बदलुराम का बदन जमीन के नीचे है
Tue. may 2016 मागे एकदा ब्रिज ऑन रीवर क्वा य वर लिहिले होते. त्यात कर्नल बुगी मार्च हे गाणे सैनिक मार्च पास करताना वापरायचे याचा उल्लेख केला होता. असेच एक आणखी रेजिमेंटल सॉंग फेसबुक वर अमित ने शेयर केले काल परवा. "बदलुराम का बदन" हे ते गाणे. गाण्याच्या ओळी अशा आहेत - "बदलूराम का बदन जमीन के नीचे है, बदलूराम का बदन जमीन के नीचे है, तो हमे उसका राशन मिलता है" असाम रेजिमेंट चे गाणे आहे हे. या गाण्यामागची कथा थोडी करूण पण गमतीशीर आहे. दुसर्या महायुद्धात असाम रेजिमेंट बदलूराम नावाचा सैनिक धारातीर्थी पडला होता. पण त्याच्या हुशार क्वार्टर मास्टर ने त्याच्या वाट्याचे रेशन चालूच ठेवले. पुढे जेव्हा कोहीमाला जपान्यांच्या वेढा पडला, त्या वेळी हे जास्तीचे रेशनमुळे ब्रिटीश-भारतीय सैनिकांना आणखी काही दिवस तग धरता आला अशी ती कथा. खरेतर एका सैनिकाचे रेशन घेवून असा कितीसा फरक पडणार असे वाटू शकते. कदाचित बदलूराम पासून चालू झालेली हि प्रथा त्यांच्या क्वार्टर मास्टर ने आणखी बर्याच मृत सैनिकांसाठी वापरली असावी आणि त्यामुळे त्यांना वेढ्याच्या ...