पोस्ट्स

द ब्रीज ऑन द रिवर क्वाय: आत्मघातकी वेडाची कथा

इमेज
' कर्नल बोगी मार्च ' ही शीळ न ऐकलेला विरळाच असेल. आता नावाने कदाचित लक्षात नाही येणार, पण ऐकले तर मी कशाबद्दल बोलतोय हे लगेच समजेल. लष्कर आणि परेड यांचा अविभाज्य भाग बनलेली ही शीळ आहे याच सिनेमातली [३]. ह्या पिक्चर बद्दल लिहिणे हि मोठीच जबाबदारी आहे, मोठे समीक्षकच करू जाणे. पण आधीच कुठेतरी म्हटल्याप्रमाणे, "दिवसा प्रचंड सूर्य तळपतोय म्हणून काजव्याने आपली चमकवणे सोडून द्यावे का?"असो.. या पिच्चर चे सिनेमाच्या इतिहासात एक स्वतंत्र स्थान आहे. निर्मितीमूल्य, मनोहारी छायाचित्रण, बांधून ठेवणारी कथा, विषयाची तटस्थ आणि सगळे पैलू तितक्याच ताकदीने मांडणारी हाताळणी, तर्क आणि अभिनय या सगळ्या आघाड्यांवर हा सिनेमा मापदंड ठरलाय. आमच्या बँगलोर [१] मध्ये मी राहायचो तिथे, इंटरनेट वाल्याने पिक्चर, सिरीज, गेम्स, सोफ्टवेअर आणि बरेच 'किडूक मिडूक' याचा खंडीभर मोठा संचय करून ठेवला होता. त्याच्यात नाही नाही ते सिनेमे मिळायचे. असेच एका आळसावलेल्या सप्ताहांतात खिडकीतून बाहेरच्या टळटळीत दुपारीकडे बघत असता मला या सिनेमाची आठवण झाली. लागलीच या संचयातून तो काढला आणि बघितला. ...

समूर्त रामकीर्ति मी, ज्ञात हें सुरासुरां

इमेज
सध्या गीतरामायणाने पार येडं केलंय. माझ्या लॅपटॉप मध्ये खूप दिवासांपासून पडून होते, पण ऑफिसला जाताना बसमध्ये ऐकायला सुरुवात केली. अत्युच्च प्रतिभेचे साकार रूप ऐकून कधीकधी डोळ्यात पार पाणी येते. सर्व गाणी, चाल, अर्थ, शब्द अप्रतीम. त्यात कदाचित माझ्या सध्याच्या मूडला वीररसपूर्ण गाणी लैच आवडतायेत. त्यात हे टायटल चे सीतेने रावणाला ठणकावणे- नको करुंस वल्गना रामाला वनवासाला धाडतायेत हे समजल्यावर लक्ष्मणाचा क्रोध डोळ्यासमोर आणणारे- रामावीण राज्य पदी कोण बैसतो विश्वामित्रांनी यज्ञरक्षणार्थ रामरायाला दशरथाकडे मागणे आणि त्राटिका वध- ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा मार ही त्राटिका रामचंद्रा ही गाणी सारखी गुणगुणावीशी वाटतात. तसेच मधुर चालींची आणि नीती सांगणारी ही पण, रामाचे वालीला सांगणे- वालीवध ना, खलनिर्दालन युद्धाच्या पूर्वसंध्येला रावणाबरोबर द्वंद्व करण्याचे नसते साहस केलेल्या सुग्रीवाला रामाचे खडे बोल- सुग्रीवा हे साहस असले कुंभकर्णाने रावणाची केलेली निर्भत्सना आणि तरीही कर्तव्यपूर्तीसाठी तयार होणे- लंकेवर काळ कठीण आज पातला बाबुजी काय चीज आहे हे आता कुठे समजतंय. गीतराम...

मिशन इम्पॉसिबल-घोस्ट प्रोटोकोल

इमेज
हिंजवडी आयटी पार्कमध्ये बॉंबच्या अफवेने खळबळ काय राव एवढा वेळ बाहेर ताटकळत उभे केले, कमीत कमी गावठी बॉम्ब तरी मिळायला हवा होता.. असा सुस्कारा सोडत परत क्युबिकल मध्ये आलो. मागच्या दोन - अडीच तासांपासून पोलीस, बॉम्ब हुंगनारी कुत्री आणि अचकट विचकट विनोद करणारं पब्लिक यांचा खेळ संपला. आम्हाला जेव्हा बाहेर काढले तेव्हा काय झाले याची कल्पना नव्हती. असेल फायर ड्रील म्हणून आम्ही सगळे बाहेर आलो. नंतर पोलिसांच्या आणि बॉम्बशोधक पथकाच्या ७-८ व्यान दिसल्यावर म्हटले कुणीतरी पुडी सोडलेली दिसतीये. बरं सगळा परिसर पोलिसांनी ब्लॉक करून ठेवलेला, नाहीतर वर जावून जीवावर उदार होऊन जीमेल चेक करायची तयारी असलेले वीरही होते आजूबाजूला. मध्येच पोलिसांनी काही लोक मदतीला लागणारेत असे जाहीर केले, लगेच पटापट आमच्यामधून काही उत्साही पोरं गेली. त्यांच्या धाडसाचे कौतुक करायचा अवकाश की २ मिनिटात चार पाच गाड्या पार्किंग मधून निघाल्या. पठ्ठे बिल्डिंग मध्ये घुसताच पार्किंग मधून गाड्या घेवून घरी पळाले. तर अशाप्रकारे सहा साडेसहा वाजून गेल्यावर मी नेहमीपेक्षा लवकर निघालो, मुस्तफाला फोन केला आणि मिशन इम्पॉसिबल बघायचे ठरवल...

टू ऍण्ड अ हाफ मेन-१

इमेज
इथे मला थोडं रडायचं आहे, त्यामुळे जर एखाद्याला डायरेक्ट टू अॅन्ड अ हाफ मेन वर उडी मारायची असेल तर भाग २ पाहावा. विषयाला सोडून लिहिले म्हणून कोणी टांगणार आहे का? गेले एक महिना मला या विषयावर लिहायचे होते. लिही लिही असा आग्रह कितीदा झाला. म्हणजे आग्रह स्वतःचा स्वतःच केला, कारण आमचा ब्लॉग हा काही फार जणांच्या कौतुकाचा विषय नाही, त्यामुळे "लिही की, का न लिहिण्याएवढे तुझे आयुष्य तृप्त झालंय"[१] असहि कोणी विचारत नाही, कि "तुझ्या पुढल्या पोस्ट ची आतुरतेने वाट पाहतोय" अशी लडिवाळ कॉमेंट येत नाही. उलट "बरय बेणं गप् पडलय" असाच सूर जास्त. बंगलोर ला महिन्यातून माझे ५ पिक्चर होत होते. काढली अॅक्टीवा कि निघालो पिक्चरला असे एकंदरीत चालले होते. या आठवड्यात एकही पिक्चर रिलीज नाही झाला म्हणून नुसतेच बर्गर खावून मॉल मधील माल [२] पाहून परत येण्याचे कठीण पण प्रसंग आले. सजितने आपण या मॉल चा मासिक पास काढू अशी आयडियाही दिली होती. रात्री पिच्चर बघून येणे आणि दिवसा सोयीप्रमाणे ऑफिस ला जाणे. पण जसे बंगलोर सोडून पुण्यात आलो, मेरे तो दिन हि बदल गये. भल्यापहाटे ७.३५ वाजता उठावे ...

आली एकदाची..

इमेज
काल बँगलोर च्या मेट्रो ने प्रवास केला. प्रवास केला म्हणजे, एका स्टेशन वरून चढलो, दोन स्टेशन सोडून उतरलो, आणि परत विरुद्ध बाजूने चढून प्रारंभीच्या स्टेशन वर आलो. थोडक्यात गाडी गाडी खेळलो. गेली पाच वर्षे जिची बंगळूरकर आतुरतेने वाट पाहत होते तिचा पहिला टप्पा सुरु झाला या आठवड्यात; आणि लोकांनी आपली लाडकी मेट्रो बघायला रजनीकांतच्या सिनेमाला होते तशी गर्दी केली. रविवार ची सुट्टी साधून काही मंडळी सहकुटुंब या चमत्काराला पाहायला आली होती. जशी स्टेशन वर एन्ट्री घ्यायची तशी आरोळ्या आणि शिट्ट्या मारून आनंद व्यक्त करत होते. माझाही हा पहिलाच मेट्रो प्रवास होता. मी दिल्ली मेट्रो नाही अनुभवली त्यामुळे मलाहि तिचे अप्रूप होतेच. या शहराने अक्षरश: हाल सहन केले आहेत हा दिवस पाहण्यासाठी. पूर्ण बँगलोर खोदलेले, अशक्य ट्रॅफिक, प्रत्येक रस्त्यावर मेट्रोचे खांब टाकायचे काम चालू, रस्ता धुळीने माखलेला अशी अवस्था प्रत्येक मुख्य मार्गांची. अजूनही कामे चालूच आहेत. मी स्वतः अनुभवलेली गोष्ट म्हणजे ८-१० किमी जायचे असेल तरी नको नको व्हायचे. बरं इथली ट्रॅफिकच वेगळी.. हे रुंद रोड पण एकदा अडकले तर ५-५, १०-१० मिनिटे ...