श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव..
लहानपणी, म्हणजे साधारण सातवी आठवीत असताना रविवार सकाळी हि धून ऐकून जाग यायची. जुन्या लोकांसाठी बी आर चोप्रांचे "महाभारत" आणि रामानंद सागर यांचे "श्रीकृष्ण" याच्यात कोण भारी याच्यावर चर्चा, आणि माझ्यासारख्या पिटुकल्यांना स्पेशल इफेक्ट युक्त छान छान गोष्टी. हे श्रीकृष्ण तसे चांगलेच होते, पण मध्ये मध्ये रामानंद सागर येवून नुसतेच बोलायचे, कधी कधी अर्धा तास बोलायचे, लय बोर व्हायचे मग.
याची आठवण का यावी मधेच.. तर झाले असे कि मागे काही दिवसांपूर्वी कुठल्यातरी वाहिनीवर परत हि धून ऐकली आणि म्हटले पाहू तरी आता कसे वाटते श्रीकृष्ण बघून. अवतार आणि मेट्रिक्स सारखे सिनेमे बघायची सवय झालेल्या डोळ्यांना त्या लो बजेट स्पेशल इफेक्ट ची मजा काय कळणार आता? तरीही कुठल्या तरी गोष्टीनी खिळवून ठेवले. अर्धा तास अगदी ब्रेक सकट तो भाग पाहिला. तो भाग होता कालयवन वधाचा. अगदी वरवर गोष्टच सांगायची म्हटली तर..
जरासंध कृष्णाच्या हात धुवून मागे लागलेला. तशात तो कालयवन नावाच्या दुष्ट राजाची मदत घेतो. हा कालयवन महापराक्रमी, साक्षात कृष्णाला पण सळो कि पळो करून सोडतो. कृष्ण पण हुशार माणूस, तो त्याला मागे मागे पळवत एका गुहेत घेवून जातो. या गुहेत झोपलाय मुचुकुंद. चिरनिद्रेत गेलेला महान योद्धा. कधी काळी सत् युगात राक्षसांबरोबर झालेल्या युद्धात त्याने देवांना मदत केलेली आहे, आणि मग देव खुश झाल्यावर वर मागितला, कि "मी फार दमलोय, हि युद्ध, हा संसार, खूप दमलोय. देवा मला झोपायचय, खूप खूप झोपायचय" देव म्हणतो "हात्तीच्या एवढंच ना, मग झोप की.." पण मुचुकुंद साधीदुधी नाही तर चिरनिद्रा मागतो. अशी झोप की युगानयुगे नुसते झोपावे. सोमवारी सकाळी ऑफिसला जाताना उठूच नये असे वाटते ना.. ती तशीच भावना झाली असेल त्याची. तर मुचुकुंद मागतो, की "मला कोणी या झोपेतून जागे करेल, त्याच्यावर माझी नजर पडताक्षणी तो भस्मसात व्हावा" देव म्हणतात "ठीके, नाहीतरी बरंच आहे, नशीब इंद्रपद नाही मागितले.."
तर आपला कृष्ण हुशार, तो जातो नेमका त्याच गुहेत. अंगावरचा शेला टाकतो त्या मुचुकुंदावर, आणि स्वतः लपून बसतो.
जेव्हा कालयवन त्याला शोधत तिथे पोहोचतो तेव्हा त्याचा समज होतो की कृष्णच मस्त घोरत पडलाय. लै चीडचीड होते त्याची. मग दे दणादण घालतो लाथा मुचुकुन्दाच्या पेकाटात. मग काय, हा राजा उठतो, आणि बघतो कोण घालतंय लाथा बिनकामाचा. आणि बघितल्या बघितल्या कालयवन भस्म.

आता हे रामानंद सागर यांचे श्रीकृष्ण म्हंटल्यावर तुम्ही कल्पना करू शकता किती कॉमेडी पद्धतीने दाखवले असेल ते.. कालयवन तर अगदी अलीफ लैला मधला राक्षस मरतो त्या स्टाईल ने जळतो. मी लैच हसलो बघून.
इथपर्यंत सगळे ठीक.. पण त्यानंतर श्रीकृष्ण आणि मुचुकुन्दाचा संवाद चालू होतो.. अर्रे काय बोरपणा आहे राव, हि अशीच प्रतिक्रिया झाली असती एक १०-१२ वर्षापूर्वी. पण आता उलट झाले, कारण हा संवाद अगदीच नेहमीचा नव्हता, तुम्ही म्हणाल नेहमीचाच असणार, मुचुकुन्दाने परत देवाला मदत केली, आता देव त्याला परत वर देणार, आणखी काय होणार?
हा राजा, ज्याने आधीही देवांना मदत केली होती, आणि "वर"कमाई केली होती, त्याला परत चान्स? मला वाटले आता युगानयुगे झोपून ताजातवाना झालाय गडी, आता मस्तपैकी त्रैलोक्याचे सम्राट पद मागेल. आणि मग अप्सरांचा डांस बघत मजाच मजा.
नाहीना राव, तो नाही मागत अस्से काही. म्हणे देवाला, मला तुझ्यात विलीन करून घे.. एकरूप होऊदे.. मोक्ष दे. घ्या B आणि करा दिवाळी. अर्रे साऱ्या संसाराची सुखे वाट पाहताना हा मोक्ष वगैरे काय मागतोय?
देव पण समजावतो त्याला, म्हणतो "ये मौका बार बार नहि आता प्यारे". पण मुचुकंद ठाम. म्हणतो.."देवा आत्ता या क्षणाला तुझ्यासमोर मला माझे सगळे जन्म आठवतायेत, मि पुण्य केले, सद्गुणी राहिलो, देवांना युद्धात मदत केली. का, तर पुन्हा राजा बनून सर्व सुखाचा उपभोग घेण्यासाठी. पुण्य करून खरेतर परत मि माझ्यासाठी जन्माचा फेरा मागत होतो. परत परत त्याच बंधनात अडकत होतो. पण आता नाही. मला तुझ्यात विलीन करू घे आणि मुक्त कर"
देवपण म्हणे "मी तुझी परीक्षा पाहत होतो, माझ्या विलोभनाला तू शरण जातो कि काय ते बघत होतो."
म्हंजे वर देताना पण परीक्षा? चांगल्या कामाचा मोबदला पण एक परीक्षा?
देव म्हणे "माझा खरा भक्त माझ्याशी एकरूपताच तेवढी मागतो."
हे बरये.. माझी प्रतिक्रिया.
म्हंजे जन्मोजन्मी मस्त सुखं भोगल्यावर मग सुखाचा पण कंटाळा आला म्हणून मोक्ष?
म्हंजे मोक्ष मिळवण्यासाठी सुखं उपभोगून घ्या आधी, (ओशोचा संदेश तर नव्हे?).
चांगले काम केल्यावर त्याचा मोबदला म्हणून देवाकडे अपेक्षा करणे हेपण एक दुष्टचक्र?
हा मोक्ष म्हंजे नक्की काय फंडा आहे राव?
लैच कठीण आहे समजणे.. पण चला १०-१२ वर्षापूर्वी हे कठीण कि सोपे ते पण समजत नव्हते, म्हंजे थोडी प्रगती आहे.
मी हा एपिसोड मिळवण्याचा प्रयत्न करतोय, किंवा हा मुचुकुंद-श्रीकृष्ण संवाद कुठेतरी मिळाला तर लई बेस.
_*_
खूप खूप छान लिहिला आहे. प्रत्यक पुराणकाली घडलेली घटनाच सुंदर वृत्तांत केलेला आहे. वाचायला मजा आली.
उत्तर द्याहटवाI will have to say first..pretty cool blog with depth...
उत्तर द्याहटवाNow I get to the point..and this time no jokes..
If Moksha, has been really difficult to understand and matter of fact difficult to achieve, I would have achieved it long time ago and you too and many, many others...Think about it....
Ok..let me be more elaborative
Think about how many difficult things has been understood and achieved by human race...we have broken atoms..have interstellar flights..and all things in between...Yes all the THINGS...
if Moksha has been some thing to be understood and achieved, and some stuff to be analysed in laboratory, we would not have been talking about it and you would not have written this blog.....and no BUDHHA have been necessary
Actually Moksha seems to be so difficult because its simplest of simple...Actually I would say its the ultimate paradox..it is so simple that it is guaranteed to be missed and hence seems ultimately difficult
In my org words ,,,
Moksha is the ultimate BUZZINGA!
Bcaz one really cant achieve MOKSHA, one finally realizes that he is IT......
and somebody like me or many others like me who have done PhD in Moksha, still cant seem to live it......Actually too much analysis is also the great block....
Ok I am getting too esoteric...
For now bear in mind that Moksha is not at all difficult thing...bcaz its not a thing, not a funda...this could be first baby step towards living it...
@Arun
उत्तर द्याहटवाThanks Bhaoji..
@Mustafa
उत्तर द्याहटवाI was expecting your comment.
I knew some people would find my questions naive, but you gotta accept that I managed to drag you here atleast to have some lead.
Well, problem is, ignorant people are whining that no one gives them knowledge and learnt ones are crying that no one is asking them. I just tried to ask.
And about the PhDs, consider this - दिवसा एवढा प्रचंड सूर्य तळपतोय म्हणून काजव्याने आपली चमकवणे सोडून द्यावे का? :D
👌👌👍👍
उत्तर द्याहटवा