पोस्ट्स

History लेबलसह पोस्ट दाखवत आहे

एका तेलियाने

इमेज
मी मागच्याच आठवड्यात "एका तेलियाने" हे गिरीश कुबेरांचे पुस्तक वाचले. सौदी अरेबिया, व्हेनेझुएला, लिबिया, कुवेत, इराण इत्यादी तेलउत्पादक देशांचा २० व्या शतकातला संक्षिप्त इतिहास वाचायला आवडणार असेल तर तुमच्यासाठी हे चांगले पुस्तक आहे. पश्चिम आशियातल्या मागास टोळीवाल्या देशांमध्ये विसाव्या शतकातच्या सुरुवातीला खनिज तेल मिळाल्यानंतर तिथले झालेले बदल; अमेरिका, ब्रिटन, फ्रांस, सोविएट रशिया या तात्कालीन बड्या राष्ट्रांमध्ये या नवीन संपत्तीवर वर्चस्व मिळवण्यासाठी चालू असलेली रस्सीखेच; इस्राएल, पॅलेस्टिन, इजिप्त, लिबिया, सीरिया यांचा या खेळामध्ये केला गेलेला वापर, युद्ध, तह, हेरगिरी; ते तेल विकून मिळालेल्या अमर्याद संपत्तीचा उपभोग घेणारे शेख यांच्या अजब कहाण्या या पुस्तकात आहेत. पुस्तकाचा आवाका मोठा असला तरी त्यात क्लिष्टता नाही वाटली. आणि या पुस्तकाची सर्वात आवडलेली बाब म्हणजे या सर्व घटनांना एक हिरो देखील आहे. सौदी अरेबियाचा तेलमंत्री म्हणून कारकीर्द गाजवलेले झाकी यामानी हे या पुस्तकाचे नायक. अरब तेलावर पोसलेल्या पाश्चात्य विकसित देशांच्या तेल कंपन्यांना त्यांच्याच पद्धतीने वठणीव...

राष्ट्र आणि राष्ट्रवाद

इमेज
  हजारो वर्षांचा तथाकथित दैदिप्यमान इतिहास आणि वैभव असलेली ही भारतभूमी शेकडो वर्षे परकियांच्या आक्रमणासमोर हतबल का झाली? कुणीच का टिकू शकले नाही? या प्रश्नाला बरेच कंगोरे आहेत. "हजारो वर्षांचा तथाकथित दैदिप्यमान इतिहास आणि वैभव असलेली ही भारतभूमी" प्रश्नाच्या या भागात थोडा खोचकपणा जाणवतो. दैदिप्यमान इतिहास म्हणजे नक्की किती काळासाठी होता हे कसे ठरवणार? कारण गेल्या ७५ वर्षासारख्या तुलनेने कमी कालखंडात देखील भारतात ६५ चे युद्ध, ७१ चे युद्ध, आणीबाणी, दंगली, अणुस्फोट, दुष्काळ, लायसेन्स राज, भ्रष्टाचार घोटाळे, आयटी क्रांती, आनंदवनासारख्या सेवेकरी संस्था, शेतकरी आत्महत्या, मध्यमवर्गाचा उदय, उदारीकरण असे कितीतरी चांगलया आणि वाईट घडामोडी घडल्या. तर "हजारो" वर्षांमध्ये काय काय घडले असेल. काही गोष्टी चांगल्या असतील काही वाईट. या सर्वांमधून किमान "भारतभूमी" ही ओळख अंशतः तरी आपण टिकवून ठेवली म्हणून सोयीसाठी म्हणूया "हजारो वर्षांचा दैदिप्यमान". आता तथाकथित या शब्दावर येऊ. एखाद्या राष्ट्राला दैदिप्यमान इतिहास आहे किंवा नाही हे कोण ठरवते? - बऱ्याचदा त्या त्या र...

स्टॅचू ऑफ युनिटी - फसलेला प्रकल्प का फायद्याची गुंतवणूक?

इमेज
Did the Statue of Unity in India fail? मी २०१९ च्या फेब्रुवारी महिन्यात स्टॅचू ऑफ युनिटी ला भेट दिली. स्टॅचू ऑफ युनिटी बडोद्यापासून साधारण ८० किमी वर असलेल्या केवडीया या छोट्या गावाजवळ आहे. मी तिथे बडोद्यावरून साधारण ५ वाजता पोचलो. तिथे दोन प्रकारचे तिकीट मिळतात. पहिल्या प्रकारचे १२० रुपयांचे तिकीट घेऊन तुम्ही पुतळ्याच्या पायाजवळ जाऊ शकता. दुसऱ्या प्रकारचे तिकीट घेऊन तुम्हाला सरदार पुतळ्याच्या छातीपर्यंत असलेल्या निरीक्षण दालनापर्यंत जाता येते. हे तिकीट ३५० रुपयांना मिळते. मला खरेतर उंचीवर असेलेल्या या निरीक्षण दालनापर्यंत (Observation Deck) जायचे होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही महाग तिकिटे संपली होती. तिकीट खिडकीवरच्या क्लर्क ने सांगितले की ही तिकिटे मर्यादित असतात आणि दिवसाला "फक्त" ७००० तिकिटेच दिली जातात. मी सप्ताहांतात आलो नव्हतो. तो शुक्रवार होता तरीही ही महाग तिकिटे चक्क संपली होती. थोडा हिरमोड झाला, पण माझ्याबरॊबर बरेच लोक होते ज्यांना ही तिकिटे मिळाली नव्हती. नाईलाजाने नॉर्मल तिकीट घेतले. ७००० तिकिटे दर दिवसाला आणि नॉर्मल तिकिटे कितीही. आता तुम्हीच अंदाज लावा. स्...

इतिहासातून भविष्य घडवण्यासाठी

इमेज
खरंच शिवाजी महाराजांचा पुतळा अरबी समुद्रात उभारणे गरजेचे आहे का? आपण महाराष्ट्रात दुसऱ्या ठिकाणी हा पुतळा उभारू शकत नाही का? हा पुतळा उभारायचाच असेल तर महाराष्ट्रातील एखाद्या दुष्काळी पट्ट्यात उभारावा. पुण्या, मुंबई, नागपूरवरून तिथे जाण्यासाठी 6 पदरी हायवे तयार करावा, जेणे करून तिथला विकास जोर धरेल, तिथल्या स्थानिकांना उत्पन्नाचा स्रोत तयार होईल. मुंबईसारख्या आधीच विकसित आणि लोकसंख्याबहुल भागामध्ये आणखी एक गर्दीचे ठिकाण वाढवून काय साध्य करणार? गुजरात मध्ये देखील स्टॅच्यु ऑफ युनिटी अशाच ठिकाणी आहे जिथे 80 किलोमीटर च्या वर्तुळात एकही मोठे शहर नाही. तिथे या भव्य पुतळ्यासारखे पर्यटन आकर्षण बनवून गुजरात सरकारने एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. या पुतळ्याबरोबर महाराजांच्या शेकडो गडकिल्ल्यांपैकी किमान दहा किल्ले तरी युरोपमधल्या पर्यटन स्थळांसारखे विकसित केले तर मोठे काम होईल. महाराजांच्या नावाचा वापर फक्त आपली पोळी भाजण्यासाठी करणाऱ्या, एकमेकांच्या आमदारांना चोरासारखे लपवणार्या लोकांकडून ही अपेक्षा नाही हे वेगळे सांगणे नकोच. फ्रेब्रुवारी 2019 मध्ये स्टॅच्यु ऑफ युनिटी बघण्याची संधी मिळाली. त्य...

बदलुराम का बदन जमीन के नीचे है

इमेज
Tue. may 2016 मागे एकदा ब्रिज ऑन रीवर  क्वा य  वर लिहिले होते. त्यात कर्नल बुगी मार्च हे गाणे सैनिक मार्च पास करताना वापरायचे याचा उल्लेख केला होता. असेच एक आणखी रेजिमेंटल सॉंग फेसबुक वर अमित ने शेयर केले काल परवा. "बदलुराम का बदन" हे ते गाणे. गाण्याच्या ओळी अशा आहेत - "बदलूराम का बदन जमीन के नीचे है, बदलूराम का बदन जमीन के नीचे है, तो हमे उसका राशन मिलता है" असाम रेजिमेंट चे गाणे आहे हे. या गाण्यामागची कथा थोडी करूण पण गमतीशीर आहे. दुसर्या महायुद्धात असाम रेजिमेंट बदलूराम नावाचा सैनिक धारातीर्थी पडला होता. पण त्याच्या हुशार क्वार्टर मास्टर ने त्याच्या वाट्याचे रेशन चालूच ठेवले. पुढे जेव्हा कोहीमाला जपान्यांच्या वेढा पडला, त्या वेळी हे जास्तीचे रेशनमुळे ब्रिटीश-भारतीय सैनिकांना आणखी काही दिवस तग धरता आला अशी ती कथा. खरेतर एका सैनिकाचे रेशन घेवून असा कितीसा फरक पडणार असे वाटू शकते. कदाचित बदलूराम पासून चालू झालेली हि प्रथा त्यांच्या क्वार्टर मास्टर ने आणखी बर्याच मृत सैनिकांसाठी वापरली असावी आणि त्यामुळे त्यांना वेढ्याच्या ...