पोस्ट्स

जुलै, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डार्क नाईट राईजेस

इमेज
मागच्या शानिवारी 'डार्क नाईट राईजेस' बघितला. नोलन च्या सिनेमांकडून जी अपेक्षा असते ती खचितच पूर्ण झाली. आपलासिनेमास्कोप वर याचे गणेश मतकरींचे सुंदर परीक्षण आहे. त्यावर ही माझी प्रतिक्रिया इथे परत टाकतोय.. ---- सही परीक्षण. >>"सुपरहिरोपट हे पहिल्या चित्रपटात हिरोच्या ओरिजिन विषयी सांगतात पण त्यानंतरचा भाग केवळ एकामागून एक येणा-या साहसांना दिलेला असतो." उलट मला वाटते की पहिला भाग रोचक करणे दुसऱ्या व तिसऱ्या भागाच्या मानाने सोपे असते. हिरोचे इवोल्युषण दाखवण्याचे ठराविक पॅटर्न दिसतात. या पॅटर्नशी प्रामाणिक राहिले तर हमखास यश. दुसरा, तिसरा भाग म्हणजे खूप विचार करून बनवलेली कथा असते. दुसरा भाग सरस असतो याच्याशी पूर्ण सहमत. नोलन चा बॅटमॅन पण त्यातलाच. त्याला वेगळे करतात ते त्याचे विलन आणि त्याचे मर्त्य असणे, त्याच्या मानवी चुका आणि त्यातून घडत जाणे. सुपरहिरोंचे सिनेमे पाहून 'मलाही अशा पॉवर्स असत्या तर' हा फील नोलन चा बॅटमॅनला पाहून कधी येत नाही. आणि या सिनेमात तर चक्क अंगावर काटा येण्याइतपत मारलंय हिरोला. नोलन चे आणखी एका बाबतीत कौतुक वाट...

संस्मरणीय जून - २

इमेज
संस्मरणीय जून - १  वरून पुढे. माथेरान अगदी अवचीत जूनच्या दुसऱ्या आठवड्यात गेलो इथे शनिवारी. सोबत ३ उझबेक, एक इरिट्रिया (पूर्व आफ्रिका, इथिओपिया च्या जवळ) ची मुलगी, आणि प्रवीण. आम्हाला वासरात लंगडी गाय रशियन माहित असल्याने त्यांच्या सोबत एका कार्यक्रमाचे आमंत्रण होते तिथल्या एका शाळेत. यांचे अनुभव ऐकणे, हास्यविनोद, घोड्यावरची रपेट, माथेरानचा धो धो पाउस यात हा प्रवास मस्त झाला. भुसावळ हेमचंद्रांचे लग्न होते इथे जूनच्या तिसऱ्या आठवड्यात. पुणे भुसावळ हा जवळपास ५०० किमी चा प्रवास आम्ही (सुमित, निखिल, मुस्तफा, कुणाल) स्लीपर बसने केला. येता-जाता दोन्ही वेळी रात्रीचा प्रवास, मोठी बेड आणि बसही आरामदायक असल्याने गप्पाष्टकांना उधान . बेन्डीचे लग्न पण सुंदर झाले. लग्नावारून येवून लगेच माझ्या क्यामेर्यातल्या फोटो आणि विडीओचे संकलन करून मी एक छानशी क्लिप बनवून सगळ्या मित्रांना शेयर केली. लग्नात बेन्डीला नाव घ्यायला सांगितले तर गडी लगेच तयार झाला. म्हंजे नक्कीच तयारी करून आला असेल या समजुतीने आम्ही कान टवकारले तर बेंडीने हे नाव घेतले- "वाटीत वाटी स्टील ची वाटी वाटीत वाटी स्टील ...

संस्मरणीय जून - १

इमेज
हा महिना खूप प्रवास झाला. जवळ जवळ प्रत्येक विकांताला फिरत होतो. ताडोबा, माथेरान, मावशीचे गाव बदगी आणि हेमचन्द्रांच्या लग्नासाठी भुसावळ. ताडोबा महिन्याची सुरुवातच धडाक्यात झाली. जूनच्या १ तारखेला सकाळी आमची रेल्वे वर्धा स्टेशन ला लागली. ज्या जंगलाचा उल्लेख अगदी पहिली दुसरीपासून ऐकतोय, तिथे आम्ही आता ३ दिवस घालवणार याची जाम उत्सुकता होती. वाघ बघायचा हे तर मनात होतेच. पण कुठेतरी अपेक्षाभंगाची भीती होती. म्हणून मनाची तयारी केली की वाघ बघण्यासाठी नाही तर एक परिकथेतले वृक्षराजींनी भरलेले जंगल बघायला चाललोय. मी, मुस्तफा आणि ऋषिकेश चा युवाशक्ती बरोबरचा पहिला प्रवास. आमच्या चोवीस जणांच्या ग्रुप होता. वयोगट अंदाजे १५ ते ७५. आमच्या बरोबर दोन अनुभवी लीडर्सही होते. पहिला दिवस वर्धा ते ताडोबा हा प्रवास करण्यात आणि ताडोबाच्या बफर झोन मध्ये फिरण्यात गेला. ताडोबा हे आता 'ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प' म्हणून ओळखले जाते. आम्ही अंधारीत एका रिसोर्टमध्ये उतरलो होतो. रात्री एकमेकांच्या ओळखी झाल्यावर आम्हाला लवकर उठायचे म्हणून लीडर्स ने सूचना दिल्या. विदर्भात मी पहिल्यांदाच आलो होतो, ज...