पोस्ट्स

Sairat लेबलसह पोस्ट दाखवत आहे

धरलं तर चावतंय

इमेज
चित्रपट डाऊनलोड करून पाहू नये, चित्रपटगृहातच बघावा असा विचार करणाऱ्या लोकांबद्दल तुम्ही काय म्हणाल? उत्तर देण्याआधी प्रश्नकर्त्याला नक्की काय अभिप्रेत आहे ते पाहावे लागेल. हा प्रश्न नक्कीच पांढरा-काळा प्रकारातला नाही. परिस्थितीनुरूप उत्तर बदलू शकते. प्रयत्न करतो. इथे डाउनलोड करून पाहणे म्हणजे "पायरेटेड प्रत बघणे" असा अर्थ असेल तर मी त्याच्या 80% विरोधात आहे. बाकीचे 20 टक्के कुठे गेले समजण्यासाठी पूर्ण उत्तर वाचावे लागेल. जर स्ट्रीमिंग सेवा जसे नेटफ्लिक्स, हॉटस्टार, ऍमेझॉन प्राईम, झी5 वर चित्रपट पाहायचा असेल तर काहीच हरकत नसावी. गूगल प्ले वर देखील अतिशय रास्त दरात भाड्याने सिनेमा उपलब्ध करून देते. अशावेळी आपण या स्ट्रीमिंग माध्यमांनी सिनेमा बघितला तर त्याचा योग्य मोबदला निर्मात्यां ना मिळत असतो. ललित प्रभाकर, सोनाली कुलकर्णी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्राजक्ता माळी चा हम्पी हा सुंदर सिनेमा बघण्यासाठी मी झी5 चे वर्षभराचा रतीब घेतला. संभाजी आणि चला हवा येऊ द्या ब्रेक फ्री बघता येते आणि याच्या नवऱ्याची त्याची काय ते आईला मोबाईल वर लावून देऊन पैसे वसूल करतो. बाहुबली, पानिपत किंवा...

Renaissance of Marathi Cinema

इमेज
It's been almost two weeks since I watched Sairat. It captured my mind and it's not going anywhere soon. More than the ending, I am now intrigued about the whole Sairat phenomena. First, its music. Raj has written about the songs of this movie on  his blog . Then, Sairat's director - Nagraj Manjule. His life is no less than a movie itself. He should be a paradigm shift for many of us. I watched his interview "Great Bhet" by senior journalist Nikhil Wagle. How many times have we heard that people can change inside out over the period? Honestly I never totally believed that persons can evolve so drastically.  Even the story of Walmiki didn't feel right to me. Nagraj is a living example of such a shift of personality. He failed the 10th standard exam twice, was a narcotic addict, had violent past; today, he speaks eloquently about most sensitive issues of mankind. He doesn't just speak but expresses it through his art. He is not just a loner artist deepl...

सॉरी नागराज, मी सैराट ऑनलाईन पाहिला

इमेज
(potential spoilers) इतकी हाईप केल्यावर दम तरी कसा काढणार? त्यात रोज whatsapp वर काहीना काही नवीन.. "इतका मोठा ससा नववीतच कसा" वगैरे.. आणि सैराटची पूर्ण गाणी युट्युब वर आधीच रिलीज करून झिंग लावण्याची पूर्ण व्यवस्थाच केलेली होती. मग काय बघितला. इथे पोलंड मध्ये रिलीज होण्याची शक्यता कमीच होती तशीही. पण पुण्यात तिकीट काढलं मी. एका रिकाम्या खुर्चीने माझ्याऐवजी बघितला तो पिच्चर थेटरात. उसूलोका वैसे पक्का हू मय.. मागे बाजीराव मस्तानी च्या वेळी पण असेच कंट्रोल नाही झाले, पण जसा तो ग्राझ मध्ये रिलीज झाला.. मी परत थेटरात जाउन बघितला. ग्राझ मध्ये आला नसता आणि ऑनलाईन पण नसता तर म्युनिच ला जाण्याची पण तयारी केली होती. पण तशी वेळ आली नाही. बास.. आत्ता सैराट.. फक्त सैराट. ख त र ना क.. आयच्या गावात.. भन्नाट पिच्चर बनवलाय. नेहमी प्रमाणे म्हंटले असते हॉलीवूड च्या तोडीचा आहे.. पण, कदाचित आता एखादा हॉलीवूड चा पिच्चर सैराट च्या तोडीचा आहे असा उल्लेख करेन मी कधीतरी. एव्हाना सगळ्यांनी पाहिलाच असेल.. मला एवढा का आवडला? काही नवीन स्टोरी आहे? नाही.. मग? सैराट ला मातीचा गंध आहे. सल्...