झी झर चे खुळ
आजकाल महिला आणि पुरुष सोशलमीडियावर आपल्या नावा समोर '(he/him/his)' किंवा '(she/her)' लावतात, हे काय प्रकरण आहे?
छोटे उत्तर -
मागच्या काही वर्षात हे "प्रेफर्ड प्रोनाउन्स" (Preferred Pronouns) ची टूम पाश्चात्य राष्ट्रांमध्ये काही गटांमधून निघाली. तर या गटांचे म्हणणे असे आहे की एखादा पुरुषाला तो स्त्री आहे असे वाटू शकते. तसेच एखाद्या स्त्रीला तो पुरुष आहे असे वाटू शकते. एखाद्याने लिंगबदल करून घेतले असेल, आणि एखाद्याला पुरुष किंवा स्त्री दोन्हीही संबोधने नकोशी वाटतील. तर अशा लोकांना समाजाने समजून घ्यावे आणि त्यांनी स्वतः सांगिलेल्या संबोधनाने ओळखावे. त्यातून She, Her, He, Him या सामान्यपणे वापरलेल्या संबोधनाबरोबर काही लोक they, them, it वापरातायेत आणि काहींनी चक्क zer, ze अशी मनमानी संबोधने शोधली. आणि सध्या परिस्थिती अशी आहे कि अशी स्वघोषित ७० संबोधने आहेत.
ज्यांची भावना "आईंग?" अशी झाली असेल त्यांच्यासाठी मोठे उत्तर -
मी हे प्रकरण गेल्या ४-५ वर्षांपासून फॉलो करत आहे त्यामुळे याची बऱ्यापैकी कल्पना आहे.
आपल्या इथे हे आत्ता आत्ता पोचले आहे. पण पाश्चात्य विकसित देशात हे पिल्लू मागच्या दशकभरात पैदा होऊन भराभर वाढले.
आधुनिक समाजात मागच्या काही शतकांत बऱ्याच सामाजिक चळवळी उभ्या राहिल्या. प्राप्त समाजाच्या संकल्पनांना छेदून त्यांनी नवीन निकष बनवले जे पुढच्या काही पिढ्यांमध्ये जनमानसात इतके मिसळून गेले कि यासाठी कधी चळवळ करावी लागली असेल हे आपल्याला आता विशेष वाटते. उदाहरणार्थ स्त्रियांना मत देण्याचा अधिकार मिळणे. या गोष्टीला जेमतेम शतक-दीडशतक झाले आहे. पण त्याकाळी हा मोठा सामाजिक बदल होता. असे एक आणि अनेक बदल घडत आज स्त्री-पुरुष समानता हा कुठल्याही पुरोगामी समाजाचा मापदंड आहे.
एकविसाव्या शतकात समानतेची हि चळवळ चालूच आहे. आणि त्यात भर पडली ती तृतीयपंथी, समलिंगी व्यक्तींना समाजमान्यता मिळावी या चळवळीची. उद्देश चांगला आहे. पण अतिरेक झाला. आम्ही वेगळे आहोत, आणि आम्हाला समान वागणूक पाहिजे, ही मागणी ठीक. पण आम्ही वेगळे आहोत आणि त्यामुळे आम्हाला विशेष वागणूक देण्यात यावी या अट्टाहासापायी मागच्या काही वर्षात हे "प्रेफर्ड प्रोनाउन्स" (Preferred Pronouns) ची टूम पाश्चात्य राष्ट्रांमध्ये काही गटांमधून निघाली. तर या गटांचे म्हणणे असे आहे की एखादा पुरुषाला तो स्त्री आहे असे वाटू शकते. तसेच एखाद्या स्त्रीला तो पुरुष आहे असे वाटू शकते. एखाद्याने लिंगबदल करून घेतले असेल, आणि एखाद्याला पुरुष किंवा स्त्री दोन्हीही संबोधने नकोशी वाटतील. तर अशा लोकांना समाजाने समजून घ्यावे आणि त्यांनी स्वतः सांगिलेल्या संबोधनाने ओळखावे. त्यातून She, Her, He, Him या सामान्यपणे वापरलेल्या संबोधनाबरोबर काही लोक they, them आणि चक्क zer, ze अशी संबोधने शोधली. आणि सध्या परिस्थिती अशी आहे कि अशा संबोधनांची भर पडतच आहे.
डोके गरगरायला लागले का? पुढे..
"तृतीयपंथी, समलिंगी व्यक्तींना समाजमान्यता" या विधायक चळवळीचे शेपूट धरून पुढे आलेल्या या विचित्र लोकांनी स्वतःची संबोधने तयार केली आहेत आणि अशा गटांना पाठिंबा देण्यासाठी आपले "बेगानी शादीमे अब्दुल्ला" वाले नॉर्मल लोक देखील स्वतःचा नावापुढे त्यांचे Preferred Pronouns लावायला लागले सुद्धा. आता असे हे पुरोगामी विचारांचे बरेच लोक हे डाव्या विचारसरणीच्या राजकीय गटामध्ये, विद्यापीठांत, तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये आहेत त्यामुळे ते LinkedIn सारख्या साईट्स वर जास्त दिसतील.
आता इथे दोन प्रकारचे लोक आहेत.
१. ज्यांना ज्यांना Preferred Pronouns चे खेळ खेळायचेत खेळूदे. आम्हाला काय?
२. ज्यांना ज्यांना Preferred Pronouns चे खेळ खेळायचेत त्यांना आमचा पाठिंबा आहे त्यामुळे आम्ही देखील Preferred Pronouns लावणार.
पहिल्या प्रकारचे लोक हा एक बालिश खेळ आहे हे समजून गप्प होते. उद्रेकाची ठिणगी तेव्हा लागली जेव्हा कॅनडाच्या सरकारने 'बिल C-१६' नावाचा कायदा आणला ज्यामध्ये एखाद्याच्या Preferred Pronouns ने त्या व्यक्तीला संबोधित करणे हा त्याचा अधिकार ठरवला गेला. त्यामुळे जर दुसर्याने या व्यक्तीच्या किंवा गटाच्या खेळात भाग न घेण्याचे ठरवले तर तो गुन्हा ठरतो. आता पहिल्या प्रकारच्या लोकांची गोची झाली. पण अशा "सुधारणावादी" कायद्याला कोण विरोध करणार?
विरोध केला तो डॉ.जॉर्डन पीटर्सन नावाच्या वाघाने. प्रचंड विरोधाला झुगारून त्यांनी कॅनडाच्या संसदेत "हा कायदा मानत नाही जा" असे ठणकावले. त्यांचा आक्षेप या गोष्टीवर होता की एखाद्याच्या भाषेलाच बदलणारा हा कायदा म्हणजे त्यांच्या मूलभूत हक्कावर हल्ला होता. त्यांच्या या प्रतिकारानंतर समाजातून त्यांना आधी छुपा पाठिंबा मिळाला आणि नंतर मोठ्या संख्येने लोक त्यांच्या बाजूने उभे राहिले.
ते म्हणतात तुम्ही जसे स्वतःला प्रस्तुत कराल तसे मी संबोधन वापरेल. कुणी zer, ze सारखे भाषेत अस्तित्वात नसलेले संबोधन वापरण्याची बळजबरी केली आणि मी तसे नाही केले तर मला गुन्ह्यात अडकवण्याचा हा काय प्रकार? त्यांचा प्रमुख आक्षेप हा आहे कि आज अशा विचित्र संबोधनांची बळजबरी करणारा हा तथाकथीत पुरोगामी कायदा इथेच न थांबता एक ना एक दिवस हे लोण व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली आणखी तुघलकी व्यवस्था लादू शकतो. समाजामध्ये संभ्रम तयार होईल आणि विशेषतः लहान मुलांना अनावश्यकपणे जाचक अशी ही निओप्रोनाउन्स शिकावी लागतील. त्यांचा संदर्भ काय हे न समजण्याच्या वयात त्यांना नको ती माहिती घ्यावी लागेल. आणि त्यातून नवीन प्रश्न उभे राहतील. त्यांची ही भीती अगदीच अनाठायी नाही असे मला वाटते. खालील व्हिडीओ मध्ये त्यांची भूमिका त्यांनी मांडली आहे.
सामान वागणूक पाहिजेच. पण आम्ही कोणीतरी स्पेशल म्हणून आम्हाला स्पेशल वागणूक देणाऱ्या कायद्यामागुन आपले आपले लेफ्टिस्ट अजेंडे चालवणारा हा कावा "कही दिखेला लगता है" नै?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अभिप्रायासाठी अनेक आभार!