अंतरीचा दिवा
सध्याच्या सरकारी नोकरीच्या कमी संधी पाहता, मुलांना व्यवसायिक शिक्षण देणे आवश्यक आहे का? एक प्रतिष्ठित सरकारी नोकरी मिळते म्हणून एमपीएससीचा अभ्यास करणे कितपत योग्य आहे? एक गोष्ट सांगतो. माझा बालमित्र अमोलची. आम्ही दोघे इंजिनियरिंग सुद्धा एकाच कॉलेजला होतो. तो इलेक्ट्रिकल आणि मी मेकॅनिकल. आम्ही दोघे अगदी फार हुशार नाही पण सुखासुखी इंजिनियरिंग पास केलेले असे सर्वसाधारण विद्यार्थी. मध्यवर्गीय पालक. आम्ही दोघे तसे घरातले पहिल्या पिढीतले ग्रॅज्युएट. त्यामुळे आमच्या पालकांची खरंच कृपा. त्यांनी त्यांच्या शिक्षणाच्या मोजक्या अनुभवातून आम्हाला चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्या. अमोलने आणि मी आर्मी ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी साठी मोघम प्रयत्न केले. नाही मिळाले. मला त्यातल्या त्यात समाजशास्त्राची आवड असल्याने मी थर्ड, फोर्थ इयरला एमपीएससी/ युपीएससी चे अधिकचे वर्ग केले होते. आम्ही जिथे राहायचो त्या एसआरपीएफ मधल्या सहृदय कमांडंट आयपीएस वी. लक्ष्मीनारायण यांच्या पुढाकारातून हे वर्ग चालू झाले होते. आणि त्यांचा प्रभाव होताच. त्याबद्दल जास्त लिहीत नाही. इथे वाचू शकता. - http://alspensieve.blogspot.com/2012...