पोस्ट्स

ऑगस्ट, २०१० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव..

इमेज
लहानपणी, म्हणजे साधारण सातवी आठवीत असताना रविवार सकाळी हि धून ऐकून जाग यायची. जुन्या लोकांसाठी बी आर चोप्रांचे "महाभारत" आणि रामानंद सागर यांचे "श्रीकृष्ण" याच्यात कोण भारी याच्यावर चर्चा, आणि माझ्यासारख्या पिटुकल्यांना स्पेशल इफेक्ट युक्त छान छान गोष्टी. हे श्रीकृष्ण तसे चांगलेच होते, पण मध्ये मध्ये रामानंद सागर येवून नुसतेच बोलायचे, कधी कधी अर्धा तास बोलायचे, लय बोर व्हायचे मग. याची आठवण का यावी मधेच.. तर झाले असे कि मागे काही दिवसांपूर्वी कुठल्यातरी वाहिनीवर परत हि धून ऐकली आणि म्हटले पाहू तरी आता कसे वाटते श्रीकृष्ण बघून. अवतार आणि मेट्रिक्स सारखे सिनेमे बघायची सवय झालेल्या डोळ्यांना त्या लो बजेट स्पेशल इफेक्ट ची मजा काय कळणार आता? तरीही कुठल्या तरी गोष्टीनी खिळवून ठेवले. अर्धा तास अगदी ब्रेक सकट तो भाग पाहिला. तो भाग होता कालयवन वधाचा. अगदी वरवर गोष्टच सांगायची म्हटली तर.. जरासंध कृष्णाच्या हात धुवून मागे लागलेला. तशात तो कालयवन नावाच्या दुष्ट राजाची मदत घेतो. हा कालयवन महापराक्रमी, साक्षात कृष्णाला पण सळो कि पळो करून सोडतो. कृष्ण पण हुशार माणूस, तो त्याला ...

एका पॅच ची गोष्ट..

इमेज
P E C F D आता हे वाचा E D F C Z P, प्रत्येक क्लिक गणिक छोट्या होणाऱ्या त्या अक्षरांच्या रांगांना कसून प्रयत्न करत वाचतोय. तिथल्या बहुधा इंटर्न असलेल्या डॉक्टरने फोन उचलला. माझ्याएवढाच, किंवा माझ्यापेक्षाही लहान असलेला इंटर्न. "Ma'am, new patient, shuttlecock injury. I checked his eye pressure, it's normal. Sight 6/6. I suspect internal hemorrhage", फोन ठेवून परत माझ्याजवळ येतो, "हम्म, ठेवा हनुवटी इथे, फोरहेड टेकवा समोर. सरळ बघा." त्या प्रकाश पुंजक्याकडे बघतोय. सकाळी कोर्ट वर टंच पोरगी बघून सुखावणारा माझा डोळा, आता अस्तित्वाची परीक्षा देतोय.. च्यामारी, ऐतिहासिक नाटकाचा अंक लिहिल्यासारखं वाटतय. जाउदे, कसेही लिहिले तरी पब्लिक वस्तारे घेउनच बसलीये. थोड्या वेळाने मोठ्या डॉक्टर आल्या. एक्सामीनेशन चेयर वर बसून, डोळे किलकिले करत वर पाहिले. करारी व्यक्तीमत्व.. आल्याआल्या कोणीतरी जाहीर केले, डॉक्टरांनी "shuttlecock injuries" या विषयावर रिसर्च पेपर पब्लिश केला होता. त्या दुखऱ्या अर्धवट बंद डोळ्यालाही विस्फारायाचा मोह झाला. चायला, लोकं असल्या दुर्मिळ विषयाव...