माणुसकी मोजताना
सध्या माणसामध्ये माणुसकी कमी होत चालली आहे. तुम्हाला काय वाटते? खालील लेख Quora.com वरच्या या प्रश्नाचे उत्तरादाखल लिहिला होता. ____ सध्या म्हणजे नक्की कोणत्या काळाशी तुलना करत आहात? मला वाटते की जसे जसे समृद्धी येत आहे तसे तसे समाजात इतरांना मदत करण्याची भावना उलट वाढत आहे. याचे कारण म्हणजे अगदी कासेची लंगोटी देण्याची वेळ येत नाही. स्वार्थ राखून परमार्थ करणे बऱ्यापैकी शक्य झाले आहे. मागच्या पिढीपर्यंत लोक मनाने श्रीमंत असतीलही पण जवळजवळ सगळेच गरीब असल्याकारणाने इतरांची करून करून काय मदत करणार? आता संपूर्ण जगच समृद्ध होत आहे. गेल्या दशकभरात जगाची गरीबी निम्म्याहून कमी झाली आहे आणि झपाट्याने कमी होत आहे. [1] बिल गेट्स, वॉरन बफे, जेफ बेझोस सारख्या व्यक्ती आहेत ज्या आपल्या देशाच्या सीमेपलिकडे जाऊन संपूर्ण विश्वाची सेवा करायला निघाले आहेत. डॉ प्रकाश आणि मंदाकिनी आमटेंसारखे सेवाव्रती हातांना तरुणांच्या संघटनांनी आणखी बळ दिले आहे. माणुसकी वाढत आहे. कोरा, युट्युब, यूडमी, कोर्सेरा, खान अकॅडमी यासारख्या व्यासपीठावरून जगभरातल्या उत्कृष्ठ विद्यापीठांचे ज्ञान याच माणुसकीवाल्या लोकांनी सर्वांस...