, I also get amused reading various statistical medical findings which relate some weird stuff to some disease..I remember I read once such finding saying that ppl who have regular sex have less chance of heart attacks..so it won't be amusing if some boy uses following pick-up line in a bar to hook up with a chic(assumed that she has gud rack).....

    I am wrking for Ngo which spread awareness on deadly diseases like cancer and heart attacks, so if you can come with me tonight we can work on this cause and try to prevent them..what do u say?
    I suggest u try this line sincerely and see if you can break your long fast...what do u say?

    on serious note, one question
    वार्ताहराची आणि सिग्नल वरच्या पोराची सारख्याच प्रमाणात कीव येते. tashich man marun divasbhar cubicle madhe basun khadkhud karnaryachi kiv yet nahi ka?


    And lastly don't forget getting urself timestamped bfor 35 is gonna cost you extra 30K

    उत्तर द्याहटवा
  4. Mustafa,
    Thanks for the suggestion.
    I think the trick-'NGO activist', would only work if Barney pulls it out. Good addition to the official Playbook! waddup..
    AFAIK I am still in Barnism 101. :)

    On your serious note; yep, I agree that it is a serious thought and I shouldn't say anything on it. I am not out of the game yet.

    उत्तर द्याहटवा
  5. पाटील नक्की ज्वलंत प्रश्न काय आहे ? :-)
    लग्न , कॅन्सर कि बंगलोर टाइम्स :-)
    कि अजून काही भलतंच ?

    उत्तर द्याहटवा
  6. हेमचंद्र..
    प्रश्न आहेरे.. लिहिता येत नाही.. अलीकडेच साधुसंतांनी म्हटल्याप्रमाणे..
    "जोभी मै केहना चाहू, बरबाद करें अल्फाज़ मेरे.."

    उत्तर द्याहटवा
  7. http://www.nydailynews.com/life-style/health/beer-health-drink-daily-brew-good-heart-article-1.981155

    see above link...I am waiting for a day when it would be proven that having pint in morning helps increase efficiency at work...Actually this experiment has been done at PTS and its 100% success.

    and those days saints will write
    जब भी में पी के बोलू , आबाद करे अल्फाज़ मेरे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

अभिप्रायासाठी अनेक आभार!

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

अवकाश मोहिमांवर अवाढव्य खर्च करणे योग्य आहे का

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक