म्हणे आम्ही बिझी झालो-२
भाग १ पासून पुढे. Septermber 2012 मराठी मालिकांनी कहर केलाय. त्याच टिपिकल सास बहु टाईप कथा. पण त्या कमी म्हणून आता बऱ्याच मालिकांत भुताटकी, चेटूक वगैरे वगैरे दाखवायला लागलेत. विरोधाभास बघा- माझे वडील वेळ घालवायला पुस्तके शोधून काढतायेत आजकाल. त्यांना मला कधीकाळी ६वी - ७वीत असताना बक्षीस मिळालेले नरेंद्र दाभोळकरांचे 'श्रद्धा-अंधश्रद्धा' हे पुस्तक मिळाले. ते हातात घेवून ते ती भुक्कड अंगात आलेली "सुवासिनी" बघतात. आता तर कहर झालाय. एकापाठोपाठ "देवयानी", "सुवासिनी", "स्वप्नांच्या पलीकडले" असा रतीब चालुये. तरी बरं माझ्या काका-काकूंकडे फेमस असलेले "पुढचं पाउल" ने इकडे घरात अजूनतरी पाउल ठेवलं नाहीये. या मालिकांमुळे माझे टीवी बघणे महिन्याच्या ३-४ तासांवर आले आहे (अतिशयोक्ती नाही). डिस्कवरी पूर्णपणे गायब झालीये. नॅट-जिओ चा आवाज क्षीण होत गेला. या डेली सोप मालिका जरी महिन्याभरानंतर पाहिल्यातरी तसूभर हललेल्या नसतात. पण आईला म्हटले की हा एवढा पिच्चर बघुदे तर ती म्हणते की "काय तेच तेच पाहतो रे? मला एवढे बघुदे, आज अमकी ...