पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आणखी एक पाटी

इमेज
आज बऱ्याच दिवसांनी PMT ने प्रवास झाला. व्हायचा तो त्रास झालाच. पण त्या वेदनेच्या प्रवाहाच्या जोराने माझ्या लेखनप्रतिभेच्या मोरीताला बोळा निघाला जणू. गेले २-३ महिने ब्लॉग वर काहीच हालचाल नव्हती. मधल्या घटनांनी मन खचलय. २ जानेवारीला मॅनेजर ला म्हटलो की उद्या इंडिया गेटच्या मुलांनी बंद पुकारलाय. मी येत नाही. तर ते म्हणाले की अरे मग एक दिवस उपास कर, आपले रिलीज आहे परवा. नाही गेलो ऑफिसला. वीट आलाय गोष्टी टाळून. त्या इंडिया गेट च्या जिगरबाज पोरांचे कौतुक वाटते.     गेल्या शनिवारी रक्तदान करून आलो. माझी पहिलीच वेळ आणि ज्याला सोबत नेले होते तो माझा मित्र राहुल त्याची तब्बल १७ वी वेळ. राहुल आपला जणू काही पिक्चर पाहायला आलाय या थाटात आरामात सगळीकडे वावरत होता. पठ्ठ्याने फॉर्म भरणे, वजन करणे, हिमोग्लोबीन तपासणे, रक्तदान करून तिथे मिळत असलले उपमा चहा आणि बिस्किटे फस्त करेपर्यंत सगळे काही इतक्या सराईत पणे केले की मला त्याच्या या सतराव्या वेळेबाबत होती नव्हती शंका पण गेली. तो रक्त देत असताना तिथली सिस्टर माझी नस तपासत होती, तर हा तिला सल्ला देतोय कि सापडत नसेल...