पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नेत्रसुखद ग्रॅविटी

इमेज
ग्रॅविटी पाहिला मागल्या आठवड्यात. त्याबद्दल लिहायचे अगदीच ठरवले नव्हते.याचे कारण म्हणजे या पिक्चरमध्ये फारसे लिहिण्यासारखे आहे असे मला वाटले नाही, त्यात अजून लडाख चा पोस्ट चाराण्याएवढा पण लिहून झाला नाहीये, आणि महत्त्वाचे म्हणजे गुगल ट्रांसलिटरेट वापरून ग्रॅविटी लिहायला इतर शब्दांपेक्षा थोडे जास्त कष्ट पडतात. तसे एकदा लिहिले की कॉपीपेस्ट करत सुटायचे.. पण आळसाला काहीही कारण पुरते. मला ग्रॅविटी देखणा वाटला. पण तर्क लावायला फारशी संधी नसल्यानं जरा माठ टाईप चा वाटला. नंतर विकीशी बोलताना तिने सांगितले की अगदी बझ ऑल्ड्रीन (नील आर्मस्ट्रॉन्ग बरोबर चंद्रावर उतरलेला अंतराळवीर) पासून जेम्स क्यामेरून पर्यंत सगळ्यांनी या पिच्चर ची तोंडभरून स्तुती केलीये. त्यामुळे अचनाक मला ग्रॅविटी च्या थोरवीचा साक्षात्कार झाला. म्हणजे मी कुठे माठ वगैरे म्हटलो पिच्चरला? छे काहीतरीच राव, एवढा भारी पिच्चर.. वगैरे वगैरे. (You have never seen a hypocrite before? लेनर्ड TBBT S02E11.) पिच्चर तसा एकपात्रीच. नाही एक मिनिट.. सँड्रा बुलक १, जॉर्ज क्लूनी २, तो एक भारतीय अंतराळवीर ३, आणि ह्युस्टन वरचा आवाज ४. अशी ४ ...