मिशन इम्पॉसिबल-घोस्ट प्रोटोकोल


हिंजवडी आयटी पार्कमध्ये बॉंबच्या अफवेने खळबळ

काय राव एवढा वेळ बाहेर ताटकळत उभे केले, कमीत कमी गावठी बॉम्ब तरी मिळायला हवा होता.. असा सुस्कारा सोडत परत क्युबिकल मध्ये आलो.
मागच्या दोन - अडीच तासांपासून पोलीस, बॉम्ब हुंगनारी कुत्री आणि अचकट विचकट विनोद करणारं पब्लिक यांचा खेळ संपला. आम्हाला जेव्हा बाहेर काढले तेव्हा
काय झाले याची कल्पना नव्हती. असेल फायर ड्रील म्हणून आम्ही सगळे बाहेर आलो. नंतर पोलिसांच्या आणि बॉम्बशोधक पथकाच्या ७-८ व्यान दिसल्यावर म्हटले कुणीतरी पुडी
सोडलेली दिसतीये. बरं सगळा परिसर पोलिसांनी ब्लॉक करून ठेवलेला, नाहीतर वर जावून जीवावर उदार होऊन जीमेल चेक करायची तयारी असलेले वीरही होते आजूबाजूला. मध्येच पोलिसांनी काही लोक मदतीला लागणारेत असे जाहीर केले, लगेच पटापट आमच्यामधून काही उत्साही पोरं गेली. त्यांच्या धाडसाचे कौतुक करायचा अवकाश की २ मिनिटात चार पाच गाड्या पार्किंग मधून निघाल्या. पठ्ठे बिल्डिंग मध्ये घुसताच पार्किंग मधून गाड्या घेवून घरी पळाले.
तर अशाप्रकारे सहा साडेसहा वाजून गेल्यावर मी नेहमीपेक्षा लवकर निघालो, मुस्तफाला फोन केला आणि मिशन इम्पॉसिबल बघायचे ठरवले.

१५ मिनिटं उशीरच झाला. तोपर्यंत टॉम क्रुझ क्रेमलिन मध्ये घुसला होता.

सिनेमाची कथा फार काही गुंतागुंतीची नाही.
एक हेन्ड्रिक्स उर्फ कोबाल्ट नावाचा हिरो जगाचे पापक्षालन करू पाहत असतो. जगात अणुयुद्ध घडवून आधी केलेली खिचडी साफ करायची आणि मानवजातीला उत्क्रांतीच्या पुढच्या पायरीवर न्यायचे असा एकदम झकास प्ल्यान असतो त्याचा. [3]


ही पाककृती करण्यासाठी तुम्हाला हवे-
१. आण्विक क्षेपणास्त्र प्रक्षेपक नियंत्रक.
२. प्रक्षेपण संकेत.
३. आज्ञा परिवहन उपग्रह.

थोडक्यात, बॉम्बचा कंट्रोल, तो सोडण्यासाठीचे पासवर्ड, आणि तशी ऑर्डर पोहोचवण्यासाठी उपग्रहाचा कंट्रोल.
पण आपल्या इथन हंट (टॉम क्रुझ) आणि कंपुला पोटापाण्यासाठी काहीतरी काम हवे म्हणून आय.एम.एफ. त्यांना या कोबाल्टच्या मागावर पाठवतात. मग गुप्तहेर सिनेमाला साजेसे असे जगभ्रमण करून ही टीम टॉम (हे हे..) त्याचा प्ल्यान उधळून लावतात.

पिच्चरचे तीन भाग होतात-

मॉस्को-
जेलमधून इथन हंटला एजंट कार्टर आणि डन बाहेर काढतात. क्रेमलिन मध्ये घुसून कोबाल्ट बाबतची गुप्त माहिती काढण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाते. अतिशय भन्नाट पद्धतीने[१] गार्ड्स ला चकवल्यावर जेव्हा क्रेमलिनच्या गाभाऱ्यात इथन पोहोचतो तोपर्यंत रेकॉर्ड्स गायब झालेले असतात. कोबाल्ट क्रेमलिनमध्ये स्फोट घडवून आणतो आणि आळ येतो तो पकडल्या गेलेल्या इथन वर. रशियासाठी हे अमेरिकेने सुरु केलेलं अघोषित युध्दच. इथन पकडला गेल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष घोस्ट प्रोटोकोल लागू करतात. ज्यामुळे यदाकदाचित आय.एम.एफ.चे नाव वर आले तर यात अमेरिकन सरकारचा काहीही संबंध नाही आणि ती एक अतिरेक्यांची संघटना आहे असे भासवले जाणार होते. त्यामुळे पकडला गेलेला इथनला देशद्रोही ठरवून त्याला देहदंड करणे हे अपरिहार्य होते.
इथन मॉस्कोमधल्या हॉस्पिटल मधून पळून जातो आणि आय.एम.एफ. च्या प्रमुखांना भेटतो. त्याला परिस्थितीची कल्पना दिल्यावर ते इथनला रशियातून पळून जावून स्वत:हून कोबाल्टला पकडण्याचे संकेत देतात. तेवढ्यात रशियन सैनिक त्यांच्या गाडीवर हल्ला चढवतात आणि आय.एम.एफ. चे प्रमुख मारले जातात. उरतो तो इथन आणि प्रमुखांचा सल्लागार विश्लेषक विल्यम (जेरेमी रेनर). आता अमेरिकन सरकारने अस्तित्व नाकारलेली आय.एम.एफ. च्या मदतीशिवाय इथन, कार्टर, डन आणि विल्यम वर जग वाचवण्याची जबाबदारी पडते.
कोबाल्ट तोपर्यंत पाककृती आयटम एक मिळवतो.


दुबई
पाककृती आयटम दोन मिळवण्यासाठी सगळे बुर्ज खलीफा या जगातल्या सगळ्यात उंच इमारतीमध्ये जमा झालेत. इथे अतिशय मस्त असा सिक्वेन्स आहे. इथन कंपू हिरोला पकडण्याचे अयशस्वी प्रयत्न करतो. हा घटनाक्रम पाहण्यासारखा. कोबाल्ट इथून निसटल्यावर एका शास्त्रास्त्र तस्कराकडून इथनला कोबाल्टचा पुढचा पत्ता मिळतो.
कोबाल्ट इथे आयटम दोन मिळवतो.

मुंबई
[२]

रशियाकडून मुंबईस्थित ब्रीज नाथ (अनिल कपूर) या उद्योगपतीने लष्कराचा जुना उपग्रह घेतलाय (गोर्शकोव्ह घेतली तसा).
हा उपग्रह ही कोबाल्टची शेवटची किल्ली. एजंट कार्टर आपल्या ब्रीज नाथाकडून उपग्रह ओवरराईड करायचे कोड बोलावेपर्यंत, कोबाल्ट पॅसिफिक मधल्या रशियन पाणबुडीला आण्विक क्षेपणास्त्र सॅनफ्रान्सिस्कोवर फेकून मारण्याची संकेत आणि आज्ञा पाठवतो. भले शाब्बास!
पण मग बळच इथन ते शहर आणि पुढचे गैरसमजातून उद्भवलेले अणुयुद्ध कसे वाचवतो हे दाखवतात. बिचारा हिरो शेवटच्या श्वासापर्यंत फाईट देतो राव.

पिच्चर २ सीन साठी पैसे वसूल आहे. 

१. क्रेमलिन मध्ये गार्डला चकवण्यासाठी डन ने केलेली करामत. 
२. बुर्ज खलीफा वरची दृश्ये.

न्युक्लियर मिसाईल लाँच लय वेळा पाहिलंय पण तरीपण बेस्ट. अनिल कपूर काहीही. पण चार लीड्स नंतर त्यालाच जास्त काम आहे त्यामुळे पाच मिनिटाच्या फुटेज मध्ये लक्षात राहतो.

एजंट कार्टर झालेली पॉला पॅटण भारी मटेरियल आहे. कुठं होती ही?



जेरेमी रेनर ला दुसऱ्यांदा पाहिलंय मी, पहिल्या वेळी हर्ट लॉकर मध्ये. (अवतार मध्ये जेक सली चा अवतार याच्यासारखा दिसतो ना? सॅम वार्थिंगटन च्या आधी याच्यावरूनच मॉडेल तयार केले असावे.)

आता लय वेळ झालीये. परत काही राहिलेले आठवले तर नंतर टाकीन.

----

[१] खरेतर त्या क्रेमलिन मधल्या प्रोजेक्टर सीन साठी २-३ डायग्राम टाकायच्या होत्या, पण एवढेही समजायला क्लिष्ट नाहीये. ग्राफिक्सेतर मंडळींना किती समजले असेल काय माहित.

[२] च्यायला आधी बँगलोर म्हणत होते. पाट्या कन्नड मध्ये आहेत. काहीतरी लोचा केला राव इथे.
ते काही खरेच नै कई आले मुंबईत शुटींगला, कॅनडाच्या वँकुवर मध्ये तो सेट उभा केलाय. हे पहा.

[३] जॉनी क्वेस्ट मधला एक एपिसोड पण असाच आहे. त्यात प्रलय आणण्यासाठी विलन २ शक्तिशाली थर्मोन्युक्लियर बॉम्ब खोलपर्यंत पुरतो. अपेक्षा अशी की ते फुटल्यावर पृथ्वीवरचे मोठे मोठे ज्वालामुखी राख आणि इतर वायू ओकू लागतील. त्यामुळे पृथ्वीभोवती राखेचे आवरण तयार होऊन ती थंड होईल आणि प्राणीजीवन नष्ट होईल.
The Edge of Yesterday

टिप्पण्या

  1. te ghost protocol kay hota te kalala :-)
    ani ho Marine Drive cha ek scene ahe barka. gadi jatana

    उत्तर द्याहटवा
  2. प्रतिसादाबद्दल थँक्स. ते मरीन ड्राईव चा पार्ट म्हंजे शक्तिमान मध्ये 'स्टारशिप ट्रूपर्स' आणि 'प्रीडेटर' चे फुटेज वापरायचे तसे आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. आशिष,
    माझ्या ब्लॉग ला भेट दिल्याबद्द्ल खुप खुप आभार!!!
    तुम्ही इतक्या प्रतिक्रिया दिल्या आहेत कि मला त्यावर पुन्हा प्रतिक्रिया द्यायला बराच विचार करावा लागत आहे.
    आता तुम्हाला फक्त पोच देत आहे कि तुमच्या प्रतिक्रिया मी वाचल्या आहेत आणि सविस्तर नंतर लिहिन.
    येत रहा.

    खुप खुप आभार!!!

    - आपला (आपल्या पासुन ६०० प्रकाशवर्षे दुर असलेला) केपलरवासी

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

अभिप्रायासाठी अनेक आभार!

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

अवकाश मोहिमांवर अवाढव्य खर्च करणे योग्य आहे का

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक