पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अभिजात तुंबाड

इमेज
"विरासत में मिली हर चीझ पर दावा नही करना चाहिये" तुंबाड च्या नायकाला म्हातारी अखेरचं समजावून पाहते तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. ती फक्त त्या गुप्त धनाबद्दल बोलत नसते. विनायक त्या रिपरिप पावसात भल्यामोठ्या वाड्याचे द्वार उघडून आत निघालेला आहे.  लोभीपणाला वैगुण्य न मानल्यामुळे आलेला कमालीचा आत्मविश्वास त्याच्या देहबोलीतून वाहतोय. तुंबाड च्या ट्रेलर मध्ये ही दृश्य पाहून अपेक्षा खूप वाढल्या होत्या. काल सकाळी हा पिच्चर पाहिला तेव्हा बऱ्याच दिवसांनी अपेक्षांच्या पुढे गेलेला पिक्चर पाहिल्याचे फीलिंग आले. तुंबाड हॉलिवूड च्या तोडीस तोड आहे. त्याच्या गहिर्या अर्थाला बऱ्याच छटा आहेत. पण अर्थाला हात घालण्याआधी हा नितांत सुंदर सिनेमा थिएटर मध्ये अनुभवा. आजीकडून आईकडून कधीकधी अशा कथा ऐकल्या होत्या. अमक्याच्या शेतात, विहिरीत, घरात गुप्तधन आहे, पण ते काढता येत नाही किंवा शापित आहे वगैरे वगैरे. या गोष्टी म्हणजे कल्पनेला मोकळे आकाश. तुंबाड ने या गोष्टींना पडद्यावर उतरवले आहे. भयाण वाडा, धन, शाप ते धन मिळवण्यासाठीची विशिष्ट पद्धत, जर कुणी ती माहीत नसताना प्रयत्न केला तर काय? ...