पोस्ट्स

Thoughts लेबलसह पोस्ट दाखवत आहे

चिमणी उडाली भुर्रर्र

इमेज
प्रश्न :  संस्कृतवर केवळ ब्राह्मणांचाच अधिकार का राखून ठेवला गेला? ब्राह्मणांव्यतिरिक्त इतर समाजाच्या लोकांनी संस्कृत भाषेचा कधीच वापर केला नाही का? भूतकाळातले सोडा या लोकांनी नवीन भाषेवर अधिकार स्थापन केलाय. ---- मी ब्राह्मण समाजातला नाही. ---- मला वाटते "संस्कृतवर केवळ ब्राह्मणांचाच अधिकार होता" हे ना एक ब्लँकेट स्टेटमेंट आहे. म्हणजे एखाद्याला हवा तोच निष्कर्ष काढण्यासाठी केलेले सरसकट विधान. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत बहुजनांमध्ये "शिकून कोणाचं भलं झालंय" हे वाक्य फार प्रचलित होते. म्हणजे एकंदरीत शिक्षणाबद्दल उदासीनताच होती. आणि संस्कृत शिकून कोणी फार मोठा विद्वान वा धनी झाला अशीही परिस्थिती नव्हती. येऊनजाऊन भिक्षुकीची विद्या. एखादी तात्काळ पोटापाण्याची व्यवस्था करू शकणार नाही अशी कला शिकून त्यात पारंगत होणे याला समर्पण वृत्ती लागते. ती ज्यांनी दाखवली त्यात त्यांना कौशल्य प्राप्त होते हे साधे गणित आहे. जिथे बहुसंख्य समाज रोजीरोटीचा मागे लागला होता अशात यात कोण कशाला संस्कृतवर अधिकार वगैरे राखून ठेवणार डोम्बल्याचे. ---- आता गम्मत सांगतो. ५० वर्षांनी हा प्रश्न ज्...

आधुनिक काळातील शिक्षण आणि रोजगार

इमेज
Quora.com प्रश्न -  आपण शिक्षण का घेतो, शिक्षणावर एवढा पैसा खर्च करून काही उपयोग आहे का? उत्तर -  माझ्या मते पालकांनी आपापल्या ऐपतीप्रमाणे जास्त ओढाताण न करता मुलांचे पदवीपर्यंत शिक्षण करावे. पदवी मिळवण्यासाठी कर्ज करून शिक्षणसम्राटांच्या मढ्यावर पैसे घालू नयेत. शिक्षणाचा उपयोग आहे. पण शिक्षण आणि पदवीचे ढेंडोळे यात फरक आहे. आताच्या काळामध्ये नोकऱ्या मिळवण्यासाठी कौशल्य जास्त महत्त्वाचे आहे. IIT, NIT, IIM सारख्या संस्थेमध्ये पदवी असेल तरच त्या कॉलेज च्या नावाचा काहीतरी उपयोग आहे. आणि या कॉलेजेस मध्ये, बुद्धिमत्तेच्या बळावर ऍडमिशन मिळत असेल तर तो विद्यार्थी पालकांनी थोडा ताण घेऊन शिक्षण पूर्ण करण्याच्या लायकीचा आहे हा एक सरधोपट नियम समजा. या कॉलेजेस व्यतिरिक्त कुठेही फार जास्त पैसे करून शिक्षणाच्या मागे लागू नये. मग काय शिक्षण सोडून द्यायचे? नाही. पदवीपर्यंत शिक्षण वाजवी दरात उपलब्ध आहे अशा संस्थेमधून करावे. वाचलेले पैसे वापरून, पदवी करता करता कोणताही व्यावसायिक कोर्स करावा. प्लम्बर, मेकॅनिक, फर्निचर काम, इलेक्ट्रिशियन, कॉम्प्युटर हार्डवेयर, सिस्टिम ऍडमिनिस्ट्रेटर असे कोर्स करून...

माणूस मोठा मानावा की पैसा?

इमेज
माणूस मोठा मानावा की पैसा मोठा म्हणावा? पैसा वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी केलेली एक योजना, एक अवजार, एक साधन आहे. माणूस मोठा कि हातोडा मोठा? हा प्रश्न का नाही विचारला जात बरे? जिथे खिळे ठोकण्याचे काम आहे तिथे हातोडा मोठा. तिथे माणूस कितीही चांगला असला तरी काय उपयोग?

साधू संत येति घरा..

इमेज
पूर्वी जसे समर्थ महाराज, साईबाबा आणि असे बरेच संत महात्मे होऊन गेले, तसे लोक आता का दिसत नाहीत? इतके सामर्थ्यवान सध्या कोणी आहेत का? चांगला विचार करायला लावणारा प्रश्न आहे. मला याची पुढील कारणे दिसतात : १. साधुसंत ज्या काळात झाले त्या काळात त्यांच्या हयातीत आसपासच्या लोकांना सोडून किती जणांना हा माणूस सिध्दपुरुष आहे, संत आहे किंवा साधू आहे हे समजले असेल? या सिद्धपुरुषांनी आपले अवतारकार्य संपवल्यावरच त्यांच्या बऱ्याचशा महिमा त्यांच्या अनुयायांकडून इतर समाजाला समजल्या असतील, वास्तविकतेला कल्पनेची, गद्याला पद्याची जोड मिळून त्यांची कीर्ती सर्वदूर पोहोचली असेल. कस्तुरी मृगाला जसे स्वतःच सुगंधाचा स्रोत आहोत हे समजत नाही, तसेच वर्तमानात देखील आजूबाजूला असे सिध्दपुरुष असतीलही पण आपल्याला ते कळणार नाही किंवा उशिरा समजेल. इतिहासात बरेचदा हेच पाहायला मिळते कि महापुरुषांना खांद्यावर घेऊन नाचणाऱ्यांपेक्षा त्यांच्या मार्गात धोंडे घालणारेच जास्त असतात. किंबहुना अशा धोंडे घालणाऱ्या परिस्थितींवर ते मात करतात म्हणूनच भविष्यकाळात त्यांना महापुरुष म्हणून ओळखले जाते. वर्तमानात असे 'In Progress' मह...

कर्म आणि दैव

इमेज
मला पूजा करत बसणे, देव देव करत बसणे जास्त आवडत नाही "कर्म चांगले तर सर्व चांगले" असं माझं मत आहे. खरा देव काय हे या पूजा करणाऱ्यांना कळत नाही पण हे सांगायला गेलं की लोक मला वेड्यात काढतात. मी काय केले पाहिजे सर्व नमुने लोक भरलेत माझ्या अवती भोवती? 🙄 https://qr.ae/prGZjm एका व्याख्यानात[1] खालील कथा ऐकली होती. या विषयाला अनुसरून आहे म्हणून सांगतो. एकदा एक प्रख्यात डॉक्टर एका वेड्यांच्या हॉस्पिटल मध्ये जातात. हॉस्पिटल मधले सर्वात 'शहाणे' वेडे म्हणून तीन वेड्यांना त्यांच्यासमोर उभे केले जाते. या तिघांना डॉक्टर साहेब सांगतात "माझ्या प्रश्नाचे तुमच्यापैकी जो कोणी बरोबर उत्तर देईल त्याला हा आता बरा झाला आहे या सर्टिफिकेट सहित या हॉस्पिटल मधून आम्ही घरी सोडू". तिघेही वेडे कान टवकारतात. डॉक्टर प्रश्न विचारतात - ३ गुणिले ३ किती? पहिला वेडा - सोप्पंये ३ गुणिले ३ डाळिंब. या तिघांना 'शहाणे' म्हणून डॉक्टरांसमोर आणणाऱ्या जुनियर डॉक्टर कडे मोठे डॉक्टर रागाने बघतात. दुसरा वेडा - ३ गुणिले ३ बरोबर मंगळवार. आता मात्र तिथले जुनियर डॉक्टर आणि वॉर्डबॉय दोघांच्या कपाळावर ...

झी झर चे खुळ

इमेज
आजकाल महिला आणि पुरुष सोशलमीडियावर आपल्या नावा समोर '(he/him/his)' किंवा '(she/her)' लावतात, हे काय प्रकरण आहे? छोटे उत्तर - मागच्या काही वर्षात हे "प्रेफर्ड प्रोनाउन्स" (Preferred Pronouns) ची टूम पाश्चात्य राष्ट्रांमध्ये काही गटांमधून निघाली. तर या गटांचे म्हणणे असे आहे की एखादा पुरुषाला तो स्त्री आहे असे वाटू शकते. तसेच एखाद्या स्त्रीला तो पुरुष आहे असे वाटू शकते. एखाद्याने लिंगबदल करून घेतले असेल, आणि एखाद्याला पुरुष किंवा स्त्री दोन्हीही संबोधने नकोशी वाटतील. तर अशा लोकांना समाजाने समजून घ्यावे आणि त्यांनी स्वतः सांगिलेल्या संबोधनाने ओळखावे. त्यातून She, Her, He, Him या सामान्यपणे वापरलेल्या संबोधनाबरोबर काही लोक they, them, it वापरातायेत आणि काहींनी चक्क zer, ze अशी मनमानी संबोधने शोधली. आणि सध्या परिस्थिती अशी आहे कि अशी स्वघोषित ७० संबोधने आहेत. ज्यांची भावना "आईंग?" अशी झाली असेल त्यांच्यासाठी मोठे उत्तर - मी हे प्रकरण गेल्या ४-५ वर्षांपासून फॉलो करत आहे त्यामुळे याची बऱ्यापैकी कल्पना आहे. आपल्या इथे हे आत्ता आत्ता पोचले आहे. पण पाश्चात्य वि...

संघटन शक्तीची गरज काय?

इमेज
संघटन शक्तीची गरज काय? कोरा.कॉम वरील या प्रश्नासाठी माझे उत्तर - ​फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात कंपनीच्या ऑफिशियल चॅट वर सकाळीच एका टीममेट चा मेसेज आला. "Hi Ashish, do you have some time today? need to talk". आजकाल असे मेसेज आले कि कि धस्स होतं. त्यातल्या त्यात उत्कृष्ट काम करणारे सहकारी असतील तर जास्तच. अमेरिकेमध्ये जसे "ग्रेट रेसिग्नेशन" चालू आहे तसे भारतात सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये "ग्रेट स्विच" चालू आहे. लोक कंपन्या बदलतात, दुप्पट तिप्पट पगार वाढवतात. त्यामुळे एखाद्याला टिकवून ठेवणे, किंवा राजीनामा आल्यावर रिटेन करणे म्हणजे महाकठीण काम बनले आहे. आता हा सहकारी, सोयीसाठी त्याला "क्ष" म्हणू कंपनीत जॉईन होऊन फक्त तीन महिने झाले होते. पण पठ्ठा फ्रेशर असूनही कॉलेजमध्ये असतानाच स्वतःहुन कोर्सेस करून आला होता. त्यामुळे खरोखर एक चांगला सहकारी मिळाल्याचे टीम मॅनेजर म्हणून मला आणि बाकी टीमला देखील समाधान होते. अगदी काही दिवसाच्या अवधीतच त्याने कोड बेस समजून नवीन डेव्हलपमेंट देखील सुरु केली होती. संवादकौशल्य देखील उत्कृष्ट होते. नुकताच जॉईन झाल्यामुळे किमा...

राष्ट्र आणि राष्ट्रवाद

इमेज
  हजारो वर्षांचा तथाकथित दैदिप्यमान इतिहास आणि वैभव असलेली ही भारतभूमी शेकडो वर्षे परकियांच्या आक्रमणासमोर हतबल का झाली? कुणीच का टिकू शकले नाही? या प्रश्नाला बरेच कंगोरे आहेत. "हजारो वर्षांचा तथाकथित दैदिप्यमान इतिहास आणि वैभव असलेली ही भारतभूमी" प्रश्नाच्या या भागात थोडा खोचकपणा जाणवतो. दैदिप्यमान इतिहास म्हणजे नक्की किती काळासाठी होता हे कसे ठरवणार? कारण गेल्या ७५ वर्षासारख्या तुलनेने कमी कालखंडात देखील भारतात ६५ चे युद्ध, ७१ चे युद्ध, आणीबाणी, दंगली, अणुस्फोट, दुष्काळ, लायसेन्स राज, भ्रष्टाचार घोटाळे, आयटी क्रांती, आनंदवनासारख्या सेवेकरी संस्था, शेतकरी आत्महत्या, मध्यमवर्गाचा उदय, उदारीकरण असे कितीतरी चांगलया आणि वाईट घडामोडी घडल्या. तर "हजारो" वर्षांमध्ये काय काय घडले असेल. काही गोष्टी चांगल्या असतील काही वाईट. या सर्वांमधून किमान "भारतभूमी" ही ओळख अंशतः तरी आपण टिकवून ठेवली म्हणून सोयीसाठी म्हणूया "हजारो वर्षांचा दैदिप्यमान". आता तथाकथित या शब्दावर येऊ. एखाद्या राष्ट्राला दैदिप्यमान इतिहास आहे किंवा नाही हे कोण ठरवते? - बऱ्याचदा त्या त्या र...

Quora वरील लेखी स्वरूपातील भांडणे वाचताना तुम्हाला काय वाटते?

इमेज
जर मुद्देसूद, तर्काला धरून आणि अभ्यासयुक्त टिप्पणी असेल तर वाचायला मजा येते. काहीतरी नवीन समजते. शेवटी संवादाचा हेतू एकमेकांना समजून घेणे आणि एकमेकांच्या मुद्द्यातील कमकुवत जागांना (blindspots) भरून आणखी चांगला विचार तयार करणे हाच असतो ना? नाही म्हणजे आदर्शवत संभाषणात तर हाच हेतू असावा. तसे नसेल आणि टिप्पणी हेकेखोर, एकांगी होत असेल तर मग अशी भांडणे न करणे चांगले. शेवटी लिखित स्वरूपातील भांडणे दोन किंवा अधिक व्यक्तींच्या सहभागाशिवाय पुढे जाऊच शकणार नाहीत. अशावेळी प्रतिक्रिया न देता काहीच केले नाही तर कदाचित ते थोडे उद्धट वाटू शकते. त्याला इलाज मलाही माहीत नव्हता. डेस्टीन हा "SmarterEveryDay" या युट्युब चॅनेल चा सर्वेसर्वा. स्वतः एक व्यावसायिक शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ असूनही त्याला त्याच्या व्हिडीओ वर अशा बऱ्याच टिप्पण्या यायच्या ज्यामुळे तो आधी पार वैतागून जायचा. त्याने विचारांती याच्यावर उपाय काढला. तो म्हणतो की अशा न संपणाऱ्या वादावर स्वतःचा तोल न ढळू देता नम्रता ठेवावी. जर वाद ताणत चालला तर तुम्हाला वाटेल तेव्हा हा प्रश्न विचारावा - "मी कुठला पुरावा दिला तर तुम्ही तुमचे म...

Mail To Team on International Yoga Day

इमेज
Today seemed like a good day to share a thought with you all. I once went out with few friends for a dinner. We were having a nice time. One of the friends mentioned that he wasn't really happy about how his manager treated him. He said that he was not working at his full capacity and was only putting in 30%-40% work because he wanted to make a point. I wasn't sure how to react to that. This strategy might be useful if you are doing manual labor with no prospects of growth. However, in our case, as engineers and analysts, we are literally surrounded by opportunities and growth potential. Each hour we have can be invested in learning and improving skills. We have degrees that are recognized worldwide. He was literally modulating his efforts to punish someone in his imagination. That can serve no purpose other than sabotaging his own growth. So should he just tolerate his manager and keep working at his best? I would say that he should take efforts to articulate his feelings, let...

First World problem 🙂

इमेज
This email chain is the result of some bright students seeking advice from me back in 2015. The guy wanted the Computer Science branch in IITs but fell short by few marks to secure a seat. It was amusing to see someone so successful pondering over the best of the best.  I remember my admission days, mostly I was happy that I got an engineering seat in a college in Pune; IITs were a far-fetched dream. I hope for someone this conversation will be useful. What do you think? Let me know in the comments. 1st Email - Hi, My brother plans to join NIT Surathkal computer engineering. Can you please guide us on the future plan? 1.How much difference is there for admissions to foreign colleges for MS between IITs and top NITs? 2.Is it true that IITias have the upper hand in it? 3.He should take a gap of one year and gives the IIT entrance exam again? Thanks, My Reply #1 Hi, NIT Surathkal is definitely a good college. Considering your brother's capabilities, he should have gotten into IITs. Sa...

ऐकण्याचे कौशल्य

इमेज
"ऐकणे” (लिसनिंग स्किल) हे कौशल्य कसे रूजवतां येईल हा अतिशय चांगला प्रश्न आहे. संवादामध्ये समोरच्या व्यक्तीचे ऐकून घेणे हे फार महत्वाचे आहे. जर आपण त्या संवादातून स्वतःच्या जाणिवेमध्ये वृद्धी नाही केली आणि आपले स्वतःचेच आधीच तयार असलेले विचार रेटले तर त्या संवादाचा आपल्याला काय उपयोग? स्वतः शहाणे आहोत हा इगो कुरवाळता येईल, पण काही मूल्यवर्धन होणार नाही. बऱ्याचदा आपण संवाद करताना प्रत्युत्तर देण्याची तयारी करत असतो. त्यामुळे समोरचा कधी आपलं म्हणणं संपवतोय याची आपण अधीरतेने वाट पाहतो. त्यामुळे होतं काय की समोरची व्यक्ती नक्की काय म्हंटली हे अर्धेअधिक निसटून जाते. आणि फक्त आपल्याला आधीच अपेक्षित असलेले शब्द, विचार हेच नेमके पकडून त्याच्यावरच आधारित आपले उत्तर देऊन आपण त्या संवादाची दिशा आपल्याला हवी तशी वळवतो. पण हा सुसंवाद नाही. सुसंवादात प्रत्येक व्यक्तीला आपले विचार ऐकून घेतले गेले आणि दुसऱ्याचे विचार समजले अशी भावना आली पाहिजे. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संवादामध्ये चांगले ऐकण्यासाठी हे करायला हवे - १. आपण फक्त प्रत्युत्तर देण्यासाठी ऐकत तर नाही आहोत ना याचे भान ठेवावे. काही सेकंदापु...

The ruthless shrink we all need

इमेज
Which supporting character stole the scene every time they appeared? Jane Lynch. There are very few TV series fans who haven’t watched Two and a Half Men. The series was a brilliant comedy until Charlie Sheen had his act together. I believe the series started to deteriorate well before his meltdown, somewhere around season 3. However, I must admit that immersing myself in the humor, memorable quips, and performances of the unforgettable actors was one of life's joys. However, had it not been for the sheer brilliance of Jane Lynch, I would have rated the series 50% lower. This realization came to me in retrospect because whenever I feel like rewatching anything related to Two and a Half Men, I instinctively search for those scenes on YouTube, specifically "when Charlie goes to the shrink." Jane Lynch portrayed the character to perfection, breathing life into the therapist. Her hippie wardrobe became an integral part of the character, and the dialogues were a treat. The sar...

लग्न पहा 'बे' करून

इमेज
  सध्या लग्न जुळवणे कठीण का होत चालले आहे? मी लग्नाच्या वयाचा झालो असताना, म्हणजे साधारण सव्वीसाव्या वर्षी यावर गहन विचार केला होता. गहन विचार करणे हा स्थायीभाव असल्याने, लग्न जुळण्याच्या काठिण्यपातळीत वाढच झाली होती. तर हे त्या वेळेचे विचार मी माझ्या ब्लॉग पोस्ट मध्येसविस्तर पणे मांडले आहेत [1] . इथे  ते आणि आणखी काही मुद्दे सांगतो - १.  माणसाचे वाढलेले आयुष्यमान  आणि त्यात आलेले सातत्य हे लग्नाला होणाऱ्या वाढत्या विरोधाचे कारण असावे. पूर्वी आयुष्य म्हणजे कधी काय होईल याचा भरवसा नाही, आज याला डायनोसॉरस ने खाल्ले उद्या त्याला म्यामथ ने तुडवले अशा पद्धतीचे. शिकार करा आणि खा. आज शिकार मिळाली तर दिवस कारणी, आज जंगलातून येवून जगलो वाचलो तर उद्याचे पाहू अशी जीवनशैली. त्यामुळे जोडीदार कसा मिळावा याच्या अपेक्षा जेमतेमच. कारण उद्या ती आहे की मी नाही कुणाला माहिती? आज म्हणजे लग्न केलं की पुढची ५०-६० वर्षे या व्यक्तीबरोबर काढायची म्हंटल्यावर तथाकथित वाढलेली बौद्धिकपातळी 'तिसरा म्याट्रीक्स' पाहताना जशी कावरीबावरी होते तशी होते. त्यामुळे जोडीदार मिळवणं (लग्नासाठी) हा अवघड आणि ना...

परोपकार की स्वउपकार?

इमेज
तुम्ही अशी कोणती गोष्ट परोपकार म्हणून केली पण त्याचा तुम्हालाच प्रत्यक्ष फायदा झाला? साधारण २००८ च्या दरम्यान मी एकदा वृत्तपत्रात एक लेख वाचला. त्यात लेखकाने त्यांचा अनुभव कथन केला होता. सामसूम रस्त्यात त्यांचे पेट्रोल संपले आणि एका अज्ञात मोटारसायकलस्वाराने स्वतःच्या दुचाकीतील पेट्रोल देऊन लेखकाला मदत केली. जेव्हा लेखक त्या स्वाराला पैसे देऊ लागला तेव्हा त्याने पैसे स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला. ते म्हणाले की मोबदला द्यायचाच असेल तर लेखकाने देखील आपल्याबरोबर पाईपचा तुकडा ठेवावा आणि इतर बाईकस्वारांना अडीनडीला मदत करावी. मला ही कल्पना चांगलीच आवडली. मी माझ्या शहरात असे बाइक ढकलणारे लोक बरयाचदा पाहिले होते. माझ्या ऑफिस व घरामधील रस्त्यात 5-6 किलोमीटरच्या परिसरात पेट्रोल पंपच नव्हता. त्या मार्गावर,अशी दृश्ये जवळपास प्रत्येक आठवड्यात दिसायची. मी स्वतःला या अडचणीत एकदा दोनदा सापडलो होतो.चला, एक चांगले पुण्याचे काम करूया या भावनेने मी माझ्या ऑफिस बॅगमध्ये एक सायफन नळी आणि एक छोटी प्लास्टिकची बाटली ठेवण्यास सुरुवात केली. गाडी ढकलून बेजार झालेले, थकलेले, स्वतःला दोष देत चाललेल्या दु...

कंट्रोल उदय कंट्रोल

इमेज
मी ऑफिसमध्ये मराठी सहकाऱ्यांशी मराठीत बोलत असतो तेव्हा हिंदी भाषिक लोक जे त्या संवादाचा भागही नसतात ते चिडतात आणि 'हिंदी में बात करो यार, यह देहाती भाषा मत बोलो' असं म्हणतात. मी काय करावे? ही वेळ आली का? असो.. काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी असले नखरे सहन करत नाही. आमच्या सोसायटीचा एक व्हॉट्सऍप ग्रुप आहे. तिथे बऱ्याच गोष्टी जसे पाणी, सुरक्षा, साफसफाई, डागडुजी असले विषय असतात. ७0 टक्के पब्लिक मराठीच असेल. उरलेलं हिंदीभाषिक आणि बाकीचे. त्यामुळे एक सौजन्य म्हणून बहुतांश संवाद इंग्रजी आणि थोडे हिंदी आणि त्याहून कमी मराठी असतात. या ग्रुपमध्ये बरेच जण इंग्रजी व्याकरणाची लक्तरे निघाली तरी हिंदी किंवा मराठी संदेश टाळतात. त्यात काही जण तर इंग्रजीच्या भीतीने "काही सांगायचे आहे पण बोलणार नाही" या न्यायाने कधीच संदेश पाठवत नाहीत. तर झाले असे, की आमच्या सोसायटीच्या अध्यक्षाने पाण्याविषयी एक पोस्ट टाकला. महापालिकेकडून आलेल्या मराठी नोटिशी त्यांनी बऱ्याचदा जशाच्या तशा टाकल्या होत्या.त्यावर ग्रुप मधल्या एक दाक्षिणात्य महिलेने लागलीच "इथे मराठी चालणार नाही...