इतिहासातून भविष्य घडवण्यासाठी

खरंच शिवाजी महाराजांचा पुतळा अरबी समुद्रात उभारणे गरजेचे आहे का? आपण महाराष्ट्रात दुसऱ्या ठिकाणी हा पुतळा उभारू शकत नाही का?

हा पुतळा उभारायचाच असेल तर महाराष्ट्रातील एखाद्या दुष्काळी पट्ट्यात उभारावा. पुण्या, मुंबई, नागपूरवरून तिथे जाण्यासाठी 6 पदरी हायवे तयार करावा, जेणे करून तिथला विकास जोर धरेल, तिथल्या स्थानिकांना उत्पन्नाचा स्रोत तयार होईल. मुंबईसारख्या आधीच विकसित आणि लोकसंख्याबहुल भागामध्ये आणखी एक गर्दीचे ठिकाण वाढवून काय साध्य करणार?

गुजरात मध्ये देखील स्टॅच्यु ऑफ युनिटी अशाच ठिकाणी आहे जिथे 80 किलोमीटर च्या वर्तुळात एकही मोठे शहर नाही. तिथे या भव्य पुतळ्यासारखे पर्यटन आकर्षण बनवून गुजरात सरकारने एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत.

या पुतळ्याबरोबर महाराजांच्या शेकडो गडकिल्ल्यांपैकी किमान दहा किल्ले तरी युरोपमधल्या पर्यटन स्थळांसारखे विकसित केले तर मोठे काम होईल.

महाराजांच्या नावाचा वापर फक्त आपली पोळी भाजण्यासाठी करणाऱ्या, एकमेकांच्या आमदारांना चोरासारखे लपवणार्या लोकांकडून ही अपेक्षा नाही हे वेगळे सांगणे नकोच.

फ्रेब्रुवारी 2019 मध्ये स्टॅच्यु ऑफ युनिटी बघण्याची संधी मिळाली. त्याबद्दल -


Answer to Did the Statue of Unity in India fail? answer to Did the Statue of Unity in India fail?



टिप्पण्या

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

अवकाश मोहिमांवर अवाढव्य खर्च करणे योग्य आहे का

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक