पोस्ट्स

Quora लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सर्वात आनंदी देश : फिनलंड.. पण खरचका?

इमेज
मी गेले काही महिने फिनलंड च्या हेलसिंकी या राजधानी शहरात आहे. गेल्या ७ वर्षांपासून फिनलंडला सर्वात आनंदी राष्ट्र म्हणून घोषित करतायेत त्यामुळे इथे येण्यापूर्वीच उत्सुकता होती. भारताचा नंबर एवढा मागे का हे मलादेखील कोडेच आहे. मागे मागे तर मागे, रशिया, पॅलेस्टाईन, युक्रेन या युद्धाने गांजलेल्या देशांपेक्षा किमान या वर्षी तरी भारताचा वरचा नंबर असावा अशी अपेक्षा होती. त्यामुळे या Happiness Index भानगडीवर किती भरोसा ठेवायचा हे समजून जाते. पहिले तर आनंद म्हणजे काय याची व्याख्या बघायला हवी. कारण जे हा आनंद निर्देशांक बनवतात, ते स्वतःच्या व्याख्येनुसार सर्वेक्षण करत असतील, तर बऱ्याच गोष्टी इकडे तिकडे होऊ शकतात. मागे इंग्रजी कोरावरच एका आफ्रिकन नागरिकाचे उत्तर वाचण्यात आले होते. जगातल्या गरीब राष्ट्रांमध्ये त्याच्या देशाचा वरचा नंबर होता. पण त्याचे म्हणणे असे होते कि त्याने त्याच्या आजोबांना एवढ्या गरीब राष्ट्रामध्ये राहून देखील कधी दुःखी पाहिले नाही. त्यांनी कधी कर्ज घेतले नाही, कधी फार आजारी पडले नाहीत, स्वतःच्या शेतात पिकेल ते खाऊन अगदी ठणठणीत आयुष्य जगले. त्यांच्यासारखे असे बरेच जण त्याच्या...

धटुकले मोदीजी

इमेज
"आजच्या चांद्रयान 3 मोहिमेतील लँडर उतरविण्याचा जो शेवटचा टप्पा पार पडला त्यात टिव्ही स्क्रीनवर इस्रोचे वैज्ञानिक कमी आणि प्रचार मंत्री मोदीच जास्त का दाखवले जात होते? की ही एक 2014 च्या प्रचाराचा भाग आहे?" कोरा. कॉम वर कोणीतरी हा प्रश्न विचारला आहे. त्या प्रश्नाला माझे उत्तर- या प्रश्नातली खोचकता एक वेळ बाजूला ठेवू. मला देखील एकवेळ वाटले कि अगदी साऊथ आफ्रिकेत महत्वाच्या BRICS परिषदेतून वेळ काढून शेवटच्या मिनिटाला मोदींनी ISRO च्या कंट्रोल सेंटर ची अर्धी स्क्रीन व्यापायची काय गरज होती? ते तिथे असले नसले तरी त्या विक्रम लॅण्डर काही एक फरक पडला नसता. विरोधक म्हणतात तसे "स्वतःचा फोटो काढण्याची" उत्सुकता दुसरे काय? हो ना? पण एक गोष्ट लक्षात घ्या. २०१९ मध्ये मोदी स्वतः चांद्रयान २ च्या वेळी देखील इसरो च्या कन्ट्रोल रूम मध्ये प्रत्यक्ष होते. आणि लॅण्डर फेल गेल्यावर भारतद्वेष्ट्या गँग कडून प्रचंड ट्रोलिंग झाले होते. चांद्रयान ३ च्या वेळी देखील विक्रम लॅण्डर फेल होण्याची भरपूर शक्यता होती. अवकाश आहे ते. भले भले गडी अगदी नासा आणि स्पेसेक्स पासून चीनची CNSA च्या मिशन नियमितपणे...

लोक उदरनिर्वाहासाठी व्हिडिओ गेम खेळून पैसे कसे कमवतात?

इमेज
लोक उदरनिर्वाहासाठी व्हिडिओ गेम खेळून पैसे कसे कमवतात? प्रत्येक क्षेत्रामध्ये गुणवत्तेची, कौशल्याची आणि त्यातून होणाऱ्या अर्थार्जनाची उतरंड असते. ज्यांचे कौशल्य जास्त, संधी जास्त, नशीब बलवत्तर असे लोक या पिरॅमिड च्या वरच्या भागात असतात आणि ज्यांच्याकडे या गोष्टी कमी प्रमाणात असतात तसे तसे हे लोक या पिरॅमिड च्या खालच्या भागात असतात जिथे कौशल्य, संधी, नशीबाची साथ यापैकी काहीतरी कमतरता असते आणि त्यामुळे पैसे देखील कमी असतात. क्रिकेटचे उदाहरण घेतले तर काही शे आयपीएल लेवल चे क्रिकेटर सोडले तर क्रिकेट खेळून उदरनिर्वाह चालवतोय असे आपल्या आजूबाजूला कमीच लोक दिसतील. तसेच गेमिंग चे देखील आहे. आधुनिक युगात व्यावसायिक गेमर बनून पैसे कमावणे अगदीच अशक्य नाही. तरी ते एक करियर ऑप्शन होऊ शकते का याबाबत मलातरी शंकाच आहेत. मला वाटते अगदी कुमार वयात करियर निवडताना आवडी बरॊबरच आपण त्या क्षेत्रातील हजारावी, दहा हजारावी, एक लाखावी, दहा लाखावी कुशल व्यक्ती जर झालो तर आपल्याला त्यातून किती अर्थार्जन करता येईल याचा विचार व्हावा. उदाहरणार्थ कुणी अभिनय हा करियर पर्याय म्हणून विचार करत असेल तर पहिल्या दहा अभिनेत...

माणूस मोठा मानावा की पैसा?

इमेज
माणूस मोठा मानावा की पैसा मोठा म्हणावा? पैसा वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी केलेली एक योजना, एक अवजार, एक साधन आहे. माणूस मोठा कि हातोडा मोठा? हा प्रश्न का नाही विचारला जात बरे? जिथे खिळे ठोकण्याचे काम आहे तिथे हातोडा मोठा. तिथे माणूस कितीही चांगला असला तरी काय उपयोग?

एका तेलियाने

इमेज
मी मागच्याच आठवड्यात "एका तेलियाने" हे गिरीश कुबेरांचे पुस्तक वाचले. सौदी अरेबिया, व्हेनेझुएला, लिबिया, कुवेत, इराण इत्यादी तेलउत्पादक देशांचा २० व्या शतकातला संक्षिप्त इतिहास वाचायला आवडणार असेल तर तुमच्यासाठी हे चांगले पुस्तक आहे. पश्चिम आशियातल्या मागास टोळीवाल्या देशांमध्ये विसाव्या शतकातच्या सुरुवातीला खनिज तेल मिळाल्यानंतर तिथले झालेले बदल; अमेरिका, ब्रिटन, फ्रांस, सोविएट रशिया या तात्कालीन बड्या राष्ट्रांमध्ये या नवीन संपत्तीवर वर्चस्व मिळवण्यासाठी चालू असलेली रस्सीखेच; इस्राएल, पॅलेस्टिन, इजिप्त, लिबिया, सीरिया यांचा या खेळामध्ये केला गेलेला वापर, युद्ध, तह, हेरगिरी; ते तेल विकून मिळालेल्या अमर्याद संपत्तीचा उपभोग घेणारे शेख यांच्या अजब कहाण्या या पुस्तकात आहेत. पुस्तकाचा आवाका मोठा असला तरी त्यात क्लिष्टता नाही वाटली. आणि या पुस्तकाची सर्वात आवडलेली बाब म्हणजे या सर्व घटनांना एक हिरो देखील आहे. सौदी अरेबियाचा तेलमंत्री म्हणून कारकीर्द गाजवलेले झाकी यामानी हे या पुस्तकाचे नायक. अरब तेलावर पोसलेल्या पाश्चात्य विकसित देशांच्या तेल कंपन्यांना त्यांच्याच पद्धतीने वठणीव...

साधू संत येति घरा..

इमेज
पूर्वी जसे समर्थ महाराज, साईबाबा आणि असे बरेच संत महात्मे होऊन गेले, तसे लोक आता का दिसत नाहीत? इतके सामर्थ्यवान सध्या कोणी आहेत का? चांगला विचार करायला लावणारा प्रश्न आहे. मला याची पुढील कारणे दिसतात : १. साधुसंत ज्या काळात झाले त्या काळात त्यांच्या हयातीत आसपासच्या लोकांना सोडून किती जणांना हा माणूस सिध्दपुरुष आहे, संत आहे किंवा साधू आहे हे समजले असेल? या सिद्धपुरुषांनी आपले अवतारकार्य संपवल्यावरच त्यांच्या बऱ्याचशा महिमा त्यांच्या अनुयायांकडून इतर समाजाला समजल्या असतील, वास्तविकतेला कल्पनेची, गद्याला पद्याची जोड मिळून त्यांची कीर्ती सर्वदूर पोहोचली असेल. कस्तुरी मृगाला जसे स्वतःच सुगंधाचा स्रोत आहोत हे समजत नाही, तसेच वर्तमानात देखील आजूबाजूला असे सिध्दपुरुष असतीलही पण आपल्याला ते कळणार नाही किंवा उशिरा समजेल. इतिहासात बरेचदा हेच पाहायला मिळते कि महापुरुषांना खांद्यावर घेऊन नाचणाऱ्यांपेक्षा त्यांच्या मार्गात धोंडे घालणारेच जास्त असतात. किंबहुना अशा धोंडे घालणाऱ्या परिस्थितींवर ते मात करतात म्हणूनच भविष्यकाळात त्यांना महापुरुष म्हणून ओळखले जाते. वर्तमानात असे 'In Progress' मह...

कर्म आणि दैव

इमेज
मला पूजा करत बसणे, देव देव करत बसणे जास्त आवडत नाही "कर्म चांगले तर सर्व चांगले" असं माझं मत आहे. खरा देव काय हे या पूजा करणाऱ्यांना कळत नाही पण हे सांगायला गेलं की लोक मला वेड्यात काढतात. मी काय केले पाहिजे सर्व नमुने लोक भरलेत माझ्या अवती भोवती? 🙄 https://qr.ae/prGZjm एका व्याख्यानात[1] खालील कथा ऐकली होती. या विषयाला अनुसरून आहे म्हणून सांगतो. एकदा एक प्रख्यात डॉक्टर एका वेड्यांच्या हॉस्पिटल मध्ये जातात. हॉस्पिटल मधले सर्वात 'शहाणे' वेडे म्हणून तीन वेड्यांना त्यांच्यासमोर उभे केले जाते. या तिघांना डॉक्टर साहेब सांगतात "माझ्या प्रश्नाचे तुमच्यापैकी जो कोणी बरोबर उत्तर देईल त्याला हा आता बरा झाला आहे या सर्टिफिकेट सहित या हॉस्पिटल मधून आम्ही घरी सोडू". तिघेही वेडे कान टवकारतात. डॉक्टर प्रश्न विचारतात - ३ गुणिले ३ किती? पहिला वेडा - सोप्पंये ३ गुणिले ३ डाळिंब. या तिघांना 'शहाणे' म्हणून डॉक्टरांसमोर आणणाऱ्या जुनियर डॉक्टर कडे मोठे डॉक्टर रागाने बघतात. दुसरा वेडा - ३ गुणिले ३ बरोबर मंगळवार. आता मात्र तिथले जुनियर डॉक्टर आणि वॉर्डबॉय दोघांच्या कपाळावर ...

झी झर चे खुळ

इमेज
आजकाल महिला आणि पुरुष सोशलमीडियावर आपल्या नावा समोर '(he/him/his)' किंवा '(she/her)' लावतात, हे काय प्रकरण आहे? छोटे उत्तर - मागच्या काही वर्षात हे "प्रेफर्ड प्रोनाउन्स" (Preferred Pronouns) ची टूम पाश्चात्य राष्ट्रांमध्ये काही गटांमधून निघाली. तर या गटांचे म्हणणे असे आहे की एखादा पुरुषाला तो स्त्री आहे असे वाटू शकते. तसेच एखाद्या स्त्रीला तो पुरुष आहे असे वाटू शकते. एखाद्याने लिंगबदल करून घेतले असेल, आणि एखाद्याला पुरुष किंवा स्त्री दोन्हीही संबोधने नकोशी वाटतील. तर अशा लोकांना समाजाने समजून घ्यावे आणि त्यांनी स्वतः सांगिलेल्या संबोधनाने ओळखावे. त्यातून She, Her, He, Him या सामान्यपणे वापरलेल्या संबोधनाबरोबर काही लोक they, them, it वापरातायेत आणि काहींनी चक्क zer, ze अशी मनमानी संबोधने शोधली. आणि सध्या परिस्थिती अशी आहे कि अशी स्वघोषित ७० संबोधने आहेत. ज्यांची भावना "आईंग?" अशी झाली असेल त्यांच्यासाठी मोठे उत्तर - मी हे प्रकरण गेल्या ४-५ वर्षांपासून फॉलो करत आहे त्यामुळे याची बऱ्यापैकी कल्पना आहे. आपल्या इथे हे आत्ता आत्ता पोचले आहे. पण पाश्चात्य वि...

आपल्या आयुष्यात कोणत्या 10 गोष्टी आपण थांबवल्या आहेत

इमेज
आपल्या आयुष्यात कोणत्या 10 गोष्टी आपण थांबवल्या आहेत? प्रश्न चांगला आहे. खरेतर १० पेक्षा जास्तच गोष्टी थांबवल्या असतील पण प्रश्नचा मान राखून १० गोष्टी आठवून लिहितो. १. तुलना करणं प्रत्येकाचा मार्ग वेगळा. आज कुणाकडे काय आहे कुणाकडे काय नाही, अमक्याचा पगार एवढा माझा केवढा या तुलना आता नको वाटतात. सगळे जण आपापल्या परीने आपापले जीवन सुंदर करत आहेत हेच खूप नाही का? अब्जाधीश गुंतवणूकदार आणि तत्वज्ञ नवल रविकांत म्हणतात की तुलना करून एखाद्याबद्दल असूया आपण त्याच्या आयुष्याचा एकांगी विचार करून करतो. एखाद्याचे आयुष्य तुमच्यापेक्षा चांगले आहे आणि तुम्हाला तसे पाहिजे असेल तर त्याच्यासारखे सरसकट आयुष्य मिळालेले चालेल का? उदाहरणादाखल आज जर कुणाला रतन टाटांची संपत्ती मिळाली तर त्यांचे वार्धक्य पण घेण्याची तयारी पाहिजे. "जावे त्यांच्या वंशा" लहानपणापासून ऐकतोय, आता अनुभूती घेतोय. असूया माणसाचा स्वभावदोषच आहे, तरीपण तुलना करायची असेल तर आज आपण जसे आहोत ते कालच्यापेक्षा चांगले आहोत का नाही याची करतो. म्हणजे स्वतःशीच. २. न्यूज बघणं आता मी भारतीय न्यूज चॅनेल बघणे सोडून दिले आहे. ९०% चॅनेल्स बातम...

संघटन शक्तीची गरज काय?

इमेज
संघटन शक्तीची गरज काय? कोरा.कॉम वरील या प्रश्नासाठी माझे उत्तर - ​फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात कंपनीच्या ऑफिशियल चॅट वर सकाळीच एका टीममेट चा मेसेज आला. "Hi Ashish, do you have some time today? need to talk". आजकाल असे मेसेज आले कि कि धस्स होतं. त्यातल्या त्यात उत्कृष्ट काम करणारे सहकारी असतील तर जास्तच. अमेरिकेमध्ये जसे "ग्रेट रेसिग्नेशन" चालू आहे तसे भारतात सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये "ग्रेट स्विच" चालू आहे. लोक कंपन्या बदलतात, दुप्पट तिप्पट पगार वाढवतात. त्यामुळे एखाद्याला टिकवून ठेवणे, किंवा राजीनामा आल्यावर रिटेन करणे म्हणजे महाकठीण काम बनले आहे. आता हा सहकारी, सोयीसाठी त्याला "क्ष" म्हणू कंपनीत जॉईन होऊन फक्त तीन महिने झाले होते. पण पठ्ठा फ्रेशर असूनही कॉलेजमध्ये असतानाच स्वतःहुन कोर्सेस करून आला होता. त्यामुळे खरोखर एक चांगला सहकारी मिळाल्याचे टीम मॅनेजर म्हणून मला आणि बाकी टीमला देखील समाधान होते. अगदी काही दिवसाच्या अवधीतच त्याने कोड बेस समजून नवीन डेव्हलपमेंट देखील सुरु केली होती. संवादकौशल्य देखील उत्कृष्ट होते. नुकताच जॉईन झाल्यामुळे किमा...

विमानाच्या प्रवासात तुम्हाला भेटलेली एखादी चांगली व्यक्ती कोणती? का?

इमेज
विमानाच्या प्रवासात तुम्हाला भेटलेली एखादी चांगली व्यक्ती कोणती? का? सिटीझन केन नावाचा हॉलिवूड चा एक जुना माझ्या आवडीचा चित्रपट आहे. चित्रपट सुरु होतो तेच त्यातला अब्जाधीश वृद्ध नायकाच्या तोंडी शेवटचे शब्द असतात - 'रोझबड'. मृत्यूसमयी तो हे का म्हणाला आणि त्याचा अर्थ काय याविषयी माध्यमांत अंदाज आणि तर्क चालू होतात. नंतरचा संपूर्ण चित्रपट या नायकाची म्हणजे 'चार्ल्स केन' याची जीवनकहाणी आहे. रोझबड म्हणजे काय यासाठी जंग जंग पछाडणारे वार्ताहर नायकाच्या एका जवळच्या मित्राला त्याबद्दल विचारतात त्यावर त्यालाही काही माहित नसते. पण तो त्याचे अनुमान सांगतो की ती एखादी व्यक्ती असेल जी केन महाशयांच्या लक्षात राहिली. यावर त्या वार्ताहराचे समाधान न झाल्याने तो म्हातारा मित्र पुढील गोष्ट सांगतो. मिनिटभराचा हा संवाद हॉलिवूड च्या उत्कृष्ट संवादांपैकी एक आहे. A fellow will remember a lot of things you wouldn't think he'd remember. You take me. One day, back in 1896, I was crossing over to Jersey on the ferry, and as we pulled out, there was another ferry pulling in, and on it, the...

राष्ट्र आणि राष्ट्रवाद

इमेज
  हजारो वर्षांचा तथाकथित दैदिप्यमान इतिहास आणि वैभव असलेली ही भारतभूमी शेकडो वर्षे परकियांच्या आक्रमणासमोर हतबल का झाली? कुणीच का टिकू शकले नाही? या प्रश्नाला बरेच कंगोरे आहेत. "हजारो वर्षांचा तथाकथित दैदिप्यमान इतिहास आणि वैभव असलेली ही भारतभूमी" प्रश्नाच्या या भागात थोडा खोचकपणा जाणवतो. दैदिप्यमान इतिहास म्हणजे नक्की किती काळासाठी होता हे कसे ठरवणार? कारण गेल्या ७५ वर्षासारख्या तुलनेने कमी कालखंडात देखील भारतात ६५ चे युद्ध, ७१ चे युद्ध, आणीबाणी, दंगली, अणुस्फोट, दुष्काळ, लायसेन्स राज, भ्रष्टाचार घोटाळे, आयटी क्रांती, आनंदवनासारख्या सेवेकरी संस्था, शेतकरी आत्महत्या, मध्यमवर्गाचा उदय, उदारीकरण असे कितीतरी चांगलया आणि वाईट घडामोडी घडल्या. तर "हजारो" वर्षांमध्ये काय काय घडले असेल. काही गोष्टी चांगल्या असतील काही वाईट. या सर्वांमधून किमान "भारतभूमी" ही ओळख अंशतः तरी आपण टिकवून ठेवली म्हणून सोयीसाठी म्हणूया "हजारो वर्षांचा दैदिप्यमान". आता तथाकथित या शब्दावर येऊ. एखाद्या राष्ट्राला दैदिप्यमान इतिहास आहे किंवा नाही हे कोण ठरवते? - बऱ्याचदा त्या त्या र...

Quora वरील लेखी स्वरूपातील भांडणे वाचताना तुम्हाला काय वाटते?

इमेज
जर मुद्देसूद, तर्काला धरून आणि अभ्यासयुक्त टिप्पणी असेल तर वाचायला मजा येते. काहीतरी नवीन समजते. शेवटी संवादाचा हेतू एकमेकांना समजून घेणे आणि एकमेकांच्या मुद्द्यातील कमकुवत जागांना (blindspots) भरून आणखी चांगला विचार तयार करणे हाच असतो ना? नाही म्हणजे आदर्शवत संभाषणात तर हाच हेतू असावा. तसे नसेल आणि टिप्पणी हेकेखोर, एकांगी होत असेल तर मग अशी भांडणे न करणे चांगले. शेवटी लिखित स्वरूपातील भांडणे दोन किंवा अधिक व्यक्तींच्या सहभागाशिवाय पुढे जाऊच शकणार नाहीत. अशावेळी प्रतिक्रिया न देता काहीच केले नाही तर कदाचित ते थोडे उद्धट वाटू शकते. त्याला इलाज मलाही माहीत नव्हता. डेस्टीन हा "SmarterEveryDay" या युट्युब चॅनेल चा सर्वेसर्वा. स्वतः एक व्यावसायिक शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ असूनही त्याला त्याच्या व्हिडीओ वर अशा बऱ्याच टिप्पण्या यायच्या ज्यामुळे तो आधी पार वैतागून जायचा. त्याने विचारांती याच्यावर उपाय काढला. तो म्हणतो की अशा न संपणाऱ्या वादावर स्वतःचा तोल न ढळू देता नम्रता ठेवावी. जर वाद ताणत चालला तर तुम्हाला वाटेल तेव्हा हा प्रश्न विचारावा - "मी कुठला पुरावा दिला तर तुम्ही तुमचे म...