पोस्ट्स

Tadoba लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आजोबांनी गिरवले सत्तरीत संगणकाचे धडे आणि बनले सॉफ्टवेयर डेव्हलपर

इमेज
 सुहास पाटील हे नाव जागतिक विव्दान आणि उद्योजकांमध्ये आदराने घेतले जात असले तरी सर्वसामान्य मराठी घरांमध्ये क्वचितच माहित असेल.  सुहास पाटील यांचा जन्म एका मराठी कुटुंबात जमशेदपूर येथे १९४४ मध्ये झाला. वडील श्रीकृष्ण पाटील हे टिस्को (टाटा स्टील) मधील अभियंते. छोट्या सुहास ला वडिलांच्या प्रतिभेचा वारसा होता. सुहासने स्वतंत्र भारतात नव्याने स्थापन झालेल्या भारतीय प्राद्योगिकी संस्थान म्हणजे आयआयटी मधून पदवी मिळवून अमेरिकेच्या प्रथितयश एमआयटी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. १९७० साली पीएचडी मिळवळी. त्यांनी १९८१ साली अमेरिकेच्या सॉल्ट लेक सिटी या शहरात पाटील सिस्टिम्स नावाची संगणकाचे सुटे भाग बनवणारी कंपनी काढली. आज ही कंपनी सिरस लॉजिक (Cirrus Logic) या नावाने ओळखली जाते. पावणेचार हजारापेक्षा जास्त पेटंट्स मिळवलेली हि कंपनी सिलिकॉन व्हॅलीतील प्रमुख कंपन्यांपैकी एक आहे. अशा या कर्तबगार सुहास चे वडील - श्रीकृष्ण पाटील हे आपल्या मुलासोबत राहण्यासाठी सत्तरच्या दशकात अमेरिकेत गेले. स्वतःच्या रेडिओ दुरुस्त करण्याच्या छंदाला आणखी पुढे नेत आपल्या लेकाच्या या घरी संगणक पहिल्यांदा शिकले. ज्या देश...

संस्मरणीय जून - १

इमेज
हा महिना खूप प्रवास झाला. जवळ जवळ प्रत्येक विकांताला फिरत होतो. ताडोबा, माथेरान, मावशीचे गाव बदगी आणि हेमचन्द्रांच्या लग्नासाठी भुसावळ. ताडोबा महिन्याची सुरुवातच धडाक्यात झाली. जूनच्या १ तारखेला सकाळी आमची रेल्वे वर्धा स्टेशन ला लागली. ज्या जंगलाचा उल्लेख अगदी पहिली दुसरीपासून ऐकतोय, तिथे आम्ही आता ३ दिवस घालवणार याची जाम उत्सुकता होती. वाघ बघायचा हे तर मनात होतेच. पण कुठेतरी अपेक्षाभंगाची भीती होती. म्हणून मनाची तयारी केली की वाघ बघण्यासाठी नाही तर एक परिकथेतले वृक्षराजींनी भरलेले जंगल बघायला चाललोय. मी, मुस्तफा आणि ऋषिकेश चा युवाशक्ती बरोबरचा पहिला प्रवास. आमच्या चोवीस जणांच्या ग्रुप होता. वयोगट अंदाजे १५ ते ७५. आमच्या बरोबर दोन अनुभवी लीडर्सही होते. पहिला दिवस वर्धा ते ताडोबा हा प्रवास करण्यात आणि ताडोबाच्या बफर झोन मध्ये फिरण्यात गेला. ताडोबा हे आता 'ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प' म्हणून ओळखले जाते. आम्ही अंधारीत एका रिसोर्टमध्ये उतरलो होतो. रात्री एकमेकांच्या ओळखी झाल्यावर आम्हाला लवकर उठायचे म्हणून लीडर्स ने सूचना दिल्या. विदर्भात मी पहिल्यांदाच आलो होतो, ज...